नेत्यांचे चणे फुटाणे खानारांनी माहीत नसताना नुसते कुटांने करू नयेत…शिवाजी काळे.

18

नेतांचे चणे फुटाणे खणारानी.काहीच माहीत नसल्याने उगाच निष्ठेसाठी कुटाणे करू नये ….शिवाजी काळे

आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

गेली आठ ते दहा वर्षामद्ये ज्यांनी आमची देणी दिले नाही त्यांनी १५ दिवसात अर्धवट शब्द देण्याची जाहीर भाषा करावी यावर अंध भक्तान शिवाय कोण विश्वास ठेवणार तेच टाहो फोडून उर बडवित राजकारण आहे असा प्रचार व प्रसार प्रमाणिकपणे करणार अश्या स्वरूपाचे ठाम मत ज्येष्ठ कामगार नेते शिवाजी काळे यांनी व्यक्त केले आहे..

सोशल मीडियावरून त्यांनी सुरू केलेल्या चक्री उपोषणाला बदनाम करण्याचा काही लाभार्थी भक्तांनी प्रयत्न चालवला असल्याने त्यांनी त्यांच्या आपल्या शैलीत या निमित्ताने समाचार घेतला आहे.आंदोलन आणि राजकारण याचा मिलाप या निम्मित केला गेला आहे.त्या लाभार्थीसाठी विशेष शब्द प्रयोग करीत आज पर्यंत घडलेली माहिती या निमित्ताने केला आहे..

ते पुढे म्हणाले की,आठ-दहा वर्षात या बाबत कायम फसवत आलेला त्या व्यक्तीने सर्वसाधारण सभेत शब्द  देणे म्हणजे  लबाडा घरच आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नाही मागील काळात किती वेळा शब्द दिला आहे.तो का पाळला नाही त्याची माहिती या टाहो फोडणाऱ्याना पाहिजे असल्यास माझी भेट घ्यावी मी देईल असा खोचक सवाल काळे यांनी या निमित्त या भक्तांना केला आहे..

दौंड तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सेवा निवृत्त कामगारांच्या चक्री उपोषणाचे राजकारण आता चांगलेच तापले आहे.आंदोलनाचा ५ वा दिवस असून आंदोलनाची धार वाढू लागली आहे.तालुक्यातील मान्यवर त्यांना पाठिंबा देऊ लागले आहेत.हा सर्व प्रकार पाहून  भक्त कासावीस आणि अस्वस्थ झालेले आहेत त्यांना हा विषय आगामी निवडणुकीसाठी अवघड जागेचे दुखणे वाटू लागल्याने त्यांची खुडबुड या निमित्ताने सुरू झाली आहे.परिणामी काहीतरी केले पाहिजे म्हणून उगाच अर्धवट माहितीचे ढोल पिटण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे.असा आरोप कामगार नेते काळे यांनी केला आहे..

यासाठी हे राजकारण आहे,आगामी निवडणूक डोळे समोर ठेऊन चालू असलेला प्रकार आहे.ऐकाच व्यक्तीला टार्गेट केले जात आहे.काही जन राजकीय भाषणे करू लागली आहेत. कारखान्यावर किती ऊस घातला कोणी अडचणीतून बाहेर काढण्यास मदत केली.१५ दिवसात देणी देतो असे जाहीर केल्यावरही ३ ऱ्या दिवशी उपोषण का? या पाठीमागे कोण आहे.माजी आमदार पिता पुत्र येऊन भाषण करतात त्यात वडील जप्तीची भाषा करतो हे योग्य आहे का? अश्या विविध प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पटत नाहीत त्यांच्या तोंडी या बाबत वेगळी चर्चा आहेअशी वायफळ बडबड त्यांचीं सुरू झाली आहे

याची नागरी चर्चा सुरू आहे हा असा त्यांनी  आभास निर्माण करून नेता निष्ठा दाखवणेसाठी स्वतःच आंदोलनाच्या धास्तीने कामगार आणि भेट देणाऱ्याचे बदनामीचे ढोल पिटण्याचा केविलवणा प्रयत्न त्यांनी सुरू केला असून त्यांनी आमच्या समोर यावे त्यांच्यासाठी शब्द पाळणाऱ्या चेरमनला सुधा खुल्या व्यासपीठावर आणून आमच्याशी चर्चा करावी.उगाच निष्ठेचा प्रमाणिक पना दाखवण्यासाठी वेडलागल्या सारखी काहीपण  बिनबुडाची बडबड करू नये असे आव्हान या भक्तांना कामगार नेते काळे यांनी केले आहे..

