आवाज लोकशाहीचा
यवत:प्रतिनिधी
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त नंतर व्याधीनी त्रस्त झालेल्या वृद्ध कामगारांना शारीरिक व्यथांनी बसल त उठता येत नाही उठल तर चालता येत नाही चालल तर पळता येत नाही अशी अवस्था असताना, पोलिसानकडून जमावबंदीची नोटीस पाठवली जाते व कायदा सुव्यवस्था तुम्ही खराब केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल हे नोटीस कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल अशा स्वरूपाची तंबी देऊन भीती दाखवण्याचे पाप चेअरमन तथा तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केला आहे.
अशा स्वरूपाचा आरोप कारखाना स्थळावरती चक्री उपोषण करणाऱ्या सेवानिवृत्त कामगारांनी केला असून ते म्हणाले राहुल कुला च्या दहशत दबावाला आम्ही बळी पडणार नाही,अशा स्वरूपाची संतप्त भावना त्यांनी या निमित्त व्यक्त केली आहे..
कारखाना स्थळी त्यांच्या चक्री उपोषणाचा दुसरा दिवस होता यावेळी त्यांनी आपल्या संतप्त भावना पत्रकारांसमोर व्यक्त केल्या आहेत
ज्या कामगारानी ग्रामीण पोलीस अधीक्षक,जिल्हाधिकारी, यवत पोलीस अधिकारी,दौंड तहसीलदार,साखर आयुक्त, कारखान्याचे व्यवस्थापन या सर्वांना गेली महिन्यापूर्वी कारखाना स्थळावरती चक्री उपोषण करणार आहे. याबाबत लेखी स्वरूपाने कळविलेले असताना सुद्धा पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांनी जमाबंदीची नोटीस पाठवली आहे.ही बाब त्यांच्या प्रामाणिक पणाच्या कारभारावर शंका उपस्थित करणारी आहे
जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे यांना नोटीस पाठवलेले असून कायदा सुव्यवस्थेचे या ठिकाणी उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल आणि न्यायालयीन व्यवस्था कामकाजासाठी ही नोटीस पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल अशा स्वरूपाची तंबी देण्यात आलेली आहे…
यामुळे कामगार संतप्त झाले आणि आपल्या प्रतिक्रिया देताना म्हणाले सेवानिवृत्त झाल्यावर आज आमचा उतरत्या वयाकडे आमचा प्रवास सुरू आहे. आमच्या घामाचे दाम मिळावे म्हणून राहुल कुल आणि कारखान्या व्यवस्थापनाकडे वारंवार अनेक वेळा गेले दहा वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करीत आलो आहोत मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत, आणि आमच्यावर दाब आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने ते करतात ही त्यांच्या कडे असलेल्या पदाचा गैरवापर करणारी गोष्ट आहे..
कुल तसे वृद्धांचा सन्मान करणाऱ्या पैकी नाहीतच असा राहूल कुल यांच्यावरती आरोप करताना ते म्हणाले जुलै महिन्यामध्ये कूल यांनी राहू येथील त्यांच्या राहत्या घरी कामगारांना भेटीसाठी बोलवले होते. सुमारे चार तास त्यांनी भेट दिली नाही दरम्यानच्या काळात या वृद्धांपैकी अनेकांना डायबिटीस शुगर आणि अनेक शारीरिक व्याधी असताना सुद्धा वाट बघत थांबावे लागले हे त्यांनी कुल यांच्या स्वभावाच्या बाबतचा दाखल सुधा दिला, आणि म्हणाले वडीलधाऱ्यांची इज्जत करणे सन्मान करणे त्यांच्या रक्तात नाही हे त्यादिवशी दिसून आले आहे…
आम्हा निवृत्त कामगारांच्या पैकी आमच्यातील ५५ सहकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.यांच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाक्याची आहे सेवानिवृत्तीनंतर या मयत सहकाऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम देण्यात आले नाही मात्र वेळोवेळी बहाणे करीत एक प्रकारे टिंगल आणि टवाळीच त्यांनी केलेली आहे.आम्ही अत्यंत शांतमय वातावरणातून चक्री उपोषण करण्याचे ठरविले आहे याची पूर्व सूचना एक महिन्यापूर्वी आमचे प्रतिनिधी शिवाजीराव काळे यांनी दिली असताना नोटीस प्रकार म्हणजे अति शहाणपणाचे लक्षण म्हणावं लागेल.आमच्या उपोषणाला अडचण निर्माण व्हावी आम्ही स्थगित करावं आम्ही यातून माघार घ्यावी यासाठी राहुल कुल यांनी विविध स्वरूपाचे प्रयत्न केले त्यांचे दोन दूत यांनी सुद्धा भेट घेऊन हे आंदोलन रद्द करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यात यश मिळत नसल्याने त्यांनी ही नौटंकी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जमाबंदी आदेश असल्याची नोटीस बनवण्यासाठी पोलिसांची मदत घेतलीं आहे..
