केडगाव:आवाज लोकशाहीचा
जागतिक पातळीवर नावलौकिक असलेल्या केडगाव तालुका दौंड येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मधील पदाधिकारी यानेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघड झाल्याने शेतच कूपन खाते आहे अशी अवस्था झालेली आहे…
अनाथ अपंग मतिमंद आणि वयोवृध्द यांची जोपासना करणाऱ्या संस्थेला मुख्य अकाउंटन म्हणून काम करणाऱ्या भास्कर निरगुट्टी (वय- ५४ ) याने संस्थेतील दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे..
या बाबत अधिक माहिती अशी की निरगुट्टी आणी त्याची पत्नी वैशाली गायकवाड(निरगट्टी) हे दोन्ही पंडिता रमाबाई मुक्ती मिशन च्या प्रमुख पदावर कार्यरत होते वैशाली ही अधिक्षिका या पदावर कार्यरत होती तर तिचा पती भास्कर याच्याकडे अकाउंटं चा प्रमुख म्हणून संस्था पहात होती.संस्थेमध्ये प्रतिष्ठा असणाऱ्या या दोन्ही उभेतांकडून या संस्थेचा सर्व व्याप संभळताना पत्नीकडे व्यवस्थापन तर नवऱ्याकडे आर्थिक तरतुदी ही कार्यप्रणाली होती..
या दोन मोठ्या पदांवरती कामकाज करणाऱ्या उभयतांना संस्थेकडून जबाबदारी देण्यात आलेली असल्याकारणाने भास्कर यांनी जबाबदारीला फाटा देऊन आतील अल्पवयीन तरुण मुलींना त्रास दिला आहे त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार केला आहे..
ही घटना पोलिसांच्या मतानुसार १७ एप्रिल महिन्यात घडली असून त्याबाबतचा पोलिसांमध्ये फिर्याद नोंदविण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी गेला आणि अखेर 12 जुलै रोजी यवत पोलिसांमध्ये या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संस्थेची जोपासना करणाऱ्या या उभयतांपैकी एकाने संस्थेतील बालिकांवरती अन्याय अत्याचार केल्याने शेतच कुंपण खातंय अशा स्वरूपाची व्यथा समोर आलेली आहे.संस्था अगोदरच विधिमंडळातील एका प्रश्नामुळे लक्षवेधी करण्यात आलेली होती त्या लक्षवेधी मधून संस्थेच्या सखोल चौकशीसाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन विधिमंडळात दिलेले होते.या घटनेचे दोन दिवस संपताच हा प्रकार उघडकीस आलेला आहे..
पंडिता रमाबाई मुक्ती मिशन साठी जगभरातून ख्रिस्ती बांधव आर्थिक स्वरूपाची वस्तू स्वरूपाची तसेच येथे बांधकाम करून देऊन मदत करण्याची भूमिका बजावत असतात संस्थेकडे सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम आणि दुरुस्त्या सुरू आहेत संस्थेच्या असलेल्या सर्व जागांना संरक्षण भिंत बांधण्यापासून जुन्या छतांचे छत बदलून नवे करणे खोल्यांना रंगरंगोटी करणे अंतर्गत असलेल्या विविध साहित्यांना बदल करणे आदी मोठ्या रकमेची कामे वारंवार सुरू आहेत गेली दहा वर्षापासून ही संस्था मोठ्या प्रमाणात या विषयाकडे लक्ष देऊन आहे..
या सर्व घटनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे यामुळे जुने असलेल्या संस्थेला रंगरंगोटी केल्यामुळे नव्याचं स्वरूप जरी दिसत असले तरी ही संस्था ज्या मूळ विषयांसाठी इथे प्रेरित झाली त्यामध्ये अंध अपंग मतिमंद व वृद्ध तसेच अनाथ बालकांच्या मुलींच्या संगोपनाचा कार्य जोपासणे तितकच काळजीच आणि महत्वाचं असताना याकडेच गांभीर्याने पाहिलं जातं की नाही असा प्रश्न भास्कर यांनी केलेल्या प्रकरणावरून समोर आलेला आहे..
या संस्थेच्या भिंती उंच झाल्या त्यांना रंगरंगोटी केली आणि स्वच्छता मोठ्या प्रमाणात जरी केली तरी आत मध्ये राहणाऱ्या अंध अपंग मतिमंद महिला मुलींना कोणता त्रास होतोय का? ते आनंदीत आहेत,त्यांचे प्रश्नच नाहीत का? आधी सर्व बाबी बाहेर समजत नसल्याकारणाने या रंगीन डेव्हलपमेंटच्या संस्थेच्या कार्यामुळे हा सर्व प्रकार दबलाय की काय अशी सुद्धा शंका येणे साहजिकच आहे ,आणि या शंकेवरती शिक्कामोर्तब करणारी घटना म्हणजे या तीन मुलींवर घडलेला प्रसंग म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही..
जागतिक पातळीवरती नावाजलेल्या या संस्थेचे अशा प्रकारे बदनामी होईल हे स्वप्न मात्र ही संस्था उभ्या करणाऱ्या स्वर्गीय पंडिता रमाबाई यांचे स्वप्न नक्कीच नव्हते ते स्वप्न कोणीतरी अविचारी कार्यप्रणालीमुळे विध्वंस केले जाते का असा प्रश्न सुद्धा संस्थेच्या स्थापनेपासून कधीच शंकेचे कारण बनले नव्हते मात्र गेले दहा वर्षांमध्ये या संस्थेमध्ये अनेक छोटे-मोठे प्रसंग घडून संस्था बदनाम होऊ लागलेली आहे तर यासाठी संस्था वाचून तिची अस्मिता जपणारे कोणी पुढे येतील का असा प्रश्न सुद्धा या भागातील नागरिकांसाठी यक्ष बनलेला आहे.