तात्या! एकदा विचारा नेत्यांना कोण ? आहेत सिजनिबल पुढारी “होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी”अशा स्वरूपाची आव्हान बाळासाहेब लाटकरांसाठी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी केले आहे..
तात्या एकदा होऊन जाऊद्या कोण? आहेत नेत्याच्या मनात आणि तुमच्या ध्यानात,करा जाहीर ! मार हातोडा तुमच्या शिवाय हे कोणी करणारच नाही..
आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी
अहो तात्या ते विधान नंदू पवारांसाठी नव्हतेच तर मग कोणासाठी होते याचा स्टॅम्प मारून निर्णय जाहीर करा च विचारा नेत्यांना कोण आहेत सिजनिबल पुढारी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी अशा स्वरूपाचे आव्हान बाळासाहेब लाटकर यांच्यासाठी जय शिवराय शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी उभे केले आहे..
तालुक्यात पिंपळगाव येथे पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी जाहीर भाषणातून सिजनीबल पुढाऱ्यांकडे लक्ष देऊ नका अशा स्वरूपाचे विधान केल्याने दौंड तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे..
तालुक्यातील ज्येष्ठ नेते नंदू पवार यांनी या वक्तव्याचा समाचार घेताना आपली कडवट प्रतिक्रिया जाहीर केल्याने या प्रतिक्रिया वरती दुसरे जेष्ठ नेते बाळासाहेब लाटकर यांनी हे वाक्य नंदू पवारांसाठी नव्हतेच अशा स्वरूपाची बातमी सोशल मीडिया वरती प्रकाशित करून नंदू पवारांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता.लाटकर उर्फ तात्या यांच्या बातमीचा आधार घेऊन साळुंखे यांनी त्यांना आवाहन केले आहे..
तालुक्यात आता सिजनिबल नेत्याच्या वक्तव्याचा मोठा धुराळा उडला असून या धुराळामुळे शाब्दिक कचरा अनेक नेत्या पैकि कोनाच्या डोळ्यात तर कुणाच्या डोक्यात घुसला आहे..
साळुंखे म्हणाले,तात्या तुम्ही नंदू पवारांचा आदर केला आम्ही तुमचा आदर करतो मात्र नेत्यांनी जाहीर भाषणातून सिजनबेल पुढाऱ्यांचा नामो उल्लेख केलेला आहे या सर्व नेत्यांची माहिती आपणच मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे त्याचवेळी मतदारांमध्ये या सिजनिबल पुढऱ्या बद्दल क्रोध मत्सर व द्वेष निर्माण होईल आणि त्याचा फायदा आपल्या नेत्याच्या मतदानासाठी होईल म्हणूनच आता ही नावे जाहीर करणे ही काळाची गरज आहे तुम्ही एकदा त्याच्यावर शिक्का मोर्तब कराच आणि ही नावे जाहीर करा अशा स्वरूपाचं माझ ठाम मत आहे..
सिजनेबल पुढाऱ्या सुळसुळाट खरच तालुक्यात झालेला आहे का ? आणि हे पुढारी या नेतृत्वालाच माहिती आहेत की अन्य लोकांना सूधा याची परिचित आहेत मग कोणासाठी होते याचा स्टॅम्प मारून निर्णय जाहीर कराच विचारा नेत्यांना कोण आहेत सिजनिबल पुढारी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी अशा स्वरूपाची आव्हानच बाळासाहेब लाटकर यांच्यासाठी जय शिवराय शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी उभे केले आहे
साळुंखे यांच्या या विषयामुळे आता तालुक्यामध्ये सिजनीबल पुढारी कोण हा प्रश्न ऐरणीवरचा विषय झाला असून लाटकर तात्या ते जाहीर करणार का याकडे मात्र तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे..
सिजनेबल नेत्यांचा सुळसुळाट खरच तालुक्यात झालेला आहे का ?आणि हे नेते या नेतृत्वालाच माहिती आहेत की अन्य लोकना सुधा याची परिचित आहेत हा सुद्धा प्रश्न आता यक्ष बनलेला आहे
अशा विषयाने राजकीय वातावरण चांगले तापणार असून काही राजकीय विचारवंत म्हणतात सिजनी बल पुढाऱ्यांन मध्ये कोणी निष्ठावंत होऊन कामाला तर लागला नाही ना अशी शंका सुद्धा ते व्यक्त करू लागले आहेत..
तसेच काही जण प्रतिक्रया देताना म्हणू लागले की आता सिजनिबल पुढाऱ्यांचा विषयाचा फडशा पडलाच पाहिजे ती नावं जाहीर झालीच पाहिजे आणि नेत्यांनी सुधा करावीच अशी अपेक्षा व्यक्त करू लागले आहेत..
दौंड तालुक्यात आता सिजनिबल पुढाऱ्यांचा विषय चांगलाच वादग्रस्त झाला असून याचे पडसाद अजून कसे उमटतील याचा भरोसा नसला तरी साळुंखे म्हणतात तात्या एकदा होऊन जाऊद्या कोण? आहेत नेत्याच्या मनात आणि तुमच्या ध्यानात,करा जाहीर ! मार हातोडा तुमच्या शिवाय हे कोणी करणारच नाही अशी अपेक्षा साळुंके यांनी या निमित्त व्यक्त केली आहे…