आवाज:लोकशाहीचा
दौंड-प्रतिनिधी
वासुदेव काळे यांना महामंडळाच्या मध्यमातून मिळलेल्या लाल दिव्याच्या गाडीने दौंड तालुक्यामध्ये आनंद होण्या-ऐवजी खळबळच उडालेली आहे.ही खळबळ भाजपा पार्टीत अंतर्गतच उडाली असून याचा विपरीत परिणाम पक्षातील फुटीच्या राजकारणामध्ये स्पष्ट दिसून येत आहे.या प्रकाराने दौंड पार्टीत उभी फूट पडली असून वासुदेव काळे यांना मानणारे कार्यकर्ते आनंदात राहिले असून पक्षाचे आमदार असलेल्या राहुल कुल गटात कमालीचे वातवरणथ थंडा थंडा कुल झाले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यामध्ये मागील काळात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून विद्यमान आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी अजित पवार गटाला राम राम करीत निवडणूक लढवली होती पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी कूल यांना निवडून द्या तालुक्याला लाल दिव्याची गाडी दिली जाईल अशा स्वरूपाची भीष्म प्रतिज्ञा केली होती.ती त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकली नाही.पाच वर्षाचा कालखंड हा लाल दिव्याच्या गाडीच्या प्रतीक्षेत कुल यांचा गेल्यानंतर राजकीय वातावरणामध्ये बदल होत गेला आणि राज्य पातळीवरच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन कुल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील जनतेला आव्हान केले तुम्ही निवडून द्या त्या लाल दिव्याचे काय ते पाहतो आशा स्वरूपाचं आश्वासन दिल होते नुसत्या आश्वासनाने तालुक्यामधील कुल समर्थकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.आज काळे यांना मिळाल्याने तो पूर्ण कुल होऊन गुल झालेला आहे..
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कुल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांच्याबरोबर चुरशीची निवडणूक झाली यामध्ये अवघ्या साडेसातशे मताच्या आसपास कुल यांचा विजय झाला विजयाचा आनंद जलोष्यात साजरा करणाऱ्या कुल समर्थकांना दौंड तालुक्यामध्ये लाल दिव्याची गाडी मिळणार असे स्वप्न दिवसा सुद्धा पडू लागलेली होती पाच वर्ष निघून गेली मात्र ती साकारली नाहीत
कुल यांचा लाल दिव्याचा प्रश्न जानकर आणि फडणवीस या दोघांनी सुधा सोडवला नसल्याने कुल यांच्यासह त्यांच्यां समर्थकाना वाईट वाटणे साहजिकच आहे आता सध्या विधानसभेची निवडणूक लागलेली आहे.आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस अगोदर भारतीय जनता पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष या तालुक्यातील वासुदेव काळे यांना पक्षाने महामंडळ देऊन राज्यस्तरीय दर्जाचा मानकरी ठरवले आणि यासाठी त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार आहे..
भाजपा पार्टीतच ही लाल दिव्याची गाडी आली असली तरी याच पार्टीत असलेले कुल आणि त्यांचे समर्थक यांच्या दृष्टीने ही मोठी शरमेची बाबा झालीं आहे तालुक्यात त्यांच्याकडून साध्या शुभेच्छा सुधा काळे यांना देणे अवघड झाले काही अपवाद वगळता बहुतांश कार्यकर्त्यांनी याबाबत चकार शब्द सुद्धा काढणे उचित समजले नाही कूल यांच्या कट्टर समर्थकांना या विषयाचा मोठा त्रास झालेला असून आपल्याच पार्टीतील एका जिल्हाध्यक्षाला महामंडळाच्या माध्यमातून लाल दिवा मिळालेला आहे.त्याचा आनंद जल्लोष ते साजरा करू शकले नाहीत या प्रकाराने त्यांना वाईट वाटले आहे.अशा स्वरूपाचा गैरसमज तालुक्यात पसरलेला आहे.काळे यांना मानणारा जो वर्ग आहे.त्यांनी मात्र या लाल दिव्या बाबत दौंड चे स्वप्न पूर्ण झाले अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करून आनंदाचा जल्लोष केला आहे..
तालुक्यात आलेल्या लाल दिव्यासाठी पक्षाच्या वतीने जल्लोष केला पाहिजे होता मात्र तस घडलेलं नाहीं काळे समर्थकांनी जल्लोष केला आणि कुल समर्थमक मोठे निराश हो थंडगार झालेले आहेत.या सर्व प्रकारचा सखोल विचार केल्यास भाजपा पक्षात अंतर्गत रित्या या लाल दिव्याच्या गाडीचे पडसाद उमटलेले दिसत आहे.या निमित्ताने पक्षात उभी फूट पडलेले आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही..
…………………. चौकट……………….
तालुक्यात अचानक कुल यांच्या पोस्टर वरून पक्षाचे चिन्ह आणि नाव गायब झाले होते तालुका भर पोस्टर लावले होते यामुळे एकच संभ्रम निर्माण झाला होता यांनी पार्टी सोडली की काय? सोडण्याचा विचार केला आहे काय आता या प्रश्नांची उत्तरे दौंड तालुक्यातील काळे यांना मिळालेल्या लाल दिव्याच्या गाडीने मिळालेली आहेत अशा स्वरूपाची चर्चा तालुक्यात रंगली असून कुलांना काळे यांना लाल दिव्याची गाडी मिळणार आहे हे अगोदरच समजल्यामुळे त्यांनी आपली नाराजी पक्षावर दाखवण्यासाठी वरील सर्व प्रकार कार्यकर्त्यांमार्फत केला होता अशी टिंगल टवाळी तालुका भर होताना दिसत आहे