पाचशे कामगारांची आस्थेने चौकशी न करणारे राहुल.कुल तालुक्याच्या अडीच लाख लोकांच्या आरोग्याची हमी,कशी ? देऊ शकतात…… जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे यांची कुल यांच्या वक्तव्यावर शंका

21

दौंड तालुक्यातील साडेतीन लाख नागरिकांची आरोग्याची काळजी घेणार ही  राहुल कुल यांची  विधानसभा निवडणुकीसाठी मतदान मिळावे या साठी अफवा आहे – कामगार नेते शिवाजी काळे..

औषध उपचारासाठी पैसे नसल्याने काही सेवा निवृत्त भीमा पाटस साखर कामगारांचे मृत्यू..कुटुंबावर उपास मारीची वेळ
२ ऑक्टोबर ला सेवा निवृत्त कामगारांचे चक्री उपोषण..

आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकऱ्यांच्या हक्काचा भीमा सहकारी साखर कारखाना होता त्याचे सेवा निवृत्त कामगार मयत झाले असल्याने आमच्या मयत झालेल्या सेवा निवृत्त ४० कामगारांच्या घरच्यांची कधी आमदार राहुल कुल यांनी आस्थेने कसे आहात अशी साधी चौकशी केलेली नाही

बाकी कामगारांची जाणून बुजन देणी देत नाहीत त्यांना कधीही तुमची देणी द्यायचीय आहे असे विचारले नाही ते कुल तालुक्याच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची हमी कशी देतात ?अश्या स्वरूपाचा प्रश्न जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे यांनी व्यक्त केला आहे..

राहुल कुल हे तालुक्याचे आमदार आहेत आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून परिचित आहेत.

कुल यांनी नुकतेच महाआरोग्य शिबिर घेतले त्यामध्ये बोलताना तालुक्याच्या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी राहील अश्या स्वरूपाने प्रसारमाध्यमांना व उपस्थित नागरिकांना माहिती दिली आहे..

काळे यांनी या माहिती वरून कुल यांच्या भूमिके बाबत शंका व्यक्त करीत विरोध केला आहे.आमचे सेवा निवृत्त ५०० कामगार आहेत त्यात ४० मयत झाले या सर्वांची भीमा सहकारी साखर कारखान्याकडून जवळपास ५० कोटी रुपयांची देणे शिल्लक आहेत निवृत्त कामगाराला आपल्या आयुष्यभर केलेल्या कामातून मिळणारे या पैशांपैकी एकही रुपयांना न मिळाल्यामुळे याच्यातील ४० कामगारांचा मृत्यू झालेला आहे.

कुल यांना या बाबत कसलीच चिंता ना काळजी आहे ती देणी मिळवण्यासाठी २०१५ सालापासून ते आज पर्यंत आमचा लढा चालू आहे विद्यमान चेअरमन असलेल्या राहुल कुलांनी दरम्यान एकदाही कामगारांच्या कुठल्याही कुटुंबाची साधी चौकशी करायचे सोडूनच द्या तुमच्या घामाचे पैसे मी देणे आहे पण देऊ शकलो नाही अडचणी आहेत साधी एवढी च सुद्धा  चर्चा केलेली नाही.ते कुल तालुक्यातल्या  सुमारे तीन लाख लोकांच्या आरोग्य विषयाची शाश्वती कसे देऊ शकतात ? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने क व्यक्त केला आहे

कामगारांच्या कष्टाचे घामाचे पैसे त्यांनी देण्यात मुद्दाम टाळाटाळ केलेली आहे म्हणून येत्या २ऑक्टोबर ला गांधी जयंतीच्या निमित्त आम्ही चक्री उपोषण करणार आहोत यात सर्व कामगार सहभागी होणार आहेत आणि दहा दिवसाच्या नंतर आमरण उपोषण करण्याचा सुद्धा आम्ही कामगार एक मताने निर्णय घेणार आहोत अशा स्वरूपाची माहिती सुधा त्यांनी दिली आहे..

पुढे म्हणतात  मर्यादित असलेल्या ५०० कामगारांच्या कुटुंबाची अस्थिने चौकशी न करणारा चेअरमन तालुक्याचा आमदार कुल तीन लाख मतदारांच्या आरोग्याची काळजी घेऊच शकतच नाही ही फक्त आणि फक्त येणाऱ्या विधानसभे साठी मतदान मागणीसाठी फसवी अफवा आहे अशा स्वरूपाची टीका टिप्पणी करीत कुल यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे…

कुल यांचा तालुक्यातील नागरिकांना साठी या शिबिरातून केलेली भीष्म प्रतिज्ञा काळे यांच्या विरोधी भूमिकेने मातीमोल.होणार तर नाही ना? हा नव्या वादळी प्रश्न या निमित्ताने तालुक्यात उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here