कार्यकर्ते वापरले आणि टाकून दिले आता त्यांना सीजनेबल स्वतःच्या तोंडून समजू लागले ते लोकप्रतिनिधी आहेत तरी कसे?
त्यांची नीतिमत्ता ! बोलण्याची भाषा ही लोकप्रतिनिधी लायक नसून एखाद्यावर खुन्नस व्यक्त करण्यासारखी आहे-जेष्ठ नेते नंदू पवार..
राहुल कुल यांच्या वडिलांना आईना व स्वतः त्यांनाही मदत करणारे कार्यकर्ते हे सीजनेबल नेते आहेत का? ते नसतील तर कोण आहेत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे-जेष्ठ नेते नंदू पवार..
आवाज लोकशाहीचा..
दौंड:प्रतिनिधी
निवडणुकीत तुमच्या उपयोगी आलेला तो चांगला गुणवंत ! आणि तुमच्या विरोधात गेला की तो.दोशवंत,त्याला सिजनिबल संबोधता हे म्हणजे आपला तो “बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट”म्हंटल्या सारखंच आहे अशी खोचक टीका जेष्ठ नेते नंदू पवार यांनी विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या वक्तव्या बाबत केली आहे…
दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या एका कार्यक्रमामध्ये कुल यांनी निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढार्यांकडे दुर्लक्ष करा अश्या स्वरूपाची टीका बोलताना व्यक्त केली आहे , व कुणाला काही टीका करू द्या आपण आपल्या कामातून त्यांना उत्तर देऊ अशा स्वरूपाचं वक्तव्य केले आहे
या वक्तव्याचां ज्येष्ठ नेते नंदू पवार यांनी नेहमीच्या शैलीत समाचार घेताना म्हणाले कुल यांच्या वडिलांना तालुक्याने वर्गणी करून निवडून दिले होते.पुढे आईला सुधा मदत केली होती,आई नंतर स्वतः त्यांना सुधा केली या प्रसंगी कोण सिजनिबल नेते होते हे कुल यांनी जाहीर करायला पाहिजे
आपल्या विरोधात कोणी गेला की त्याला आपल्या हुशारीचा नमुना म्हणून काही ही उपमा द्यावी हे एखाद्या बालिश व्यक्ती सारखे आहे
असे सांगताना त्यांनी कुल यांच्यावर टीकेची झोड उठवली ते म्हणाले मी नंदू पवार कुलांच्या राजकारणासाठी विनाकारण काही प्रतिष्ठित व्यक्तीनाच विरोधक म्हणून वागलो.त्यांच्यावर टीका टिप्पणी केली तो काळ त्यांना चांगला वाटला मी करीत असलेल्या विरोधकान वरील टीकांची त्यांना मज्जा वाटायची सर्व कुटुंब त्याबाबत खुश असायचे त्यांचे लाभार्थी सुद्धा यामध्ये मजा घ्यायचे मी त्यांचा कुठल्याही प्रकारचा लाभार्थी नाही म्हणून मी ठामपणे सांगतो कुल यांच्या सदविवेक बुद्धीला स्मरून त्यांनी कोण सीजनेबल नेते आहेत हे उघडपणे सांगितले पाहिजे…
राहुल कुल यांच्या वडिलांना आईना व स्वतः त्यांनाही मदत करणारे कार्यकर्ते हे सीजनेबल नेते आहेत का? ते नसतील तर कोण आहेत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे…
उगाच समोर बसलेल्याना खुश करण्यासाठी अनाठही स्वरूपाचा शब्दप्रयोग करायचा आणि मी विद्वत्तेचा फार मोठा ज्ञानी आहे अशा स्वरूपाची मेखि मिळवायची ही बाब त्यांच्यासाठी घातक ठरणारी आहे.
