बातम्या तो आरोग्य दुत नाही मात्र आमच्या साठी यमदूत आहे ….जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे यांचा राहुल कूल यांच्यावर डायरेक्ट आरोप.. By Team Awaj Lokshahicha - September 29, 2024 18 FacebookTwitterPinterestWhatsApp आवाज लोकशाहीचादौंड:प्रतिनिधी वेळ मारून नेण्यासाठी ज्यांनी आमची देणी पंधरा दिवसात देण्याची भाषा केली आहे.त्यांच्यावर आमचा बिलकुल भरोसा नाही लोक म्हणत असतील आरोग्य दुत पण आमच्यासाठी तो यमदुत आहेत अशी संतप्त टीका टिप्पणी तालुक्याचे आमदार व भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्या बाबत जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे..भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली आहे.सभा सुरू असताना निवृत्त कामगार बाहेर निघून आले होते या वेळी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ या सर्व कामगारांनी वरील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे..सभा चालू असताना चेअरमन यांनी सेवा निवृत्त कामगारांच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले पंधरा दिवसात कामगारांची मागील सर्व देणी दिली जाणार आहेत असे आश्वासन त्यांनी सभेला आलेल्या सभासदांना दिले असताना याचा धागा पकडुन कामगार नेते काळे यांनी त्यांच्या बाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे..काळे बोलताना म्हणाले राहुल कूल हे विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नाहीत गेली आठ – दहा वर्ष सेवानिवृत्त कामगारांच्या बाबत मी चर्चा करतो आहे..मात्र प्रश्न सोडवत नाही जवळ पास पाचशे अधिक कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यात जवळपास ५५ कामगारांचा मृत्य झालेला आहे.आता प्रयत्न मयत आणि हयात असलेल्या कोणत्याच कामगारांचे सेवानिवृत्ती नंतरचे पैसे दिले नाहीत ते देणे बाजूला सोडा साधी व्यवस्थित चर्चा सुद्धा करत नाही.या सर्व गोष्टींना जवळपास आठ-दहा वर्ष होत आले आहेत. यामध्ये जवळपास ५५ कामगारांचा मृत्यू झालेला आहे.यांना अजून किती कामगार मरणे अपेक्षित आहे. मग ते देणी देऊ शकतील का ? असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे…ते पुढे म्हणाले समाजामध्ये कोणी म्हणत असेल त्यांना आरोग्य दुत मात्र आमच्यासाठी ते यमदूत बनले आहेत.२ऑक्टोबर रोजी या कारखानास्थळा वरती आम्ही चक्री उपोषण करणार आहोत. आठ दिवसाच्या चक्री उपोषणानंतर आमरण उपोषणाचा नारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे..या वरून ही त्यांनी आमची देणी आणि आमच्या मागन्या याचा गंभीर विचार केला नाही तर कारखान्याचा सिझन सुरू होणार होऊ देणार नाही आणि कोणाला ही आत जाऊ देणार नाही यामध्ये आम्ही माघार घेणार नाही अशा स्वरूपाचा निश्चय सुद्धा त्यांनी ठामपणे व्यक्त केला आहे..आता नाही तर कधीच नाही अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी सर्व कामगारांच्या वतीने व्यक्त केली काळे यांच्या संतप्त विचार लक्षात घेता आगामी काळामध्ये सेवानिवृत्त कामगार आणी कारखाना व्यवस्थापन यांची लढाई मोठी गंभीर होणार आहे की काय असाच प्रश्न निर्माण झालेला आहे..विद्यमान कामगार युनियन आणि निवृत्त कामगार सेवा यांचा अद्यापही मेळ बसलेला नाही असे चित्र या सभेच्या वेळी दिसून आले..याप्रसंगी विद्यमान कामगार युनियनचे एक प्रतिनिधी केशव दिवेकर यांनी चेअरमन आणि आमची चर्चा झालेली असून पंधरा दिवसात ते सर्व कामे करतील अशा स्वरूपाचे त्यांनी मला आश्वासन दिलेले अशी माहिती दिली आहे..दुसऱ्या बाजूला याचं काही खरं नाही गेल्या आठ ते दहा वर्षात आम्हाला फसवलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे चुकीचे कारण असून आम्ही आता कसलेही परिस्थितीत आंदोलन करणार आहोतच अशा स्वरूपाचा ठाम मत सेवानिवृत्त कामगार यांच्या वतीने काळे यांनी व्यक्त केले आले आहे..दोघांमध्ये आता श्रेय वादाची तसेच आपापल्या मागण्यांची शाब्दिक चकमक होणार का ? याची शंका निर्माण होऊ लागली आहे