दौंड:आवाज.लोकशाहीचा..
दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अखेर स्वप्न राहिल्याचा राग कुल यांच्या पेक्षा त्यांच्या समर्थकांना हवेली तालुक्यात आसाह्य झाला आहे.सुदर्शन चौधरी त्यांच्या पाहुणे मित्रांनी भाजपाच्या बैठकीत ती मळमळ बोलून दाखवली आहे..
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले चौधरी यांनी राग अनावर झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत बेताल वक्तव्य करीत आपला राग व्यक्त करताना आमच्या बोकांडी कश्याला आणले असे शब्द अजित पवार यांच्या बाबत करण्यास अजिबात डगमगले नाहीत.त्याच्या या व्यक्तव्याने मात्र अजित पवार समर्थकांमध्ये उठलेल्या वादळाने काही वेळात मघार घेऊन दोन्ही हात सुधा जोडून स्पेशल माघार घेतली आहे..
या बाबत सविस्तर माहिती अशी की दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या नातेसंबंध हवेली तालुक्यातील लोणी काळभोर,उरूळी कांचन आणि परिसरात मोठ्या संख्येने आहे त्यात सोरतापवाडी हा एक भाग आहे. चौधरी या गावातील नवखा राजकारणी आणि कुल यांचा समर्थक म्हणून परिचित आहे..
गेली पंधरा वर्ष पूर्वी कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षातून निवडणूक लढवली होती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी देऊन तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन केले होते.कूल यांना निवडून द्या त्यांना मी मंत्री करेल आणि कुल त्यावेळी निवडून आले होते पण पाच वर्ष त्यांना मंत्रीपद मिळाले नाही.पाच वर्ष मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत गेली त्यांनतर झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांच्या जागी रमेश थोरात यांनी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले..
थोरात यांचा पाच वर्षाचा कालखंड गेल्यावर कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्ष सोडून भाजपा मद्ये उडी घेतली आणि भाजपाचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कुल यांना निवडून द्या मी त्यांना मंत्रीपद देईल अशी तालुक्याच्या लोकांना ग्वाही दिलेली होती.आता कुल नक्की मंत्री होणार याचा आनंद आतून कूल यांना झालाच होता पण राहुल कुलाचे सगे-सोयरे आणि दौंड तालुक्यातील हितचिंतक यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात तो झाला होता..
निवडणुकीनंतर महिन्यामध्ये महिने उलटत गेले वर्ष मागून वर्ष गेली पण मंत्र्याचा लाल दिवा मिळाला नाही आता निवडणुका जवळ आल्या आहेत.तालुक्याच्या आणि हवेलीतील कूल यांच्या नातेवाईकांच्या स्वप्नातील मनणारी पदाची मळमळ मात्र तसेच राहून गेली ती जाता जात नव्हती नाही याच काळात राजकीय उलथापालत झाली..
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटून अजित पवार हे भाजप गटात सामील झाले अजित पवार यांच्यामुळे राजकीय फेरबदल करण्यात आले ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि पवार यांच्याबरोबर आलेले काही त्यांचे सहकारी आमदार मंत्री झाले त्यामुळे भाजपातून आशावादी असलेले कुल हे मंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले..
अजित पवार बारामती तालुक्यातल्या असून दौंड तालुक्याच्या लगत असलेल्या या तालुक्याने बारामतीच्या राजकारणाला हाताशी धरून येथील राजकीय प्रवास केलेला आहे अजित पवार भाजपात आल्यामुळे फुलांचे मंत्रीपद हुकले यांचे राशिभविष्य कोणालाही सांगण्याची गरज पडली नाही आणि साहजिकच याचा राग कुल समर्थक आणि त्याच्या नातेसंबंधांना येणे साहजिकच आहे..
चौधरी हे नेतृत्व म्हणून नुकतेच उदयाला आलेले आहे.भाजपा पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे.अजित पवारांच्या राजकारणाची कारकीर्द आणि सुदर्शन चौधरी यांच्या राजकीय प्रवासाची वर्ष याचा ताळमेळ मात्र जुळणारा नाही.अजित पवार एक राज्यातील धुरंदर नेते म्हणून परिचित आहेत आणि सुदर्शन चौधरी हे हवेली तालुक्यातील काही मोजक्याच लोकांसाठी युवा नेतृत्व म्हणून माहित आहे राज्यात अनेक वर्ष मंत्रिपदाचे धुरा सांभाळणारे अजित पवारांवर ती सुदर्शन चौधरी यांनी भाजपमध्ये जाऊन दोन दिवसांपूर्वी मोठा हल्लाबोल केला.
अखेरच्या टप्प्यात यांना कशाला आमच्या बोकांडी बसायला घेतलेली आहे अशा स्वरूपाची भाषा सुद्धा वापरली आणि त्या रागाच्या भरात यांच्यामुळे आमच्या राहुल मुलांचे मंत्रीपद हुकलं ही मळमळ सुद्धा व्यक्त केली. कुल है मंत्री झाले असते मात्र अजित पवार भाजपात आले आणि त्याच्यामुळे झाले नाहीत हाच त्याचा मागचा दृष्टिकोन चौधरी यांनी सर्वांसमोर व्यक्त केला..
कुल खऱ्या अर्थाने दौंड तालुक्यातले आमदार असून नातेसंबंध असलेल्या हवेलीत त्यांच्या समर्थकांना त्याचे मोठे कौतुक आहे.कुलांच्या हुकलेल्या मंत्री पदाची मळमळ सर्वाधिक दौंड तालुका पेक्षा हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आली हे या घटनेमुळे उघड झालेले असून तो राग जाहीरपणे व्यक्त केल्याचे सर्व महाराष्ट्राने पाहिलेले आहे..