त्यांच्यासाठी झटणाऱ्या काही प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कारभाराचा फार मोठा अनुभव आलेला आहे ते त्यांच्यापासून दुरावलेले आहेत याची प्रचिती त्यांना येणाऱ्या विधानसभेत दिसून येईलच ही मी भविष्यवाणी सांगण्याची गरज नाही…
निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी पूर्ण तालुक्याचे नेतृत्व करीत असतो त्याला भेदभाव न करता तालुक्यातील सर्व जनतेवर प्रतिनिधित्व म्हणून अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करायचे असतात आपुलकीने त्यांच्याबरोबर राहायच असत उगाच नाही कुठल्याही गोष्टीची टीका-टिपणी त्यांच्यावर करायचे नसते आणि ते टिका-टिपणी केल्यानंतर त्याचे परिणाम मात्र निवडणुकीच्या काळात आपोआप दिसू लागतात आणि ते ज्या वेळेस जाणू लागतात त्यावेळेस त्यांना जवळचेच कार्यकर्ते हे सीजनेबल नेते वाटतात अशा स्वरूपाचा खोचक टोमणा व टोला पवार यांनी कूल यांच्या वक्तव्यावर लावला आहे…
दौंड तालुक्यात तीस वर्ष कुल परिवारा वर या तालुक्यातील जनतेने प्रेम केल त्यांच्यासाठी निष्ठेने झटलेले असंख्य कार्यकर्ते होते त्याच त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत.वडिलांच्या काळात वर्गणी करून नेतृत्व उभारणाऱ्या जनतेने तीस वर्ष सत्ता दिली आहेत.या तीस वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने तुमची भाषा बदलली आहे असा प्रश्न त्यांनी कुल यांच्या राजकीय प्रवासा बाबत व्यक्त केले आहे..
पुढे ते म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये कोण सिजनीबल नेता याचे उत्तर मतदान रुपी उघडपणे दिसेल यात शंका नाही..
ज्या काळात त्यांच्या बरोबर कोणी नव्हते त्या काळात त्यांच्या बरोबर जाऊन त्यांना राजकारणात मदत केली,कुलासाठी असलेले विरोधक आणि माझे त्यांच्याशी कुठलेही वैर नसताना त्यांच्यावर बिनधास्त पने टीका-टिप्पणी केली..
मी त्यांच्यासाठी स्तुतीसुमने उधळत असताना समोरच्या कडवट शब्दात टीकेचे धनी ठरवत होतो त्या वेळी तुमच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे श्रेष्ठ आणि तेच विरोधात गेले की ते भ्रष्ट हा तुमचा व्यवहार या दौंड तालुक्यातील जनतेला आता मी सांगावा असा राहिलेला नाही..
लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर हे सर्वांचेच लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात मात्र स्वार्थासाठी बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि काम झाल की संबंधित कार्यकर्त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे ही असलेली वृत्ती त्यांनी बदलली पाहिजे होती आपल्यापासून कार्यकर्ते का दुरावतात का लांब जातात आपण त्यांना का सिजनीबल म्हणू लागलो यावर स्वतः चिंतन करण्याची गरज त्यांना होती.
मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी त्यान सुचलेली आहे म्हणूनच ते एके काळी मदत करणाऱ्यांना चितावणी खोर उपमा देऊ लागले असल्याने त्यांना त्याची किंमत येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानातून दिसेलच यात शंका बाळगण्याचे कारण नाही अशी माहिती सुद्धा त्यांनी आवाज लोकशाहीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलेली आहे…
कुल यांनी पिंपळगाव मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात या बाबत योग्य ती माहिती देऊन समाजातील घटकांसाठी ही योजना किती महत्त्वाची आहे त्यासाठी मी कस काम केल याची माहिती देणे गरजेचे असताना ते हा एखाद्या विषयाचा मनात असलेला रोष यानिमित्ताने व्यक्त केलेला आहे,त्यांची नीतिमत्ता बोलण्याची भाषा ही लोकप्रतिनिधी लायक नसून एखाद्यावर खुन्नस व्यक्त करण्यासारखी आहे.आगामी काळातल विधानसभेची निवडणूक दौंड मध्ये लक्षवेधी होईल याचा विपरीत परिणाम मतदार आणि आमच्या सारखे कार्यकर्ते कुल यांना दाखवून देतील अशी माहिती त्यांनी दिली आहे..