आवाज:लोकशाहीचा
दौंड-प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात दौंड च्या कत्तलखान्याचा विषय चांगलाच वादग्रस्त निर्माण होत चालला आहे.हा वाद हिंदू-मुस्लिम समाजाच्या तिढा निर्माण करणारा नसून या नगरपालिकेत कामकाज करणाऱ्या अधिकारी व तत्कालीन नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्याबाबत वाढू लागला आहे..
शहराचा सामाजिक विकास करण्यासाठी असलेल्या नगरपालिकेमध्ये लोक-प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची निवड शहरातील मतदारांनी करून दिली तसेच या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाच्या पगारावरती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्यासाठी लागणारा कामगार वर्ग देण्यात आला असताना प्रशासनाने सुद्धा डोळे झाकून काम कसे केले हा सुद्धा शोधाचा भाग आहे.
सरकारी कर्मचारी,नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याकडून समाजाची उत्क्रांती करणे त्यांना दिशा देणे त्यांच्या विकासाकडे लक्ष देणे या बाबी प्रामुख्याने होणे काळाची गरज असताना या सर्वांनीच शहरातील नागरिकांच्या डोळ्यात धुवून फेकून त्यांना अंधारात ठेवून चुकीच काम-काज करणे हा प्रकार दौंड नगरपालिकेत कसा घडला आहे..
या प्रकाराची सुरुवात २०१६ मध्ये सुरू झाली असताना याचा अंतिम स्वरूप २०२४ च्या दरम्यान उघड झालेला आहे.आणि या प्रकरणांमध्ये हा कत्तलखाना सर्व-परिचित झाला आणि तो वादाचा विषय बनला गेला आहे..राज्यामध्ये एवढा मोठा कत्तलखाना दौंड मध्ये का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असला तरी या कत्तलखान्या साठी प्रशासनाचा नक्की कोणी जीव खाल्लेला आहे.कुणी त्यांच्यावरती प्रेशर केलेला आहे..
याचा तपास लागण काळाची गरज आहे.शहरामध्ये या कत्तलखान्याचा आराखडा पाहता यातून देश विदेशासाठी मटन विक्री केली जाणार होती,तसेच विविध स्वरूपाचे अवांतरित उत्पादने घेऊन त्यातून पैसेही कमवले जाणार होते.या सर्व कारभाराचा व्यवस्थित-रित्या हिशोब केल्यास दिवसाला कोटी रुपये कमवण्याचा हा उद्योग नक्कीच कोणाला? करायचा होता हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे..
समाजामध्ये याबाबत खरी माहिती दिली नसल्याने काही काळ हिंदू-मुस्लीम समाज्यामध्ये वादंग दौंड शहरामध्ये पाहण्यास मिळाला होता.वेळेत या दोन्ही समाजाने आणि समाजातील प्रतिनिधींनी सविस्तर-रीत्या आपल्या भावना आणि माहिती जाहीर-रीत्या प्रकट केली म्हणून पुढील होणारा संघर्ष टळला गेला आहे.अशी भावना नागरिकांची झालेली आहे..
जात धर्माचा तिढा या निमित्त संपला असला तरी हा कत्तलखाना निर्माण करण्याचा खरा सूत्रधार कोण? आहे हे नागरिकांना समजणे काळाची गरज आहे.त्यासाठी नगरपालिकेने आणि तत्कालीन नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी तसेच कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा सविस्तर कागदपत्रांसह जाहीर-रीत्या नागरिकांमध्ये हा विषय सांगितला पाहिजे या प्रकाराने समाजाला या कत्तलखान्या बाबतची खरी आणि उचित माहिती मिळेल आणि त्यांचा झालेला समज गैरसमज दूर होऊन या पाठीमागचे षडयंत्र करणारा मेंदू कोणाचा याची माहिती मिळेल..
कत्तलखान्याचा प्लॅन करणारा जो कोणी असेल त्याला पैसे कमवण्यासाठी एवढा मोठा उद्योग करताना शहरातील नागरिकांच्या भावना मातीत गाडायच्या होत्या का? असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने दौंड शहर नागरिकांकडून उपस्थित होत आहे..
समजलेल्या माहिती नुसार दिवसा काठी जवळपास १२० जनावर कत्तल करण्याचा हा आघोरी प्रयोग या ठिकाणी राबवण्याचे धाडस कोणाच्या पाठिंब्याने आणि कोणाच्या आशीर्वादाने करण्याचा प्रताप होणार होता हे सुद्धा उघड झालं पाहिजे,अशी धारण आणि भावना ते करीत आहेत.
सामाजिक सुधारणा करण्यासाठी शासनाची ही नगरपालिका समाजाला अंधारात ठेवून अशा स्वरूपाची उलट-सुलट कामे करीत असली तर या पाठीमागे कुठली तरी शक्ती असावी आणि ही शक्ती कोण? आहे.याचा तपास झाला पाहिजे आणि तो शासनाचे प्रतिनिधी म्हणून सध्या नगरपालिकेचे कामकाज पाहणाऱ्या अधिकारी वर्गांनी उघड करावा अशी अपेक्षा सुद्धा दौंड तालुक्यात नागरिक व्यक्त करीत आहेत..
राज्यामधील भारतीय जनता पार्टी आणि तालुक्यातील पार्टीचे आमदार यांच्याकडून शासनाचा निधी या प्रकरणासाठी देताना त्यासाठी तयार झालेले प्रस्तावाची तपासणी नगरपालिका,प्रशासना-सह बाकीच्या ही विविध शासकीय अधिकाऱ्यांनी केलेली आहे.हा कत्तलखाना चा कारखाना दौंड मध्ये तयार होत आहे.यावरून याची माहिती या सर्वांना होतीच तरीही उघडपणे शहरातील नागरिकांना समजू दिलेली नाही,ही बाब या नागरिकांची केलेली गद्दारी म्हणावी लागेल असा आरोप दौंड नागरिक प्रशासनावर करू लागले आहेत..
दौंड शहरातील या कत्तलखान्या च्या कार्यप्रणाली वरून कोणत्या-कोणत्या भानगडी या नगरपालिकेत झालेले आहेत. याचा सुद्धा आता अंदाज बांधणे अवघड झाले आहे.प्रामाणिक पणाने काम करणाऱ्या एखाद्या वरिष्ठ पातळीच्या अधिकाऱ्याने गेले वीस पंचवीस वर्षापासून ची सामाजिक कामांची माहिती तपासली पाहिजे.आलेला निधी झालेला खर्च आणि त्यातून झालेले काम याची प्रमाणिक पणे माहिती घेतल्यास ही पालिका नागरिकांचा विश्वासघात करणारी आहे. की काय? अशी शंका निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही,असा ठाम विश्वास शहरातील नागरिक करताना दिसत आहेत…