कुल यांनी शब्द फिरवला ..शिवाजी काळे

13
दिलेला शब्द करून पलटी गद्दार असेलीची केली उलटी..

भिमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी शब्द फिरवला मी असे देणी-देण्या बाबत आश्वासन दिलेच नाही….शिवाजी काळे

विशेष:प्रतिनिधी-एम,जी-शेलार
आवाज:लोकशाहीचा


पुणे:प्रतिनिधी

सेवा निवृत्त कामगारांची देणी येत्या १५ दिवसात दिली जातील असे भिमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर पणे आश्वासन अध्यक्ष व तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्टपणे दिले होते.कुल यांनी “आत्ता शब्द फिरवला” असुन मी देणी देण्या बाबत बोललोच नाही.अशी पलटी मारल्याची माहिती संघटनेचे माजी अध्यक्ष,जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे यांनी दिली आहे..

या बाबत बोलताना काळे पुढे म्हणाले, शुक्रवार दि ११ रोजी भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल‌‌ यांनी सेवानिवृत्त कामगारांनी सुरू केलेल्या चक्री उपोषण स्थळी भेट दिली असताना.देणी-देण्या बाबत डिसेंबर महिन्यात मध्ये बघु असे मोघम ते म्हणाले आहेत..

मात्र सेवानिवृत्त कामगार यांची देणी-देण्या बाबत १५ दिवसांत दिले जातील असे अस्पष्ट आश्वासन चेरमन कुल यांनी भिमा पाटस कारखान्याच्या वार्षिक सर्व-साधारण सभेत जाहीर दिले होते.अशी आठवण मी त्यांना करून देताच.चेअरमन कुल यांनी मी देणी देण्याचे बोललोच नसुन फंड भरण्या बाबत बोललो होतो.अशी पलटी कुल‌ यांनी मारली आहे..

सेवानिवृत्त कामगारांची १५ दिवसात देणी देऊ असे जाहिर आश्वासना नंतर लगेचच जेष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ तांबे यांनी १५ दिवसांत देणी न दिल्यास कुल यांनी आमदारकी चा राजिनामा द्यावा.अशी मागणी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता.हे कुल स्वतः आणी त्यांचे चेले-चपाटे,निष्ठावंत लाभार्थी हितचिंतक सोईस्कर विसरतील तो त्यांचा गुणधर्मच आहे..

परंतु जमलेले सभासद शेतकरी आणि उपस्थित सेवानिवृत्त कामगार कसे विसरतील.‌राहुल कुल यांना आजही सेवा निवृत्त कामगार यांच्या देणी देण्या बाबत आजीबातच आस्था नाही. याबाबत आम्ही आठ वर्षं लढा देत आलो आहोत.अजुनही अध्यक्ष आमदार कुल हे कामगारां प्रती अहमपणाने बेताल वागत आहेत.आत्ता थांबणे अवघड आहे.उद्या पासुन आमच्या उपोषणास कुटुंबीय सहभागी होणार आहेत..
कारखान्याचे चेअरमन व आमदार राहुल कुल यांच्यावर आमचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही ते लबाड आहेत .आम्हाला त्रास देणे त्यांना आगामी निवडणुकीत महाग पडेल असे बोलताना काळे यांनी माहिती दिली आहे..

विशेष वाचा :- सेवानिवृत्त कामगारांनी एक महिना अगोदर उपोषणाची नोटिस दिलेली होती.ठरल्या प्रमाणे दि. २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त चक्री उपोषण सुरु केले होते. अध्यक्ष राहुल कुल यांनी १५ दिवसाचे आश्वासन जाहीर रित्या दिले होते उपोषण सूरु केल्यावर कुल यांच्या चेले-चपाटे, निष्ठावंत आणि लाभार्थी हितचिंतक यांनी आमच्यावर पातळी सोडुन टिका केली होती. हे सर्व ठरवुन घडवले जात होते. त्यांनी त्यांच्याच अश्वासनाला हरताळ फासला आहे.आता दौंड ची जनता सुद्धा विश्वास ठेवायला तयार नसुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता मतांच्या माध्यमातून अविश्वास व्यक्त करतील हे निच्छित होणार असेल तरी या लबाड माणसावर आमचंच काय तालुक्यातील कोणत्याच माणसाचा विश्वास राहिला नाही तो ऐक नंबर खोटे बोलतो असे काळे यांनी शेवटी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here