दौंड तालुक्याच्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी…..

13

आवाज लोकशाहीचा……
आगामी आमदार तालुक्याचा कोण हा प्रश्न राजकीय चर्चेचा बाजार करणाऱ्यांन पुढे असला तरी तालुक्यात या निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्यांची संख्या सुद्धा यंदाच्या वर्षी वाढल्याने कोण आमदार होणार हा प्रश्न खऱ्या अर्थाने वादळी ठरत आहे,
मागील पाच वर्षांपूर्वी हा तालुका रमेश थोरात विद्यमान आमदार राहुल कुल या दोन व्यक्तींची पक्षाचा विचार न करता कामकाज करीत होता.
उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचं देणं घेणं या तालुक्याला नसायचं मात्र कुल की थोरात या दोनच व्यक्ती प्रेमापोटी सत्ता संघर्ष सर्वश्रुत झालेला आहे.
यंदा अशा स्वरूपाची निवडणूक होणे शक्यतो दिसत नाही तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच अजित पवार गट शरद पवार गट अशा तीन गटांमध्ये निवडणुकीचे वादळ उठलेलं असलं तरी एकाच गटातील दोन दोन तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी धडपड करू लागलेले आहे विद्यमान आमदार राहुल कोण हे भाजपा पार्टीचे असून यंदा निवडणुकीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि त्यांनी त्या स्वरूपाच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत भाजपा मधूनच कूल आणि काळे हे दोन इच्छुक असून अजित पवार गटातून बाबा जगदाळे की रमेश थोरात याची चर्चा रंगली आहे शरद पवार गटातून आप्पासाहेब पवार की नामदेव दाखवणे यांची पक्षांतर्गत छुपी लढाई सुरू असून तिकीट मलाच मिळेल ही अपेक्षा दोघेही बाळगून कामाला लागले आहे.
मागील काळामध्ये कुल थोरात यांच्या प्राबलल्यामध्ये अन्य कोणताही उमेदवार तग धरत नसे मात्र अलीकडच्या काळात शरद पवार गटाचे दोन उमेदवारांची भर पडलेले आहे परिणामी थोरात यांनाही विरोधक दिसतो आणि कूल यांच्या गटातही विरोधकाचे तयारी सुरू झालेली आहे एकूण तीन महत्त्वाचे पक्ष या तालुक्याच्या आमदारकीसाठी निवडणूक लढवणार असले तरी एकाच पक्षातून दोन दोन उमेदवार सध्या हालचाली करत दिसत असल्याने या सहा उमेदवारांचा या दौंड तालुक्यात मतदार कसा विचार करणार यातील कोणाला निवडणार आणि कोण निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष त्याला पाठबळ देणार हे सर्व प्रश्न चौकात बसणाऱ्या बिनकामी टाळक्यांसाठी डोकेदुखीचा विषय झालेले आहे.
दौंड शहरामध्ये निवडणूक आल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये कुठल्यातरी त्रस्त व्यक्तीला हवा भरायची निवडणूक लढ म्हणायचं आम्ही मदत करतो असं सांगायचं आणि त्याला निवडणुकीच्या रिंगणात कसाही करून उतरवायचा ही अनेक वर्षाची परंपरा यंदाही जपली जाणार अशी परिस्थिती दिसू लागलेली आहे दौंड तालुक्याच्या शहरांमध्ये बादशाह शेख नावाचे राजकीय वादळ अनेक वर्ष नगरपालिकेच्या कारभारात सक्षमरित्या कार्यरत असून यंदा त्याने आमदारकीची निवडणूक लढावी आशा स्वरूपाची हवा शहरातल्या पंचायत समितीचा चहाचा गाडा चे चौकातील एका हॉटेलच्या दरम्यान जोरदारपणे वाहत आहे.
बादशाह शेख या निवडणुकीत सध्या उतरावेत म्हणून काहीं विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळी शकला लढवून प्रयत्न चालू केलेला आहे या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी राजकारणातले शकुनी पाठबळ देत आहेत असे चित्र सध्या तयार होताना दिसत आहे
दौंड तालुक्याची यंदाची विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात कोण लढवणार हे पक्षाने दिलेल्या तिकिटानंतर स्पष्ट होणार असले तरी पक्षाचे तिकीटच मला मिळावे यासाठी मात्र धडपडणाऱ्यांची संख्या सध्या सहा पक्षीय पातळीवरती आणि अपक्षांमध्ये काही अशी दिसत असल्याने या सर्वांचा विचार बिनकामी राजकारण अभ्यासक करून शर्ती आणि पायजा लावण्यात व्यस्त झालेले दिसत आहे

..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here