आवाज लोकशाहीचा
केडगाव:प्रतिनिधी
चक्री उपोषणाच आंदोलन पेटले असून त्याचा चटका काही भक्तांच्या बुडाला लागलेला आहे.कामगारांच्या मूळ मतदानावर काहीच फरक पडत नाही मत विकत घेतली जातात आणि त्याची तयारी जय्यत तयारी झालेली आहे अश्या स्वरूपाची भाषा ते करू लागले असून त्यांनीं नेता निष्ठाची कोल्हे कोई सुरू झाली आहे
दौंड तालुक्यात विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावरती भीमा सहकारी साखर कारखान्यावरती काम केलेल्या सेवानिवृत्त कामगारांच्या देणेबाबत चक्री उपोषणाला त्यांनी सुरु केलेले आहे.उपोषणाचा चौथा दिवस असून या उपोषणातील वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जमावबंदी आदेशाची नोटीस सुद्धा देण्याचा प्रयत्न झालेला आहे या नोटीसाला भीक न घालता संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी चक्री उपोषणास सुरुवात केली होती..
त्यांच्या उपोषणा बाबतच्या घडामोडी सोशल मीडियावरून तालुका भर वादळी वाऱ्यासारख्या घोंगावत असताना कामगार विरोधी आणि चेअरमन प्रेमी भक्तांनी आंदोलनाच्या बाबतची नकारात्मक आणि आपल्या नेत्या साठी सकारात्मक शाब्दिक वादाला सुरुवात केली आहे.५५ कोटी रुपयांची देणी मिळवण्यासाठी गेले सात आठ वर्षांपूर्वी लढा सुरू केलेला आहे.या दरम्यान ५५ अधिक कामगार मृत झालेले आहेत हा संतप्त जनक विषय सर्व सामान्य नागरिकांची भावना बनलेला आहे.
कष्ट करून सेवानिवृत्त झालेली ही कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ५०० च्या घरात आहे.वृद्ध काळाकडे वाटचाल करणारे ह्या कामगारांना आता शारीरिक व्याधी बऱ्यापैकी लागलेले आहे सेवानिवृत्तीचा काळ हा त्यांच्यासाठी सुखकारक असायला पाहिजे होता मात्र त्यांना त्यांच्या हिताच्या दामासाठी झगडण्यास भाग पाडत आहे.तीन दिवसापासून आंदोलन दिवसान दिवस तप्त होऊन तापू लागलेला असताना त्याचे चटके मात्र सोशल मीडियाच्या विषयाने या भक्तांच्या बुडाला लागू लागले आहेत..
विधानसभेच्या मतदानाचा विषय याच्याशी जोडू ते या वृद्धांना टीकाटिप्पणीने टार्गेट करू लागलेले आहे वृद्धांचा सन्मान करणारी महाराष्ट्राची संस्कृती या वायफळ बडबड करणाऱ्या विचारवंतांनी आता पायाखाली तुडवण्यास सुरुवात केली आहे.हा प्रकार नेता निष्ठेसाठी जरी असला तरी त्यांच्या औकाती यामुळे लोकांना दिसू लागलेल्या आहेत
आंदोलकांना खरंच त्यांच्या नेत्याला विरोध करतात का? आणि ते मुद्दामून करतात का ?याचा त्यांनी कटाक्षाने अभ्यास करण्यापेक्षा नेता निष्ठाच्या प्रेमापाई त्यांच्या आयुष्यातील कमाईच्या दामाकडे ते राजकारण म्हणून पाहू लागले आहेत.तालुक्यामध्ये हा प्रकार पश्चिम पट्ट्यातील केडगाव येवत वरवंड आणि राहू बेटातील काही भागात असला तरी यातूनही प्रचंड निष्ठावंत असणारे हे भक्त केडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात दिसत आहे..
आगामी काळात येणारे विधानसभा ही कोण लढणार कोण विजयी होणार हा प्रश्न निवडणुकीच्या नंतर ठरला असला तरी या सर्वांच्या मनात आणि ध्यानात आपल्या नेतृत्वाविषयीची निष्ठा ठासून भरली असल्याने त्यांना कामगारांचां तिरस्कार जाणवू लागला आहे..
आंदोलन कामगारांचे आहे विषय त्यांच्या थकीत रकमेचा असून मिळवण्यासाठी त्यांचं चक्री उपोषण चालू असताना खेद आणि दुःख मात्र या भक्तांना जास्त झाल्याचे चित्र त्यांच्या सोशल मीडियावरील प्रचार आणि प्रसारात दिसून येत आहे..
या कामगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन तापू लागले असून चटके मात्र यांच्या बुडाला बसू लागले आहेत म्हणूनच अविचारी पणाने वृद्ध कामगारांच्या विषयी त्यांच्या तोंडातून नेता निश्चितीची आग बाहेर पडू लागलेली असून त्यांची कोल्हे कुई केडगाव आणि परिसरात ऐकण्यास मिळत आहे