खामगाव – दहिटणे येथील मुळा मुठा नदीवरील गेली सहा वर्ष सुरू असलेला पूल पूर्ण कधी होणार.

16
आवाज लोकशाहीचा  .! ….खामगाव…….आकरा कोटी अधिक रुपये खरच करून बांधण्यात येणारा नदीवरील पूल सहा वर्ष संपले तरी अद्याप पूर्ण झालेला नाही .
मुळा मुठा नदी वरती पाटेठाण दहिटणे खामगाव या गावांना जोडणारा प्रतिमा क्रमांक ५४ किलोमीटर वरती हा पूल बांधण्यात येत आहे.
२०१८ मद्ये या पुलाच्या कामासाठी ११००लक्ष रुपयांची तरतूद सरकारने केलेली होती आणि पुलाचे काम एन पी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीने घेतलेले होते.
गेली सहा वर्ष या पुलाचे काम चालू असून हे काम ज्या शासनाच्या विभागाकडे आहे तो दौंड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग हा असून हा विभाग कामाकडे.किती.लक्ष देतो  .यावरून दिसून येत आहे .
या बाबत सविस्तर माहीत अशी की .खामगाव आणि दहिटने या दोन गावानं मुळामुठा नदीवर पूल.बांधण्यासाठी सरकारने ५०५४ या योजनेतील.११००लक्ष रुपये मंजूर केले.होते . पूल हा दहिटणे खामगाव या दोन गावाला जोडणारा असता तरी याचा फायदा पुढील मिरवडी राहू पाटेठाण या राहू बेटातील सर्व गावांना खामगाव नांदूर तांबेवाडी लडकतवाडी आदी गावांच्या संपर्कासाठी सोयीचा ठरणार आहे.
२०१८ साली या पुलाच्या कामाला सुरुवात झाली तो अद्याप पूर्ण झालेला नाही गेली सहा वर्ष या पुलाचे काम ठेकेदार करीत आहे अशा स्वरूपाची कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग दौंड यांच्याकडून केली जात असल्याने नागरिकांमध्ये या कार्यालयाच्या कारभाराविषयी मोठा संताप व्यक्त होताना दिसत आहे.
गेली सहा वर्ष हे काम का? उशिरा करीत आहे .याचे उत्तर मात्र अधिकारी वर्ग आणि शाखा अभियंता देत नाहीत उलट उडवळीचे उत्तरे देऊन नागरिकांना कोड्यात टाकण्याचे काम ते करीत आहेत अशा स्वरूपाचा आरोप सुद्धा खामगाव दहिटणे मिरवडी या पट्ट्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे.
ह्या वर्षी तरी या फुलाचे उद्घाटन होणार का असा प्रश्न सुद्धा यातून निर्माण होत असला तरी हा पूल कधी होणार हे फक्त ठेकेदार आणि या विभागाचे अधिकारी हेच सांगू शकतील नागरिकांना मात्र याबाबतचे कोडे न सुटणारे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here