ते पुढे म्हणाले कि,तालुक्यात कारखान्याची सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी झाली असून आंदोलन होणार आहे याची पूर्व-सूचना या कामगारांनी २ सप्टेंबर रोजी चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळाला दिलेली होती.त्याच्या प्रती प्रशासनाच्या विविध विभागाला देण्यात आल्या होत्या त्यात यवत पोलीस स्टेशन सुद्धा होते.याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती.अशीच माहीत आणि पत्र व्यवहार गेली अनेक वर्ष आम्ही केला आहे.आंदोलनाची माहिती चेअरमनला जवळपास २५ दिवस-अगोदर देण्यात आली होती.त्यांनी त्या काळात देणी द्यायची होती ती जाहीर करण्याची वेळ आली नसती आणि आम्हाला सुधा हे करावे लागले नसते.
उगाच नेत्याच्या चने फुटाणे खाऊन प्रमाणिक आहोत हे दाखवणे साठी असेल कुटाने करण्याची त्यांना वेळ आली नसती.असा खरमरीत शाब्दिक जोडा मारून काळे म्हणतात आंदोलन चुकीचे आहे तिथं राजकारण करू लागले आहेत या आभास या अंध भक्तांना होऊ लागला आहे..

ही बाब त्यांच्यासाठी दुःखाची नीच्छित असेल त्यांना याचा त्रास होत असल्यास त्यांनी सांगावं आपल्या नेत्याला देऊन टाका यांची देणी आणि बंद करा यातून होणारे राजकारण हे त्यांच्या बापाच्यान होणारा विषय नाही.मात्र खाल्लेल्या अन्नाला जागण्यासाठी लाभार्थींची ही धडपड आहे अशा स्वरूपाचा टोमणा सुद्धा त्यांनी या भक्तांना मारला आहे..

त्यांनी पुढे माहिती दिली की,तालुक्यात चक्री उपोषण करणारे कोण? आहेत त्यांचे आजच्या वयाची परिस्थिती काय ? आहे. त्यांच्यातील किती ? सहकारी मृत पावले आहेत.या सर्वांना सेवानिवृत्तीनंतर एकदिंबडी ही न देणारा गेल्या आठ ते दहा वर्षात देतो देतो म्हणून फसवत ठेवणारा यापुढे दिल का नाही याचा ठाम विश्वास कोण? देणार हा प्रश्न त्यांच्या नेत्यानेच निर्माण करून ठेवला आहे.त्या नेतृत्वाचे एवढे कौतुक असेल तर या नेतृत्वाने त्याच्या घरी बोलवून आम्हाला चार तास वृद्धांना भेट दिली याचा जाब भक्तांना विचारण्याची हिम्मत होईल का? त्यांनी चक्री उपोषण सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी माजी संचालक सत्वशील शितोळे यांच्या सोबत मीटिंग घेऊ मी आता फक्त साडेपाच कोटी रुपये तुम्हाला देऊ शकतो.यापेक्षा काही आता सध्या करता येणार नाही.अशी भाषा वापरलेली आहे.त्या चेअरमनच्या चेला चपाट्याना कामगारांची सध्या असणारी परिस्थिती काहीच माहित नाही म्हणून त्यांनी यावरती भाष्य करू नये असा सबुरीचा सल्ला सुद्धा दिला आहे..

प्रश्न राहिला आंदोलनाला पाठबळ देणाऱ्या त्या मान्यवरांचा तालुक्यामध्ये काही वृद्ध उपोषण करू लागलेत आणि हे मान्यवर समाजामध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी काम करीत असतात घटनेकडे पाहून त्यांना अशा घटनांना भेट द्यावी लागते भेटीतील शब्दसुमहानाने आंदोलन करताना बळ मिळेल याचा विचार करावा लागतो,अशा मान्यवरांच्या भेटीचा वाढता योग सुरू झाल्यास व्यवस्थापना वरती त्याचा दबाव निर्माण होतो.आणि यातून कुठलातरी मार्ग निघण्याची चिन्हे असतात हा सर्वसामान्य कार्यपद्धतीचा भाग आहे.

मात्र आमचा तो बाब्या दुसऱ्याचं ते काररट हे या खुर्चट कार्यकर्त्यांच्या डोक्यात पक्क बसल्या कारणाने आमचा नेता खरंच चांगला आहे.बाकी सगळे वेडे आहेत.याच धरती वरती वृद्धांच्या आंदोलनाला टीका टिपणी करू लागले.त्यांच्याही घरात आई-वडील असतील नातेवाईकांमध्ये कोण वृद्ध असतील त्यांनी आयुष्यभर कष्ट केल आहे व शेवटच्या क्षणी ज्या कारखान्यावरती शासनामध्ये कष्ट केले.त्यांच्याकडून जर त्यांना कष्टाचे दामच मिळाले नाही.तर त्या परिवारामध्ये काय अडचणी निर्माण होतात.हे एकदा स्वतः परीक्षण करून पहाव म्हणजे आम्हा सर्वांच्या व्यथा ते माणूस असतील तर समजतील अशा स्वरूपाची अपेक्षा सुद्धा या निमित्ताने केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here