कपाळाला लावयाला  कारखान्याची माती राहील का? भीमा पाटस च्या भाडेतत्त्वावरील विषयाने तालुक्यात चर्चा

21

 

भीमा सहकारी साखर कारखाना विकला का? का चालवयाला  दिला याचे ठोस उत्तर सभासदांना देण्यास चेअरमन राहुल कुल व  संचालक मंडळ अयशस्वी ठरल्याने कारखान्याचे नक्की यांनी काय केले आहे ? याची मोठी चर्चा तालुक्यात सुरू झालेली आहे..

भीमा पाटस साखर कारखान्याची माती पूर्वी ऊस उत्पादक सभासदांची होती ती आता राहील की  काय ? या प्रश्नांचे उत्तर अद्याप अनुत्तीर्णच आहे म्हणून भविष्यात येथील माती सभासदांच्या  कपाळाला तरी लावायला मिळेल का हा प्रश्न यक्ष बनला आहे

आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

पाटस (ता.दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना विकला का? का चालवयाला  दिला याचे ठोस उत्तर सभासदांना देण्यास चेअरमन राहुल कुल व  संचालक मंडळ अयशस्वी ठरल्याने कारखान्याचे नक्की यांनी काय केले आहे ? याची मोठी चर्चा तालुक्यात सुरू झालेली आहे  भविष्य कारखान्याची माती तरी सभासदांच्या कपाळाला लावायला मिळेल का? अशी शंका सभासदांना वाटू लागली आहे  कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळी व वादळी झाली असताना या सभेचे वातावरण दौंड तालुक्यात पसरले आहे आणि चर्चेला उधाण आले आहे

भीमा पाटस कारखाना स्थळावर नुकत्याच झालेल्या ४२ व्या सर्वसाधारण सभेने या प्रकार उघड झाला आहे साखर कारखाना सहकारी आहे.म्हणूनच सभा होत आहे अशी माहिती देणाऱ्यानी अद्याप  कारखाना चालवायला दिल्याची कागदपत्रे दाखवलेली नाहीत.एक सिजन चालवायला दिल्यावर हा गोंधळ झालेला असला तरी त्यात साई प्रिया आणि निराणी दोन या दोन नावाने कारखान्यावर फलक लावण्यात आलेले होते.
त्याचं सभासदांनी सभेत प्रश्न विचारून लक्ष वेधले होते .ते सुधा समर्पक उत्तर त्यानं मिळाले नाही
.या प्रकाराने कारखाना नक्की कोणाचा निराणी ग्रुप की साई-प्रिया चालवत आहे याचा तपास तालुक्यातील सभासदासह नागरिकांना लागेनासा झाला आहे..

गेली पंचवीस वर्षांपूर्वी हा कारखाना चोरांच्या ताब्यात नको पोराच्या (त्या वेळी त्यांचे वय नसताना त्यांना रमेश ठोर्ता यांनी  चेरमन  केले होते)यांच्या ताब्यात द्या या जोष्यात कारखान्यावरती विद्यमान आमदार राहुल कुल यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्याच राहुल कुलांनी कारखान्यावर सभासदांना कुसाळे घालणार का? या भाषेत सुनावले  आहे ,हे दुर्दैव म्हणावे की काय? असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने तालुक्यात उपस्थित झालेला आहे..

कारखाना ताब्यात घेतल्या त्यावेळीची कारखान्याची परिस्थिती ज्यांच्याकडून ताब्यात घेतला ते माजी आमदार रमेश थोरात यांनी वारवार सभासदांपुढे जाहीर केलेली होती आणि तिचा संपूर्ण तपशील तत्कालीन वार्षिक अहवाल पुस्तिकेमध्ये प्रकाशित सुद्धा झालेला आहे…

कारखान्यावरती शिल्लक असणारी साखर त्यावेळेस कामगारांची असलेली देणे आणि साखरेचासाठा याबाबतचा खरा तपशील अद्याप सुद्धा सध्या ज्यांच्या ताब्यात आहे त्या कुल आणि संचालक बोर्डाने प्रामाणिकपणाने सांगितले नाही अशी ओरड माजी आमदार रमेश थोरात हे वारवार करीत आहे…

बावीस वर्षे कारखाना चालवणाऱ्या कुल आणि संचालक मंडळांनी कामगाराची थकीत देणे शासनाचे थकीत देणे सध्या असलेले कारखान्यावरचे कर्ज आणि शेतकऱ्यांना वारंवार दिलेला कमी बाजार भाव याबाबतची खरी माहिती समजू दिलेली नाही विशेष म्हणजे कारखाना बंद सुधा पडला होता .

