दौंड.आवाज लोकशाहीचा ……………..
सात.कोटी अधिक रुपयांच्या किमतीची गौण खनिज चोरी करणाऱ्या वर कारवाई. करा.अश्या स्वरूपाची मागणी जोरवलेली.आहे .
दौंड तालुक्यात वासुंदे गावात जमीन गट नंबर ३५१मद्ये झालेल्या प्रकारचे दौंड महसूल खात्याने पंचनामा केलेल्या असून आता या पंचनाम्यालां तीन महिने उलटले आहेत.
तीन महिन्यात चोरी करणाऱ्या जमीन मालकाने या विभागाला पंचनामा बाबत कोणतीच लेखी माहिती दिलेली नसल्याने शासनाने या कडे गंभीर पने लक्ष का? घातलेले नाही अशी ओरड सुधा जोर धरत आहे .
या बाबत अधिक माहिती अशी.की वासुंदे गावामध्ये जमीन गट नंबर ३५१ मद्ये कुरकुंभ मंडल अधिकारी व्ही एस दळवी आणि वासुंदे गावचे गाव कामगार तलाठी बी एच चव्हाण यांनी ५ मार्च २०२४ रोजी गौण खनिज खानपट्ट्याची मोजणी केलेली आहे,
या गट नंबर मध्ये खड्डा क्रमांक एक मध्ये ४०४फूट लांब ३१०फूट रुंद ३४ फूट उंच असे उत्खनन केलेले आहे.ती ऐकून बेरीज ४२६८७ ब्रास एवढी होते आहे
खडक क्रमांक दोन मध्ये लांबी ५२५ रुंदी ३७५ उंची ३९ फूट असे उत्खनन केलेले आहे त्याची ऐकून बेरीज ७५७५७.५ ब्रास होते आहे
ही बाब पंचनाम्यात नमूद करताना त्यासाठी साक्षीदार.म्हणून चार व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत .
प्रति ब्रास ६०० रुपये रॉयल्टी असलेल्या या उत्खनाला आणि पंचनामा केलेल्या आकडेवारीला पाचपट दंड आकारण्याची तरतूद असल्याने येथील दोन खंडातील उत्खननाची बेरीज केली असता १ कोटी १८ लाख ४४४.५ ब्रास होते त्याची दंडात्मक कारवाईचा विचार केल्यास सात कोटी अधिक रुपयांची ती कारवाई होत आहे मार्च महिन्यामध्ये महसूल प्रशासनाने हा पंचनामा करून खनिज विभाग यांच्या ताब्यात दिलेला आहे मात्र गेले तीन वर्ष सदर व पंचनाम्याच्या बाबत जमीन मालक आणि उत्खनन करणाऱ्या तेथील व्यक्तीने प्रशासनाला कुठल्याही स्वरूपाचा खुलासा आपले म्हणणे दिलेले नाही म्हणून तीन महिने उलटून गेलेला हा विषय महसूल विभागाने दाबून ठेवला की काय असा प्रश्न यामुळे पुढे आलेला आहे.
तालुक्यामध्ये मातीचोर यांच्या वरती प्रशासनाने अनेक गावातून बोजा जमिनीवर चढविलेला आहे आणि वासुंद्यातील हा भयवायक प्रकार साधारण सात कोटीच्या चोरीने आता सर्वत्र चर्चेचा विषय झाला असला तरी त्याच्यावरती कारवाई कशी केलेली नाही हा प्रश्न लोक चर्चेमध्ये घोंगावू लागला आहे याकडे महसूल प्रशासनाने गंभीरपणाने पाहावे आणि लवकरात लवकर कारवाई करावी या चोरट्या उत्खनाला आवर घालावा आणि चोरून विकलेल्या या गौण खनिज ची सखोल चौकशी करून संबंधितावरती गुन्हे दाखल करीत उत्खनन केलेल्या ची दंडासह रक्कम तत्काळ वसूल करावी अशी आता नागरिकांची ओरड वाढलेली आहे याकडे प्रशासन गंभीरकरांनी पाहील अशी अपेक्षा सुद्धा या निमित्ताने ते व्यक्त करीत आहेत