आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी
विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे वातावरण दौंड तालुक्यात चांगलेच तापले असताना नेत्यांची निष्ठा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची नुसत्याच धावपळीने दमछाक होऊ लागलेली आहे..
नेतृत्वाच गुणगान गाणे,त्याची बदनामी करणे अश्या दोन्ही गोष्टीला सध्या जोर आला असून नागरिकांना आणि मतदारांना मात्र हा करमणुकीचा विषय झालेला आहे.तालुक्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे फ्लेक्स लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उंच ठिकाणी लावण्यात आलेले आहेत.
दौंडच्या विकासाचा नुसता भास ,
कमिशन घेऊन केला स्वतःचं विकास,
! राजकारण….करून…
सहकारी साखर कारखाना बंद पाडून केले खाजगीकरण,
कामगारांचे संसार उध्वस्त करून केले राजकारण !
,उद्ध्वस्त केलेले कामगार ….
सभासद ,पोलिसांच्या खांद्यावर राजकारणाची बंदूक ,
सत्तेची मस्ती सुडाची कारवाई,निर्दोष,
.. दौंडकर अश्या मजकुराचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अश्या स्वरूपाच्या फलक तालुक्यात उंच ठिकाणी पुणे सोलापूर महामार्गावर यवत, चौफुला पाटस या गावातून लावण्यात आल्याने
दौंड तालुका निवडणुकीच्या अगोदरच चांगलाच तापला आहे
फलकाच्या मजकुरा मधील शब्दाने नेत्यांना चिमटे घेण्यास सुरुवात केलेली आहे.सोशल मीडिया यामधे मागे नसून नेत्याच्या सन्मानासाठी आणि प्रतिमा उंच करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे मजकूर लिहिताना निष्ठावंत प्रेमींची दमछाक झालेली आहे..
नुकताच तालुक्यात महाआरोग्य शिबीर आमदार राहुल कुल यांच्यावतीने घेण्यात आले.या मद्ये १३ हजार ८०० लोकांनी नोंदणी केली असल्याचा दावा केला आहे.
त्यात ३ हजार नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर ८०० नागरिकांना दिव्यांगाना साहित्य देण्यात आलेत असा दावा केला गेला आहे प्रसार माध्यमातून आकडेवारी जाहीर केलेली आहे
ती नागरिकांची दिशाभूल करणारी आहे.अशा स्वरूपाचा स्पष्ट कार्यक्रम ठिकाणी चौकशी केली असता उघड होऊ शकते असे नागरिक ठाम मत व्यक्त करू लागले आहेत
त्यांचा विषयातील अंदाज पत्राची सखोल माहिती घेतली असता ३०० लोकांना चष्मे वाटप करणाऱ्या शिबिरामध्ये नक्की डोळे तपासणीचे डॉक्टर किती होते याचा प्रश्न ते उपस्थित करताना दिसतात
एक डोळा तपासणाऱ्या डॉक्टर साठी कमीत कमी दहा मिनिटांचा वेळ जातो आणि चष्मा देईपर्यंत तो वीस मिनिटांचा वेळ लागतो
शिबिर सकाळी ११ वाजता सुरू झाल होते.४ वाजता बंद झाल होते. ११ते ४ ह्या पाच तासांमध्ये ३००० डोळ्यांचे रुग्ण तपास करण्यासाठी डॉक्टर किती होते त्यांचा वेळ किती गेला हा प्रश्न खऱ्या अर्थाने या शिबिरामध्ये संशोधनाचा विषय झाला आहे.अशी शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे
८०० दिव्यांगणासाठी तपासक किती होते त्यांना मदतनीस किती होते.त्यांना वाटप करणाऱ्यांची संख्या किती होती या सर्वांना एका रुग्णाला तपासून साहित्य वाटप करण्यासाठी किती वेळ लागला याचा हिशोब केल्यास ८०० लोकांच्या आकडेवारी ही नागरिकांना फसवणारी नक्की ठरेल असा ठाम विश्वास सुद्धा ते या निमित्ताने व्यक्त करू लागले आहेत
३००० डोळ्यांचे रुग्ण ८०० दिव्यांगांना साहित्य वाटणाऱ्या रुग्णांची संख्या मिळून ३८०० होती.शिबिरामध्ये १३८०० लोकांनी सहभाग घेतला असे आकडेवारी जाहीर केलेली आहे
३८०० ची वजाबाकी केली असता दहा हजार रुग्ण राहतात या दहा हजार रुग्णांसाठी आलेल्या डॉक्टरांची संख्या किती होती.त्या डॉक्टरांच्या बरोबर आलेले मदतनीस किती होते.त्यासाठी स्वयंसेवकांची संख्या किती होती.
शिबिरा-साठी काम करणारे आणि नेत्याच्या कार्यकर्त्यांची संख्या किती प्रमाणात होती याकडे लक्ष वेधतात
ही सर्व आकडेवारी शिबिर ठिकाणी बोरमलनाथ मंदिर येथे विचारात घेतल्यास कमीत कमी २५ ते ३० हजार लोकांची मांदी-आळी त्या ठिकाणी निर्माण व्हावी अशी परिस्थिती हवी होती
मात्र हे शिबिर फक्त सहा तास चालले आणि सहा तासाच्या शिबिरामध्ये जिकडे तिकडे सामसूम झाल्यामुळे २५ हजार लोक हवेत विरले की काय हा प्रश्नच आता नागरिक उपस्थित करू लागल्याने शिबिरातील आकडेवारी ही सत्ताधारी मंडळींनी फसव्या स्वरूपाची जाहीर केलेली आहे असा ठाम विश्वास व्यक्त करीत आहे.
.अश्या विविध घडामोडीत तालुक्याचे राजकारण वादळी चर्चेचं कारण बनले आहे
परिणामी नागरीकांची यातून करमणुकीचा विषय झालेला असून उंच टांगलेले फलक त्यावर लिहिण्यात आलेला मजकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वातावरण तापवत आहे