कोट्यवधीच्या विकासाच्या गप्पा सांगणाऱ्यांच्या गावात लघुशंकेसाठी जागा आहे का ..राहू ग्रामस्थांची दबक्या आवाजात चर्चा

18
जनतेला गाजर धोका देणारे विकास कामाचा गाजावाजा करतात ?

यवत प्रतिनिधी… आवाज लोकशाहीचा..

कोट्यावधी रुपयांची विकासकामे सोडा फक्त आम्हाला लघुशंकेसाठी जागा मिळाली म्हणजे बरं होईल असा आर्त सवाल राहु गावांमध्ये येणाऱ्या महीला बघिणीमधून व्यक्त होत आहे.
अनेक कामानिमित्ताने अथवा प्रवास करणाऱ्या महीलांची तसैच पुरुषांची लघुशंकेसाठी जागा न मिळाल्याने राहुच्या मुख्य चौकात कुचंबणा होत आहे.महीलाच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देणार तरी कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या दौंड तालुक्यामध्ये भुमिपुजन उद्घाटन आदी कामांची कागदोपत्री मोठी रेलचेल होताना दिसत आहे.काही लाख रुपयांपासून सध्या दहा कोटी,वीस कोटी,चाळीस कोटी, पन्नास कोटी ते चारशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे आकडे ऐकून सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र शांतता आहे.हा विकास जनतेचा की बग्गल बच्चाचा याबाबतही पारावर चर्चा होताना दिसत आहे.सध्या या कामाचे भुमिपुजन उद्घाटक म्हणून नेता, त्यांची घरातील
सदस्य मोठा आटापिटा करून आपणच कसे तारणहार आहोत हे दाखवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत.या बाबत नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना माजी सरपंच म्हणाले की सध्या कामामध्ये टक्केवारी वाढली की कामामध्ये भागीदारी हे कळण्याचे नाव नाही.हजारो कोटीच्या गप्पा मारण्याचे सोडुन तेवढा सार्वजनिक मुतारीचा प्रश्न सोडवा असा टोलाही लगावला आहे.एकीकडे लाडक्या बहिणीला शासनाकडून दीड हजार रुपये अनुदान देण्यात येते आहे तर महीलाना उघड्यावर लघुशंकेसाठी जावे लागत आहे त्यामुळे विकासाचा बुरखा फाटला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विकास कामांच्या तालुक्यातील फलकाची उंची पाहता तेवढ्या लांबीचे नको उंचीचे सार्वजनिक शौचालय तरी दौंड शहर, केडगाव ,पाटस, या ठिकाणी बांधलेत का हा खरा कळीचा प्रश्न असून या सर्व गावातून बाजारपेठ आहेत तिथे लोकांची वर्दळ होते दौंड शहरात तर तालुक्यातील सर्व जाती-धर्माची लोक विविध कामासाठी तिथे जात असतात तिथे सुद्धा हा विकास झालेला नाही मग यांचा विकास नक्की कुठे आहे देलवडी मध्ये बसलेला आहे की काय अशा स्वरूपाचा प्रश्न या निमित्ताने लक्ष वेधून घेणारा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here