विशेष:प्रतिनिधी – एम,जी,शेलार
आवाज:लोकशाहीचा
_________________
पुणे:प्रतिनिधी
दौंड मध्ये विधानसभा निवडणुकीत तुतारिचा उमेदवार कोण ? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली होती.अखेर रमेश थोरात यांना तुतारी फायनल का? १५ ऑक्टोंबर रोजी थोरात यांचा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे..अशा स्वरूपाची बातम्याही इलेक्ट्रिक मीडिया व सोशियल मीडियावर सुरू झाल्या आहे..
याबाबत शरद पवार यांचे कट्टर निष्ठावंत आमदार लगेच नाव लिहु नका असे म्हणत त्यांनी दिलेली अधिक माहिती अशी, दौंड मध्ये तुतारीसाठी तुल्यबळ उमेदवार म्हणून विचार केल्यास रमेश थोरात यांचेच नाव पुढे यायचे,ते योग्य आणखी खरेही आहे.
परंतु आप्पासाहेब पवार राष्ट्रवादी मध्ये अडचणी होती. दौंड मध्ये भाजपचा पराभव करण्यास अनुकुल वातावरण तयार झाले असुन यासाठी तगडा उमेदवार म्हणून रमेश थोरात च हवेत अशी भावना आणि तुतारी साठी आप्पांसाठी तुम्ही शरद पवार साहेब यांच्या कडे प्रयत्न करावेत.असा दौंड मधील सर्वच स्तरातून सातत्याने माझेकडे आग्रह करण्यात येत होता. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज बोलणी झाली. आणखी रमेश थोरात यांची तुतारी फायनल झाली आहे. आत्ता पासून सर्वांनी तुतारी साठी काम करायचे असुन दौंड मधुन भाजप चा सुपडा साफ करुन जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे…
विशेष वाचा — यांचा मला आदरच वाटत आहे.दौंड साठी तुतारी हाती घेवुन विजयासाठी रमेश थोरातच हवेत.असा आग्रह दौंड मधील एक जेष्ठ निर्भीड पत्रकार माझ्याकडे सतत करीत असत.यामागे तूमची नेमकी भुमिका काय? असे मी विचारताच,ते म्हणाले दौंड मध्ये अघोषीत आणिबाणी आहे. लोक प्रचंड दबाव आणी दहशती खाली आहेत.लोक तक्रार द्यायला घाबरत आहेत.वातावरण निर्भय होणे जनतेच्या हितावह आहे.आम्हाला तुमचा चहा ही नको.परंतु तुतारी साठी रमेश थोरात यांचे शिवाय पर्याय नाही.एव्हढे पवार साहेब यांना पटवुन सांगा.असे तळमळीन सांगुन जाण्यासाठी निघाले,मी बोललो चहा घेवून जा,पहिले दौंड साठी मी सांगितले ते काम करा.नंतर चहाचं बघु असे म्हणुन खरोखर निघुन गेले. या जेष्ठ पत्रकार यांचे बद्दल मला आदरच व वाटत आहे…
दौंड तालुक्यामध्ये या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत असुन दिवाळी अगोदर, दसरयाला फटाके फूटु लागले आहेत.