दौंड शहरातील कत्तलखान्याचा मास्टरमाईंड कोण ?… सोयल.खान

19
हाजी सोयल खान

आवाज:लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

दौंड शहरात वादग्रस्त ठरत असलेला कत्तलखाना कोणाचा उद्योग हा कळीचा मुद्दा बनला असून याची सखोल चौकशी केल्यास दौंड तालुक्यासह जिल्ह्यात मोठा भूकंप होणारा विषय बाहेर येऊ शकतो शहरामध्ये या कत्तलखान्या बाबत नुकतीच हिंदू धर्मीय बांधवांनी जाहीर सभा घेऊन आग पाखड करीत त्रीव शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे.या मधून हिंदू मुस्लिम या विषयाचा तेढ दिसून आलेला आहे..

मात्र हा सर्व प्रकार हिंदू बांधवांना खरी माहिती मिळाली नाही,म्हणून घडलेला आहे  अशी शंका व्यक्तं.करीत  अल्पसंख्यांक नेते सोहेल खान यांनी ऐक व्हिडीओ केला.आहे  त्याला पाहिल्यास  प्रकरणांमध्ये काहीतरी दडल आहे अशा स्वरूपाची शंका उपस्थित झालीं आहे

सोहेल खान व्हिडीओ मद्ये म्हणतात दौंड शहरात गेल्या अनेक वर्ष हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. कत्तलखाना शहरात झाला हा मुस्लिमांसाठी झाला अशा स्वरूपाचा काही समज गैरसमज झालेला.आहे

यानिमित्ताने ते बोलताना म्हणाले शहरातल्या या कत्तलखान्या मागे कुठल्याही मुस्लिम समाजाची मागणी नाही न कोणी मागणी केलेली आहे.प्रथम ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि यासाठी दौंड नगरपालिकेमध्ये या कत्तलखानाच्या सुरुवातीपासून ते बांधकाम होऊन ठेकेदाराला पैसे देईपर्यंतचा संपूर्ण कागदी इतिहास बांधून ठेवलेला आहे.समीक्षकांनी तो ताब्यात घेऊन त्याचा विचार केला पाहिजे..

ते पुढे म्हणतात कत्तलखाना उभारण्याच्या सुरुवाती पासून अखेरच्या क्षणापर्यंत जे कामकाज झाल त्या कामकाजामध्ये या तालुक्याचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत ही पार्टी राज्यात आणि देशात सत्तेवरती आहे.पार्टी ही हिंदुत्ववादी असल्याकारणाने पार्टीकडूनच याच्यासाठी कोट्यावधी रुपयाची तरतूद होणे यामध्ये शंका निर्माण होणारी घटना म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.त्यासाठी याचा पूर्ण शोध आमच्या हिंदू बांधवांनी घेतला पाहिजे आणि सत्य उघड केलं पाहिजे..

शहरातील कत्तलखानाच्या इमारतीमधे किती जनावरांचा बळी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे.जवळपास १०० पेक्षा अधिक जनावरे या कत्तलखान्या मध्ये मारली जातील आणि त्यांची बाकीची जी व्यवस्था आहे.ती केली जाईल अशा स्वरूपाची व्यवस्था होणारी ही इमारत शहरातल्या मुस्लिमांची खरी गरज आहे का? याकडे सुद्धा थोडं लक्ष वेधले पाहिजे

तसेच यामध्ये नक्की कुठला व्यवसाय केला जाणार होता. याची समीक्षा करणे महत्त्वाची आहे असे ते सांगताना खान म्हणतात या ठिकाणी कुणीतरी मुस्लिमांना पुढे करून जागतिक बाजारपेठे मध्ये मांस विकण्याची खेळी तर करत नाही ना ही शंका सुद्धा महत्त्वाची आहे.तिचा शोध घ्यायचा असल्यास प्रामाणिक पणाने या सर्व योजनेची यथोचित माहिती निस्वार्थी पणाने संकलन केल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही

मुस्लिम बांधवांचा या शहराशी नव्यानं असा काही सलोखा नाही.अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या शहरांमध्ये मुस्लिम आणि हिंदू गुण्या-गोविंदाने नांदत आलेला आहे.समाजामध्ये जनावरांचं मांस भक्षण करणारी जमात म्हणून तरी आमच्याकडे पाहत आले असेल तरी ती गरज १२० जनावरांच्या एवढी आहे का ? याचा बारीक विचार आमचे हिंदू बांधवांनी सुद्धा केला पाहिजे की एका वेळेस १०० जनावर खाणारी लोक या शहरात आहेत का? हा प्रश्न ज्यावेळेस त्यांना सोडवता येईल त्यावेळेस या कत्तलखान्या पाठीमागे षडयंत्र आहे. आणि ते आपो-आप उघडे  होईल या ठिकाणी अजून बारीक सारी गोष्टींचा तुमच्यापुढे पसारा उलगडत बसण्यापेक्षा विनम्रपणे आव्हान करतो या कत्तल खाण्यासाठी मुस्लिम त्या कुठल्याही व्यक्तीने नगरपालिकेमध्ये कत्तलखान्या विषयी मागणी केलेली नाही.

यापुढे जाऊन कत्तलखाना व्हावा म्हणून कुठल्याही मुस्लिमांचा हट्ट नव्हता मग हे सर्व कोण करतय या पाठीमागे कोण आहे.ही कुणाची आयडिया आहे.आणि भाजपा प्रेरित हिंदुत्वादी पक्षाच्या सरकारमध्ये दौंडच्या मूठभर मुसलमानां ना या कत्तल खाण्यासाठी कोणी मदत केली हा सुद्धा प्रश्न तितकाच मोलाचा आहे.

हे सर्व आमच्या हिंदू बांधवांना समजल्यावर ती या कत्तल खान्याचा विषय आणि मुस्लिम बांधव यातील तिढा आपो-आप सुटेल अशा स्वरूपाची माहिती देऊन ते आव्हान करतात ते आपण सर्वांनी याची सखोल माहिती घ्यावी व सखोल माहिती घेतल्या नंतरच हा द्वेष हा क्रोध मुस्लिम बांधवांसाठी व्यक्त करावा असे आव्हान त्यांनी केले आहे.

त्यांचे हे आव्हान स्वीकारल्यास आणि त्यातली सखोल माहिती प्रामाणिकपणाने बाहेर निघाल्यास दौंड शहरांमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here