या  कालखंडामधील झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सभासद विचारायला आली असताना राजकीय सामर्थ्याच्या जोरावरती आणि आपल्या डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अंध भक्तांच्या पाठिंब्यावरती गोंधळ निर्माण करीत त्यांची मुस्काट दाबी करून मागील सभा संपुष्टात आणण्यात आलेल्या होत्या..

मात्र यंदाची पहिली सभा अशी होती की त्यामध्ये सभासदांनी चेअरमन आणि संचालक बोर्डाला वेठीस धरून या सर्व बाबीच्या प्रश्नांना तोंड फोडलेले आहे..

नेहमीप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात झालेली आमची सभा असा टाहो फोडलेल्या चेअरमन साहेबांच्या विरोधामध्ये तात्यासाहेब ताम्हाणे यांनी बोलून दिल्याने माईक फेकण्याचा प्रकार घडला हे चित्र त्यांना दाबून ठेवता आलेले नाही.

कारखान्याची वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्हाला सांगा असा नामदेव ताकवणे यांचा प्रश्न चेअरमन यांना अधिक गुंत्याचा वाटला होता त्याला उत्तर देताना त्यांची अवस्था बिकट झालेली सभेतील सर्वांनी पहिली आहे..

रमेश थोरात यांनी कारखान्याच्या संदर्भातील कागदपत्राची मागणी करण्याचा प्रश्न उपस्थित केला असता जिल्हा बँकेमध्ये तुम्ही आहात आणि जिल्हा बँकेची कार्यप्रणाली कशी आहे. जिल्हा बँकेने व राज्य बॅंकेने या कारखान्यासाठी काय केलं याची आपल्याला माहिती नसेल तर जिल्हा बँकेच्या कार्यप्रणाली वरती शंका उपस्थित करीत कुल यांनी सरळ राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरच निशाणा साधला होता
जिल्हा बँक अजित पवार यांच्या मार्गदर्शना खाली चालवली जाते हे ते सरळ विसरले त्यांनी जाणून-बुजून तो प्रश्न उपस्थित केला हा प्रकार संशोधनाचा विषय बनला आहे

नामदेव ताकवणे यांनी हा प्रश्न उचलून धरत जिल्हा बँक आणि राज्य बॅंक जर कारखान्याने मदत केली असेल तो चालवायला दिला असेल तर कुल व संचालक मंडळांनी आपली पिट का  बडवावी अशी जाहीर माहिती प्रसार माध्यमांना दिलेली आहे..

या प्रकाराने तालुक्यात नुकतीच झालेल्या सर्वसाधारण सभेने तालुक्यात राजकीय धुरळा उडवला असून भितिखाली असलेल्या राजकारणाने उसळी घेतली आहे..

सत्तेच्या बळावर मागील अनेक वर्षाची ही सभा रेटून नेणाऱ्या चेरमन आणि संचालक बोर्डाला हतबल व्हावे लागले आहे.निष्ठावतांच्या गोंधळ आणि सभासदांना राबणाऱ्या दर वर्षीच्या सभेतील प्रकार यंदा सभादांच्या आक्रमक पवित्र्याने नामोहरम होताना दिसला आहे..

सभा स्थळाची माती पूर्वी ऊस उत्पादक सभासदांची होती ती आता विकली गेली की काय ? या प्रश्नांचे उत्तर अद्याप अनुत्तीर्णच आहे म्हणून भविष्यात येथील माती सभासदांच्या कपाळा ला तरी लावायला मिळेल का? असा नवीन प्रश्न या निमित्ताने पुढे येणे सहाजिकच आहे..

पंचवीस वर्षानंतर यातील किती सभासद जिवंत राहतील हा कळीचा मुद्दा असला तरी चालवाय दिलेला आणि करार करणारे सुद्धा हयात असतील का नसती हा प्रश्न खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाचा आहे.पुढील भविष्य काळामध्ये सध्या पंचवीस वर्षे ताब्यात घेतलेल्या या कारखान्याचे खाजगी मालक सभासदांच्या वारसांना कारखान्याची माती कपाळाला लावून देतील का? आणि त्या वारसांना कोण सांगणार हा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना होता या सर्वच प्रश्नांचा गुंता तालुक्याच्या साठी आता महत्त्वाचा जरी असला तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तो वादळयासारखा तालुका वर घोंगावू लागलेला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here