विशेष:प्रतिनिधी -एम जी-शेलार
आवाज :- लोकशाहीचा
__________________________
पुणे:प्रतिनिधी
भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी भिमा सहकारी साखर कारखान्याचे वाटोळे केले आहे.यासह त्यांनी सेवानिवृत्त ५०० कामगारांचेही वाटोळे केले असल्याने आता हेच कामगार कुल यांना पराभवाच्या खाईकडे लोटतीलच असा घणाघात राजाभाऊ तांबे यांनी कामगार आंदोलन भेटी प्रसंगी बोलताना केला आहे.
४५० हुन अधिक सेवानिवृत्त कामगार आपल्या कारखान्या कडुन येणे असलेले पैसे मिळावेत यासाठी गेली आठ वर्ष लढा देत आहेत.दिरंगाईची ही परिसिमा असते. तरि ही अध्यक्ष कुल यांना कणव येत नाही.कामगार आज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस कुंठित आहेत.कामगारांचे ५५ कोटी रुपये देणे आहे.या सर्व परिस्थीतीला कंटाळुन ते आज ते उपोषणास बसलेले आहेत.
अतिशय चांगल्या स्थितीत असलेला कारखाना भ्रष्टाचार करुन कारखान्याचे वाटोळे आमदार राहुल कुल यांनी केले आहे. भिमाचे भ्रष्टाचार करुन खाल्लेल्या पैशाने कुल अहमपणाने वागत आहेत.त्यांनी सेवानिवृत्त कामगार यांच्या जीवनाशी क्रुर चेष्टा चालवली आहे.तालुकयात आरोग्य-दुत म्हणुन टिमकी वाजवत मिरवणाऱ्या कुल यांना कामगारांचा रोष ओढवुन न घेता त्यांची देणी त्वरीत देवुन माणुसकी दाखवावी. अन्यथा हेच कामगार कुल यांना दारुण पराभवाच्या खाईत कडेलोट करतील. असा इशारा तांबे यांनी कुल यांना दिला आहे..
विशेष वाचा : भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी आम्हा सेवानिवृत्त कामगारांना आमच्या न्याय्य हक्कांचे पैसे देण्याचे टाळत आले आहेतच याहुन शरमेची बाब म्हणजे ते सातत्याने जाणीवपुर्वक आम्हाला माणुसकी हीन वागणूक देत आले असुन आमचा अपमान करण्याची त्यांनी आज पर्यंत एकही संधी सोडली नाही.तरिही मी संयम सोडलेला नाही.मी तोंड ऊघडले तर कुल यांना दिवसा-तारे दाखवेन असे उदगार कुलांना अत्यंत अडचणीच्या काळात मोलाचे सहकार्य करणारे कामगार संघटना माजी अध्यक्ष जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे त्वेषाने व्यक्त केले आहेत.