दलित बांधवांची मते कोणत्या नेत्याला नकोय.! हा नेता आहे तरी कोण? माजी सरपंच यांनी दिली माहिती.
आगामी निवडणुकीत दलित बांधवांचा रोष पत्करावा लागणार का ? त्या नेत्या विरुद्ध दलित बांधव एकत्र येतील..
आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी
आमच्या मतांची गरज नाही म्हणाऱ्या नेत्याला यंदाच्या निवडणुकीत आमच्या दलित बांधवांची मते मिळणार नाहीच मात्र तालुक्यात सुधा समाजाला जाऊन त्यांना आपल्या मतांची त्यांना गरज नाही हे सांगितली जाईल अश्या स्वरूपाची माहिती दौंड तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या एका माजी सरपंचांनी दिली आहे तालुक्यातील हा जातीयवादी नेता कोण ? या विषयावर मोठी खलबते सुरू झाली असल्याने गोंधळ निर्माण झालेला आहे..
सरपंच दलीत समाजाचे आहेत.तालुक्यात त्यांनी नेता म्हणून संबंधित नेत्याला आज पर्यंतच्या निवडणुकीत अतिशय प्रामाणिक पणे साथ दिली होती.त्यानाच यवत (ता.दौंड) येथील विश्रामगृहात नेत्यांनी सरळ सांगितल तुमच्या मतांची मला गरज नाही हा प्रकार मोठा भयानक घडला आहे..
सद्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहे.दौंड तालुक्यात नेत्यांच्या लोकां-विषयी असलेल्या आपुलकीचा प्रसार आणि प्रचार त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या हिमतीने व प्रामाणिक पणाने करू लागले आहेत.त्यांच्यात काही इतिहासातील आन्नाजी पंतांच्या भूमिकेत असलेल्या कार्यकर्त्यांचा कारभार भलताच जोमाचा आहे.अश्या वातावरणात माजी सरपंचांनी यवत येथील ऐका खासगी बैठकीत या विषयाचे बिंग फोडले आहे..
या वेळी वंचितांचे बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तमराव गायकवाड घटनास्थळी होते.त्या सरपंच यांच्या गावात विद्यमान उपसरपंच निवडीवरून हा गोंधळ वाढला असल्याने दलीत सरपंच व उपसरपंच या नेत्याला खपत नाहीत त्याला ते चालत नाहीत असे त्यांनी सांगितले आहे. मी गेली तीस वर्ष त्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होतो सरपंच यांनी सांगितले आहे..
त्यांनी माझ्या समजाबाबत मतांची गरज नाही असे जाहीर बोलल्याने तो नेता जातीयवादी आहे असा माझा पक्का समज झालेला आहे.जातीवादी नेत्याला येणाऱ्या निवडणुकीत दलीत समाज मते देणारा नाही या साठी मी गावागावात जाऊन माझ्या बांधवांना पुराव्यासह माहिती देणार आहे.असा निर्धार त्यांनी या वेळी बोलून दाखवला आहे..
तालुक्यात दलितांच्या मतांची गरज कोणत्या नेत्याला लागत नाही याची माहिती त्यांनी दिली असून त्याचे नाव छापून उगाच त्याला मोठे करू नका असे सुधा सांगितले आहे माझे सुधा नाव टाकू नका नाहीतर माझ्या बाबत खोटा गुन्हा दाखल करून मला त्रास देईल असे सांगताना ते म्हणाले मी येणाऱ्या निवडणुकीत त्याला दलितांची मते लागत नाहीत ती देऊ नका या साठी रात्र-दिवस प्रचार करणार आहे.ज्याच्या समोर झाले तो माझा सहकारी सुधा बरोबर असणार आहे अशी माहीत दिली आहे..
दलितांची मते नकोय म्हणाऱ्या या तालुक्यातील नेत्याला नक्की कसली मस्ती आलेली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी उत्तम गायकवाड यांनी सुधा या प्रसंगी दिली आहे की त्यांनी एक दलीत पत्रकाराला सुधा असाच प्रकार केला होता.तसेच या नेत्याच्या एका कार्यकर्त्यांनी दलीत उपसरपंच यांना पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनाला गावचे सरपंच सांगत असताना सुधा करू दिलेले नाही अशी माहिती सुधा गायकवाड यांनी दिली आहे..
तालुक्यात नेता आणी त्याचे कार्यकर्ते जातीय तिढा निर्माण करीत आहेत आगामी काळात यांना सत्तेपासून रोखणे काळाची गरज आहे त्यासाठी समाज जनजागृती केली जाईल अशी माहिती देणाऱ्या उत्तम गायकवाड यांनी मी आणि समाज बांधव काम करतील असे सांगितले आहे.
दौंड तालुक्याच्या प्रत्येक गावात जाऊन त्याच्या वक्तव्याचा समाज बांधवांना दाखला देण्यासाठी सरपंच ,उपसरपंच यांना बरोबर घेऊन काम केले जाईल अशी भूमिका सुधा गायकवाड यांनी जाहीर केल्याने तालुक्यात तुमची मते नको म्हणणाऱ्या नेत्याला आगामी निवडणुकीत दलितांचा रोष पत्करावा लागणार का? हा प्रश्न मोठा गोंधळ उडवणारा झालेला आहे..