कुल परिवार प्रामाणिक मदत करणाऱ्यांसाठी बेईमान…जेष्ठ नेते नंदू पवार

21
जेष्ठ नेते नंदू पवार चक्री उपोषण कर्त्यांपुढे भाषण करताना

आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

कुल कुटुंबांना आजचे सुखाचे दिवस ज्यांच्या मुळे पाहण्यास मिळाले त्यांची त्यांनी फिकीर केली नाही.आता तुमची आणि दौंड तालुक्यातील जनतेची तमा कशी बाळगतील अशा स्वरूपाची बेधडक टीका ज्येष्ठ नेते नंदूभाऊ पवार यांनी आमदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्याबाबत जाहीररित्या केली आहे..

सेवानिवृत्त कामगारांच्या चक्री उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पवार हे कारखाना स्थळावर आले होते.यावेळी त्यांनी सर्व कामगार बंधूंची आस्थाने विचारपूस करीत त्यांच्यावरील प्रसंग बाबत नाराजी व्यक्त करीत त्यांनी कुल यांच्यावरती वरील टीका केली आहे.

नंदूभाऊ म्हणाले घोडा चिन्हावर या दौंड तालुक्यामध्ये अपक्ष आमदार म्हणून कुल घराण्याचे स्वर्गीय सुभाष कूल यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार रमेश थोरात  आणि माझ्या सह काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतल होत.माझ्या सह सर्व कार्यकर्ते आज त्याला दुश्मन वाटतात.

घरात आमदारकी आल्या नंतर कुल परिवाराला बहार आला परिवाराची भरभराट झाली तालुक्यातून राज्यभर ओळख झाली त्याचा परिणाम वेगळा झालं आई,बरोबर स्वतः राहुल कुल राजकारणात आले राज्यभरातील राजकारण्यांचे त्यांची ओळख झाली आहे.
आज सत्तेची मस्ती त्यांच्या अंगात आहे निष्ठावंत त्यांना दुश्मन वाटू लागले आहेत.त्याचा आजचा कारभार पाहिल्यास यवत आणि दौंड च्या विश्रामगृहात ठेकेदारांच्या गराड्यात असतो.काही चमचे त्याच्यासाठी चाटूगिरीची भूमिका बजावत आहेत असे सांगताना ते म्हणाले सोनवडी गावचा एक चमचा त्याचा निष्ठावंत असून वसुली करणारा पंट्टर आहे..

आर्थिक बळकटी झाल्याने नागरिकांसाठी अरे-रावीची भाषा वापरली जाते,वेळ पडल्यास पोलिसांची मदत घेऊन त्रास देण्याचा प्रकार होतो वृद्धांना अपमानित केले जातात विरोध करणाऱ्यांना मोडीत काढण्यासाठी जमेल त्या पद्धतीत सुडाचे राजकारण केल जात आहे.अशी विद्यमान आमदार कुल यांच्या कारभाराची चिरफाड कामगारां समोर ते करीत होते..

ते पुढे बोलताना म्हणाले की वडिलांना आमदार केलेल्या कार्यकर्तेची त्यांनी ओळख ठेवली नाही.त्यांना दुश्मन समजून आजपर्यंत त्यांच्यावरती टीका टिपणी करत कधीकाळी एकेरी भाषा सुद्धा वापरली मी आणि आमचे बाकीचे सहकारी तर लांबच राहिलो आहे,तुम्हा वृद्धांना घरी बोलावून चार चार तास ताटकळत ठेवण्याची ही रगील भूमिका खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये माज आल्यासारखी आहे.

तालुक्यामध्ये सातशे अधिक मताने विजय संपादन केलेला आहे.अंगातली मस्ती मात्र कमी झालेले नाही मतदारांची अवहेलना  करणे सत्तेच्या जोरावर मजूरपणा करणे,प्रशासनाला वेठीस धरणे अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या करणे आणि जे विरोध करता त्यांना खोट्या गुन्हात गुंतवणे अशा प्रकरणात माहीर झालेल्या या चेअरमन कडून तुम्हा सर्वांचे कष्टाचे घामाचे पैसे मिळतील म्हणून शंका आहे..

आगामी काळामध्ये यांची राजकीय मस्ती उतरण्यासाठी तुम्ही मतदार म्हणून गांभीर्यांना हा प्रश्न हाताळला पाहिजे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल तुम्हाला ते बहुमोल मताचा अधिकार आहे.त्या मताचा योग्य वापर करावा याला पाय उतार केल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका ज्या घराला सत्तेपर्यंत पोहोचवल ज्यांनी त्यासाठी कष्ट केल त्या रमेश थोरात यांना विरोधक वाटतो कुठल्याही स्वरूपाची मिंधेकरी न करता त्यांच्या घराण्याच्या राजकारणासाठी अतिशय प्रामाणिक पणाने मी त्याच्यां वडीलांच्या आई साठी पत्नी साठी आणि त्याच्या साठी  वेळोवेळी लाभार्थी न होता काम केले आहे..

माझ्या बरोबर काही सहकारी झिजले त्यांची सुधा याला किंमत राहिलेली नाही आज त्याला जर आम्ही शत्रू वाटत असतील तर भविष्यकाळात ह्याचे मित्र कोण हा प्रश्न शंकेचा विषय आहे अशा स्वरूपाची माहिती ते सेवानिवृत्त कामगारांना दिली आहे..

पुढे ते म्हणाले कि घोडा आणि मैदान जवळ आहे.विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत.ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार करण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही.त्या सर्वांनी निवडणुकीत हिरा रीने भाग घ्यावा तुम्हा वर केलेले अन्याय अत्याचाराची परिस्थिती सर्व सामान्य मतदारां पर्यंत पोहोचवावी आणि सत्तेच्या जोरावरती हे झुंडशाही दादागिरी करणाऱ्या राहुल कुल याला  घरी बसवल्या शिवाय  आपण सर्वांनी शांत बसू नये अशा स्वरूपाचे आवाहन उपोषण करताना करू त्यांनी राहुल कुल यांच्या विरोधामध्ये उघडपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे..

चार दिवसांपूर्वी उपोषणाला सुरुवात झाली.यावेळी अनेकांनी उपोषण करताना भेट देऊन पाठबळ देण्याचा प्रयत्न केला यामध्ये वसंत साळुंके,कुसेगाव माजी सरपंच मनोज फडतरे,दिनेश राजपुरे,राजाभाऊ तांबे,सत्वशील शितोळे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी शंकर मासाळ,महादेव मचांले,उत्तम जगताप,अनिल शेलार यांच्या सह तालुक्यातील आप्पा पवार,गणेश थोरात,या सर्वांनी सेवानिवृत्त कामगारांच्या उपोषणाला भेटी देऊन मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे.या सर्व प्रकाराने या वयोवृद्ध सेवानिवृत्त कामगारांच्या उपोषणाला बळ मिळत असून भविष्यकाळात त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here