जमाबंदी आदेशामागे लोकांनी एकत्रित न येणे हा प्रकार असतो असा समज आमचा असून आम्ही एकत्र येतोय त्याची धास्ती त्यांनी घेतल्याने हा प्रकार केला असावा कारखाना स्थळावरती सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अनेक सभासद संचालक मंडळ विरोधी पक्षाचे लोक मोठ्या संख्येने एका ठिकाणी येऊन शाब्दिक वादावादी करत माइक फेकून देण इतपतची परिस्थिती घडली आणि स्वता अधिकारी देशमुख यांनी ती पाहिलेली आहे..
राहुल कुल यांनी बोरमलनाथ मंदिर येथे सामाजिक काम केल्याचा देखावा करण्यासाठी आरोग्य शिबिर विधवा महिलेस मदत मजूर कामगारांना पेटी वाटप शेतकरी मेळावा हे कार्यक्रम घेतले आहेत हे सर्व कार्यक्रमाला यवत पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांना यावेळी जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी करता का ?आली नाही असा आरोप आम्ही करणे योग्य नसून कदाचित ते विसरले असतील असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.अशी टीका-टिपणी अधिकारी देशमुख यांच्या बाबत करणाऱ्या या कामगारांनी मत व्यक्त करताना म्हणाले कुल यांनी आपले राजकीय वजन आमचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी आम्हाला भीती दाखवण्यासाठी या अधिकाऱ्यांमार्फत वापरलेले आहे असे आम्हाला वाटते.असे सांगून ते म्हणाले कूल यांना विरोध करणाऱ्यांसाठी पोलिसांचा वापर करण्याची ही नव्याने सवय नाही ही बाब सर्वस्वत आहे.
मागील काळामध्ये कारखान्यावरती वरवंड येथील ऊस दराबाबत काहीं मान्यवरांनी उपोषणाचा कार्यक्रम कारखाना रोडवर सध्या असलेल्या उड्डाणपूला शेजारी केला होता.तत्कालीन पोलिस अधिकारी महादेव चव्हाण यांच्या मदतीने सत्तेत असलेल्या कुल कुटुंबियांकडून उधळवण्यात आला रात्री त्यांच्यावर अचानक.आघात केला गेला याचे पडसाद वरवंड गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उमटले राज्य राखीव पोलीस दलाने गावकऱ्यांसह शेतमजूर पाहुणे आणि प्रवासी यांना जोडपून काढले याची आठवण यानिमित्ताने त्यांनी करून दिली आहे…
शेवटी म्हणाले आम्ही वयोवृद्ध झालो आहोत जमिनीवर बसलो तर काही न उठता येत नाही उठले तर उभे राहणे अवघड असते हातपाय थरथर कापतात तोल जातो की काय याची भीती वाटते कसे तरी उभे राहिलो तर चालणे अवघड असते कोणाचातरी हात धरून सहारा घेऊन चालावा लागते चालणाऱ्यांना पळता येईल अशी अवस्था नसते.
अशा अवस्थेत असणारे आम्ही आरोग्याच्या अनेक व्याधींनी त्रस्त आहोत नजर दोष डायबिटीस शुगर संधिवात या बाबी वेगळ्याच असलेल्या सर्वांनी चक्री उपोषणाच्या ठिकाणी सदनशीर मार्गाने आंदोलन सुरू केलेले असून त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्था भंग होईल अशी नोटीसा तंबी देणे हे या पोलीस अधिकाऱ्याचे काम नसून त्याला ती देण्यास भाग पाडलेले आहे आणि तिच्या पाठीमागे चेअरमन राहुल कुल यांनी आपल्या आमदारकीचा वापर केला आहे अशाच आरोप सुद्धा केला आहे.आणि म्हणाले आम्ही त्यांच्या झुंडशाहीला दबावाला आणि दहशतीला बळी पडणार नाही.