आवाज लोकशाहीचा
राहू:प्रतिनिधी
कामगाराच्या चक्री उपोषणाचे पडसाद आगामी दौंड तालुक्यातील विधानसभेच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उपोषणकर्त्यांना गावा-गावातून समर्थन मिळू लागले असल्याने कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळावर रोष व्यक्त होऊ लागला आहे..
उपोषणकर्त्यांचा प्रश्न चेअरमन तथा आमदार राहुल.कुल यांनी गांभीर्याने घेतला नाही तर त्यांना याचा दणका आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू शकतो अशा स्वरूपाचा आशावाद नागरिकांच्या चर्चेतून स्पष्टपणे होताना दिसत आहे.विविध मान्यवराच्या या उपोषणकर्त्यांना भेटी होत असल्याने पाठबळ मिळू लागले आहे..
नुकतीच त्यांना जेष्ठ विधीतज्ञ अर्जुन भाऊ दिवेकर आणि कारखान्यावर काम करणाऱ्या तत्कालीन कार्यकारी संचालक आर,डी शितोळे यांनी भेट देऊन पाठिंबा देत त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न.केला आहे
या प्रसंगी विधितज्ञ दिवेकर बोलताना म्हणाले की,तुमच्या प्रश्नांची तड लागेपर्यंत लढा सुरू ठेवा तुमच्या पाठबळसाठी मी तनमन धनाने उभा राहीलच,पण अर्धवट देणी घेऊ नका लढा अखंड चालू ठेवा चक्री उपोषण नंतर तुम्ही धरणे आंदोलन करा भविष्यात तुमच्यातील देवाघरी गेलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबांना इथे आणून धरणे धरायला भाग पाडा त्यांच्या चहा-पाण्याची नाश्त्याची सोय मी पदर खर्चाने करीन अशा स्वरूपाचे आश्वासन त्यांनी दिले आहे..
ते पुढे म्हणाले मी सोशल मीडियावरून निराणी आणि राज्य बॅंकेने काही चुकीचे काम केले आहे हे वास्तव्याला धरून नसल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून मी गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी करेल तुमच्या घामाच्या आणि कष्टाचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे त्याच्याशी मी सहमत आहे.तुमचा लढा अखंड चालू ठेवा आप-आपसात फूट पाडू देऊ नका.एका दिलाने एका विचाराने त्याचा शेवट करा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.अशा स्वरूपाचा आत्मविश्वास सुद्धा त्याने सेवानिवृत्त कामगारांसमोर व्यक्त केला आहे..
कारखान्यावर अपमान जास्त केला जातो आणि सन्मान कमी केला जातो अशा स्वरूपाची माहिती शितोळे यांनी दिली व पुढे ते म्हणाले माझ्यासाठी येथील अनुभव प्रचंड खराब म्हणावा लागेल या ठिकाणी काम करणारी यंत्रणा चेअरमन आणि संचालक बोर्ड प्रचंड बेताल पणाने बेकायदेशीर रित्या वागत असते असे सांगताना ते म्हणाले मी २००० मे च्या ३१ तारखेला सेवानिवृत्त होत होतो मात्र मला त्यांनी केले नाही.
मला काम करावे लागले आठ वर्ष मी काम करीत राहिलो शेवटी २७ मे २००९ रोजी मी सक्तीच्या रजेवर गेलो आणि मला या संचालक बोर्डाने एप्रिल २०१० ला सेवानिवृत्तीचे पत्र दिले हे सांगण्या मागचा दृष्टिकोन एकच आहे. मी ज्यावेळेस सेवानिवृत्त झालो त्यावेळेस त्यांनी मला साधे विचारले सुद्धा नाही.
पुढे ते म्हणाले इथे सन्मान केला जात नाही अपमान केला जातो तुम्हा सर्वांना या वयामध्ये अशा प्रकारे कारखान्याच्या गेट समोर कष्टाच्या घामाचे पैसे मिळवण्यासाठी चक्रीय उपोषणाचा अवलंब करावा लागत आहे.ही बाब म्हणजे या संचालक मंडळाकडून अपमान केल्यासारखीच आहे.अशी भावना सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे..
कामगारांच्या या पोषणामुळे तालुक्यातील वातावरणामध्ये राजकीय वादळ सुरू झालेली आहे.विधानसभेची आचारसंहिता आठवड्यात भारत लागण्याची शक्यता नाकारता येणार अशा मोसम मध्ये ही वादळ राजकारणाच्या विध्वंस करणार .ठरू शकते या विषयाला अनुसरून गावागावात चर्चेची गुऱ्हाळे सुरू झाली आहेत.
कारखान्याचे चेअरमन विद्यमान आमदार आहेत या निवडणुकीतील ते उमेदवार असणार हे निश्चितच मात्र आज वृद्ध कामगारांच्या चक्री उपोषणाचा त्यांच्याकडून याच्या वरती ठोस अशी उपायोजना आणि निर्णय होऊ शकत नसल्याने त्यांची आगामी निवडणुकीत डोकेदुखी वाढू शकते
उपोषणाला विविध मान्यवर भेटी देऊन कारखाना व्यवस्थापन आणि संचालक तसेच आमदार तथा चेअरमन यांच्या कार्यप्रणालीवर टीका-टीपणी करू लागलेले आहेत. याचा विपरीत परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकते अशी खात्री लोक देताना दिसत आहेत वृद्ध कामगारांविषयी असता त्यांच्या मनात निर्माण होऊ लागल्यान रोष कुल यांच्या कारभाराबाबत करताना दिसू लागले आहेतं
याचे पडसाद मतदानावर होऊ शकते आणीं त्याचा झटका कुल यांना बसू शकतो. अशा स्वरूपाचे उलट सुलट प्रश्न यानिमित्ताने गावागावांमधून नागरिकांना चर्चेचा विषय झाला आहे.
चक्री उपोषणाचा शेवट लवकर व्हावा अशा स्वरूपाची आशा आणि अपेक्षा “कुल” कार्यकर्त्यांची वाढलेली आहे.त्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून प्रतीक्षा सुरू केलेली आहे तर काहींनी या वृद्धांवर टीका टिपणी करण्याचा सपाटा सुरू केला आहे.नक्की हे आंदोलन कारखान्याच्या कामगारांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशासाठी सुरू केले आहे.तरी त्याचे पडसाद दौंड तालुक्याच्या राजकारणा वरती उमटणार ही भविष्यवाणी कोणाला सांगण्याची गरज उरलेली नाही. अश्या स्वरूपाची परिस्तिथी तालुक्यातील गावा-गावाच्या चौका-चौकात सुरू असलेल्या चर्चा सत्रातून स्पष्ट पणाने जाणू लागली आहे