दौंड तालुक्यात आगामी विधानसभेचे वातावरण निवडणुकीच्या आधीच तापले आहे..
दौंड चा सुसंस्कृत पणा कोणाकडे..
सोशलमीडिया लेखक वातावरण तापवू लागले,
आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी
आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिप्पणीने सोशल मीडियावर रोजच्या रोज प्रकाशित होत असल्याने दौंड तालुक्यात आगामी विधानसभेचे वातावरण निवडणुकीच्या आधीच तापले आहे..
नेते सुप्त आणि कार्यकर्ते मुक्त आप-आपल्या पद्धतीने एकमेकांची विरोध असेल त्याची खेचा-खेची करू लागले आहेत..नुकतेच तालुक्यात सुसंस्कृत घराणे म्हणून तालुक्याचे माजी आमदार रंजना कुल,विद्यमान आमदार राहुल कुल त्यांची पत्नी कांचन कुल यांच्या नावाचा नामोल्लेख करीत सोशल मीडियावर लेख प्रकाशित झालेला आहे..
यामधे सुप्रिया सुळे यांनी या कुटुंबाचे कौतुक केले आहे याचा उल्लेख करताना विरोधकांना तिकीट द्या त्यांच्यासाठी केली जातेय विंनती अशी टीका करण्यात कसूर ठेवलेला नाही.. हा विषय व्हाटसअउ ग्रुप वरून व्हायरल करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे..
तालुक्यात सुसंस्कृत म्हणून संबोधलेल्या या कुटुंबातील मागील लोकसभेतील भाजपा पार्टीचे उमेदवार कांचन कुल यांच्या भाषणातील अतिरेकी शब्दांची माहिती घेतल्यास त्यांचा सुसंस्कृत पना ज्यांना वाटतो त्यांना समजेल.
रमेश थोरात यांनी कायद्याच्या चौकटीला मोडीत काढून वय नसताना ज्यांना कारखान्याचे चेअरमन केले त्यांनी रमेश थोरात बाबत किती सुसंस्कृत पना दाखवला याची सुधा माहिती समजेल..
स्वर्गीय लोकनेते आमदार सुभाष कुल यांच्या निधनानंतर ज्यांच्या राजकीय ताकतीवर आपलं राजकीय भविष्य उभ केलं आणि त्याच पवारांचा हात सोडून राजकीय स्वार्थासाठी एकदा महादेव जानकरां बरोबर त्यानंतर भाजपमध्ये जाऊ आपल कार्य साधल तो सुसंस्कृतपणा सर्व श्रुत आहे.याची सुधा माहिती तालुक्याला काय संपूर्ण राज्याला माहीत आहे..
————- सुसंस्कृत कोण ————-
ज्यांच्या वडिलांच्या जीवावर गेली वीस वर्ष राजकीय प्रवास ज्यांचा झाला त्यांनी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यांना सोडून दिले,राष्ट्रीय समाज पक्षाची काच धरली लोकप्रतिनिधी झाले हा सुसंस्कृतपणा एवढ्यावरच थांबलेला नाही ज्यांनी वीस वर्षे पाठबळ दिलं त्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधातच आपल्या पत्नीला कांचन कुलांना भारतीय जनता पार्टीचे तिकीट घेतल आणि त्या कांचन कुलांनी बारामतीचा विकास झाला नाही बारामती पासून दोन किलोमीटर अंतरावर पाण्याची सोय नाही मला निवडून द्या पाणीच पाणी देईल आणि ते अतिरेकी आहेत अशा स्वरूपाची वल्लंगाना केली हा सुसंस्कृतपणा आहे की नाही याचा तपास करण्यापेक्षा त्यांच्या वडिलांना धोका दिला जिच्या विरुद्ध बंड केलं त्या सुप्रिया सुळेंनी तुमच्या घराण्याचं कौतुक केलं मग सुसंस्कृतपणा कोणाकडे आहे हा खरा प्रश्न आता सुसंस्कृतपणाची व्याख्या करणाऱ्यांनी गांभीर्यानच विचारात घेतली पाहिजे अशा स्वरूपाचे मत सोशल मीडिया वरती तिकीट द्या ज्यांची केली जाते विनंती त्यांनी भर सभेत कुलाच्या कार्या संस्काराचे दिली पावती या सोशल मीडियावरील लिखाण वाचून करू लागलेली आहे…
राजकारणाच्या पटलावर सुसंस्कृत पणाची लक्षणे कशी असतात ती आत्तापर्यंत कोणी जोपासले हे सांगण अवघड असतं क्षणात राजकारणाचा विषय बदलत असतो..
राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो,राजकारणातलं वैर हे कायमचं नसतं पण उगाच राजकारणाचा आव घेऊन कोणाला कोणाचे उपमा देणार कोणी कोणावर टीका टीपणी करणे हा खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्यांच्या केविलवाण्या विचाराची मानसिकता म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही अशी टीका टिप्पणी सुधा होऊ लागल्याने दौंड चे राजकारण भलतेच तापले असून नेते सुप्त पने डावपेच करीत आहेत ,कार्यकर्ते मात्र मुक्त पने जमेल तशी टीका टिप्पणी करीत आपले विचार पाजळू लागले आहेत…