दौंड:-आवाज लोकशाहीचा..
संडासच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या दौंड बांधकाम उपविभागाकडून गार -दौंड या भीमा नदीवरील पुलाच्यां कामात भ्रष्टाचार झाला नसेल का? म्हणून पुलाच्या खांबाचा पाय मजबुती कडे दुर्लक्ष केल्याने तो कोसळला असावा ? अशा स्वरूपाचे प्रश्न नागरिकांच्या कडून व्यक्त होताना दिसत आहेत..
या विभागात काम करणारे अधिकारी राजकीय आश्रित असल्याने त्यांना नागरिकांची आणि त्यांच्या विकास कामांची बिलकुल फिकर नसते राजकीय आशीर्वाद असल्याने अधिकारी नेत्यांना खुश ठेवण्यासाठी जेवढा काही विकास कामात धुमाकूळ घालता येईल तेवढा घालत.आहेत,
मर्जीतील ठेकेदारांच्या गराड्यात राह्यायच हा अधिकाऱ्यांचा नित्याच्या कामाचा आराखडा गेली अनेक वर्ष या तालुक्यात चालू आहे,
गुळाला मुंगळा चिकटला तसा अधिकारी खुर्चीला चिकटून आहे त्याची बदली करण्याचे धाडस त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुद्धा नाही अशी खात्री लाईक माहिती आहे ,अशा स्वरूपाच्या कामकाजाने लाडवलेल्या अधिकाऱ्यानी यवत येथील महिला पोलिसांच्या शौचालय युनिटमध्ये जवळपास १२ते १३ लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे..
या शौचालयाची माहिती विभागाला विचारलेले असता त्यांच्याकडे शौचालयाचा आराखडा नसताना बांधकाम केले आहे, बांधकाम पाहिल्यास त्याच्यां खर्चाचा सर्व तपशील एक ते दीड लाखाच्या आत मध्ये असला पाहिजे, ही माहिती काम पहिल्या कोणीही सांगू शकतो,त्यावर मात्र यांनी दीड लाख पेक्षा अधिक रुपयांचा खर्च दाखवलेला आहे.
सिमेंट पत्र्याचे दार आतला भाग तीन बाय तीन चा आणि दोन भिंतीच्या मध्ये आडवं टाकलेला पत्रा अशा विकसित स्वरूपाच्या शौचालयाच्या कामासाठी या विभागाने १५ लाख रुपये अधिक खर्च दाखवलेला आहे, प्रत्यक्षात मात्र त्या शौचालयाच्या खर्च गावाकडच्या बांधकाम नुसार लाख सव्वा लाखाच्या पुढे जाऊ शकणार नाही इतक्यात भंगार स्वरूपाचे शौचालय बांधणार हा विभाग त्यामध्ये दहा एक लाख रुपयाचा मलिदा कमविण्यासाठी प्रमनिक.पने काम केलेले आहे..
दौंड गार या भीमा नदीवरील पुलाचा जवळपास वीस कोटीचा अंदाजपत्रकीय रकमेचा आकडा आहे या पुलाच्या रक्कमेतून या विभागातील अधिकाऱ्यांना काहीतरी होईना अपेक्षा राहणारच अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.पुलाचा खांब कोसळला आणि आम्हीच पडायला लागला होता अशी त्यांनी एक प्रसिद्ध करणारी माहिती वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना दिलेली आहे..
या मद्ये १७ फेब्रुवारी २०२४.रोजी दौंड पुलाची बांधकामाची पाहणी केली असे नमूद केलेले आहे आणि यामध्ये सात आणि आठ हा खांब ओळंब्यामध्ये नाही असे जाणविले त्या आधारावरती संबंधित ठेकेदाराला पत्र क्रमांक २०९/२०२४ दिनांक २० मे २०२४ नुसार दिले असून वळंब्यात नसलेले बांधकाम पाडण्यात यावे पुनश्च स्वखर्चाने बांधण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.
पत्राच्या अनुषंगाने ठेकेदार याने ते पाडून परत स्वखर्चाने बांधेन अशा स्वरूपाचे आश्वासन दिले होते असे नमूद केलेले आहे..
या विभागाच्या या पत्रातील मजकुराने लोकांना वेड्यात काढण्याचा एक प्रयोग केलेला आहे ,याचे चित्र स्पष्ट दिसून आलेले आहे पडलेला खांबा किती उंचीचा होता तो काम तळातून पडलेला आहे की मधून मोडला गेलेला आहे हे प्रश्न त्यात महत्त्वाचा आहे तळातून उकडलेला खांब किती उंचीवर गेलेला होता त्या उंचीच्या काळात या खांबाच्या तळातील मजबुती पणा या विभागांनी का पाहिला नाही हा खरा प्रश्न या विभागाच्या बेबनाव पत्राकडे पाहिल्यावर निर्माण होतो या खांबाची तपासणी विभागाने दोन फेब्रुवारीला केलेली आहे असं सांगताना प्रत्यक्षात ठेकेदाराला 3 फेब्रुवारीला याबाबतचा तपशील कळवण्याचे सोडू त्यांनी दोन महिने उशिरा का पत्र दिले हा सुद्धा प्रश्न त्यांच्या कामकाजाबाबत शंका व्यक्त करणारा आहे..
नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचा पाया किती मजबूत असावा आणि त्याची मजबुती या विभागांना कधी तपासली पाहिजे होती हे सर्व बाब या विभागाच्या कार्यप्रणालीकडे शंकेने पाहणारी आहे अशा स्वरूपाचे मत नागरिक आता खुलेआम चर्चेद्वारे करू लागले आहेत
राजकीय आश्र्याने पीडित असणारे हे अधिकारी कुठल्याच कामाकडे तालुक्याच्या गांभीर्याने पाहत नाही या तालुक्यातील अनेक रस्त्यांवरती अंदाज पत्रका नुसार कामे झालेली नाहीत मात्र रस्त्याच्या कामाची सखोल माहिती ग्रामस्थांना कधीच दिली जात नाही याबाबत या विभागाच्या वारंवार तक्रारी वर्तमानपत्रातून आणि नागरिकांनी करून सुद्धा या अधिकाऱ्याच्या कामकाजावर कुठल्याही स्वरूपाचा फरक पडत नसल्याने आज बांधकाम खात्याच्या केवळ नाकर्तेपणाच्या लक्षण हा नदीतील पुलाचा खांब पडला आहे..