रामभाऊ टुले कोण ? मतदारांचा सवाल,शरद पवार प्रेमी मतदारांची भावना भडकली टुले होत आहेत ट्रोल …

17

आवाज लोकशाहीचा

दौंड:प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात रामभाऊ टुले कोण ? व डायरेक्ट पवार साहेबांना विधानसभेचे तिकीट निष्ठावंतांना दिले पाहिजे आयात उमेदवार ला विरोध राहील असे एक प्रकारचे आव्हानच त्यांनी दिलेच कसे अशा स्वरूपाचा प्रश्न दौंड तालुक्यातील नागरिक निर्माण करीत तालुक्यातील शरद पवार प्रेमी मतदार टुले यांना ट्रोल करू लागले आहेत..

टूले यांनी एका खाजगी प्रसार माध्यमांना आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटातील उमेदवाराच्या प्रश्नाबाबत आपलं मत व्यक्त केल आणि ही चर्चा तालुक्यात लोकांपर्यंत पसरली असल्याने तरी आम्ही आयात उमेदवाराला विरोध करू असा सरळ पवार साहेबाना त्यांनी इशाराच दिल्याने तालुक्यात मोठा गोंधळ उडला आहे..

नुकत्याच झालेल्या लोकसभेत शरद पवार आणि अजित पवार असे दोन वेगळे गट निर्माण झाल्याने लोकसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली होती.या दोन गटाने सहाजिकच तालुक्यातील दोन नेत्यान मद्ये फूट पडली आहे. या फुटित टुले यांना ज्यांनी जिल्हा दूध संघाला तिकीट दिलं निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी केली निवडून आणल्यावर संघाचा चेअरमन केले त्यांची साथ सोडली व ते गद्दार झाले आणि दल बदलून त्यांनी शरद पवार गटात उडी मारली आहे..

या आधीच त्यांचा राजकीय प्रवास कसा घडला आणि कोणी घडवला याचे भान नसलेलं टुले शरद पवार गटात जाऊन वर्ष झाले नाही तोच सरळ पवार साहेबाना उमेदवार कसा पाहिजे आणि आयात दिला तर विरोध करू अशी धमकी कशी देऊ शकतात असा प्रश्न तालुक्यातील जनतेत निर्माण झालेला आहे..

तालुक्यात शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांना भरघोस मते मिळालेली आहेत या सर्व मताना टुले यांनीच गळ घातली होती का? असा टोमणा सुधा मारत आहेत.

लोकसभेला तालुक्यात भाजप विरोधात मोठा रोष मतदाराने व्यक्त केला होतो त्यातून पवार साहेबांची राजकीय जिद्द चिकाटी मतदार यांना आकर्षक करणारे ठरली आहेत यातून त्यांच्या पार्टीला भरघोस मतदान दौंड तालुक्यातून झाले

या निवडणुकीत तालुक्यात बोटावर मोजावे एवढे कार्यकर्ते सुळे यांचां प्रचार करीत होते त्यातील टुले एक आहे मात्र मतदार स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी बाहेर आले आणि त्यांनी शरद पवार गटाच्या सुळे यांना मोठ्या मताधिक्याने तालुक्यातून पाठिंबा व्यक्त केला. या पाठिंबाचे श्रेय टुले घेत आहेत की काय असा सवाल तालुक्यातील नागरिक सुद्धा करू लागलेत..
विधानसभा निवडणुकीचे पडघम अद्याप वाजलेले नाहीत मात्र हवा सुरू झालेली आहे यामध्ये उमेदवार फिक्स करण्यासाठी शरद पवार साहेब हे स्वतःसक्षम आहेत त्यांना तालुक्यातील कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतची अतिशय अभ्यासपूर्वक माहिती आहे मात्र टुले यांनी हा प्रताप करून जणू त्यांना आव्हान दिले की काय अशी समजूत करून घेतल्याने टुले यांना  मतदार ट्रोल करू लागले आहेत..

टुले यांच्या बरोबर वरवंड गावचे युवा कार्यकर्ते दीपक दिवेकर यांनी सुधा  त्यांचे  मत व्यक्त केले आहे मात्र ते मतदार असून त्यांना मतदार म्हणून आपला विचार व्यक्त करायला हरकत नाही असा दिवेकर यांच्या बाबत विचार व्यक्त करून टुले हे राजकीय पदे भोगलेले मान्यवर असून त्यांनी स्वतः कोणाशी तरी गद्दरी केली आहे त्याचा त्यांना विसर पडला असून अतीहुषार पना देशाचे राजकारण आपल्या बुद्धी चातुर्यावरती हलवून ठेवणाऱ्या शरद पवारांसमोर पाजळणे ही बाब चुकीची आहे त्यांनी स्वतःला सावरलं पाहिजे असा सल्ला देऊ लागले  आहेत

टुले यांचा हा प्रताप त्याच्या स्वताला प्रसिद्धी झोतात येण्याचा उपक्रम असला तरी त्या उपक्रमाचा परिणाम मात्र शरद पवार गटाच्या संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनी वरती झालेला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here