आवाज:लोकशाहीचा
पाटस:प्रतिनिधी
आमदार राहुल कुल यांच्यासाठी येणारी विधानसभेची निवडणूक आमचा तळतळाट व आमच्या विधवा भगिनीच्या आसवांची आणि वय-वृद्धांच्या तळमळीची भोगावी लागणार आहे.जेवढा त्रास आम्ही त्यांच्या वर्तनाने खोटे बोलल्याने आणि दिशाभूल करण्याने सोसलेला आहे त्याचा बदला म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मतदानारूपी आम्ही तो घेणार आहोत अशा स्वरूपाचा संताप जनक प्रतिक्रिया ज्येष्ठ कामगार सेवानिवृत्त कामगार नेते शिवाजीराव काळे यांनी व्यक्त केली आहे..
निवडणुकीला २२ दिवसांचा कालखंड उरलेला आहे.दुसऱ्या बाजूला तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत.सेवानिवृत्त कामगाराच्या आंदोलनाला वेगळाच रंग चढू लागलेला आहे.कारखाना व्यवस्थापन आणि चेअरमन तथा राहुल कुल पंधरा दिवसांमध्ये देणी देणार म्हणून जाहीर रित्या बोलले होते.त्याचा विसर त्यांना पडल्याने कामगारांच्या प्रश्नाचा तिढा वाढलेला आहे.ऐन दिवाळीच्या सणसुधाला अशा स्वरूपाचे संकट त्यांच्यावर आल्याने ते आता वैतागलेले असून त्यांच्याकडून आता तळमळ व्यक्त करीत शाब्दिक शाप देऊ लागले आहेत..
काळे बोलताना म्हणाले आमच्या जवळपास १०० सहकाऱ्यांना देवा घरी जावे लागले आहे.मात्र त्यांच्या घरी प्रचंड वेदनादायी परिस्थिती आहे.ते आमच्या विधवा भगिनी प्रचंड समस्ये मधून प्रवास करीत असताना त्यांनी येथे येऊन आपल्या व्यथा मांडताना आसवांना वाट मोकळी करून दिलेली आहे. हे चित्र आम्ही सर्वांनी पाहिलं आता हा लढा जीवन मरणाचा झाला आहे.म्हणून निश्चय केलेला आहे.
कारखाना उभारणीपासून ते सेवानिवृत्तीच्या काळापर्यंत वय वाढत गेलं आणि शरीर पेचात आलं काही बांधवांना चालणं फिरणं अवघड आहे.काहींना अनेक शारीरिक व्याधीन त्रस्त झालेले आहेत.या सर्वांची देणी देण्याचे भान आर्थिक दृष्ट्या गडजंग झालेल्या कूल यांना देण्याचे राहिलेले नाही.अनेक बहाने करीत विविध स्वरूपाने खोटं बोलून आमचा प्रश्न गेले आठ वर्ष अधिक काळ फुटबॉल सारखा लाथळत ईथपर्यंत आणलेला आहे.आमच्यात बसून मला तुमची देणी एवढी आहे ते माहित नाही असा खोटारडापणा करताना सुद्धा त्यांना थोडी शरम वाटलेली नाही आणि हा सगळा प्रकार आमच्यासाठी संतप्त जनक आहे..
तालुक्यात आमचे आंदोलन हे राजकीय दृष्ट्या नसून हे आमच्या कष्टाच्या कमाईची लढाई आहे.आणि या लढाईला बळ देण्यासाठी काही सामाजिक राजकीय मान्यवरांनी भेटी दिल्या तर यासाठी निवडणुकीच्या काळात हा भांडवल केलेला प्रकार आहे.अशा स्वरूपाची माहिती कुल प्रसार माध्यमांना देतात ही बाब मोठी गंभीर आहे..
एके-काळी त्यांचे वडील स्वर्गीय सुभाष बाबुराव कुल यांना आमदार करण्यासाठी या तालुक्यातील जनतेने स्वतःची भाकरी बांधून वर्गणी करून घोडा या चिन्हावर ती निवडून दिले ते तालुक्याचे आमदार झाले आणि त्यांच्या कुटुंबाचा पुढील प्रवास हा राजकीय पटला वरती प्रगतीचे शिखर पार करीत इथपर्यंत आलेला आहे.याचं भान राहुल कुल यांना राहिलेले नाही सत्तेची मस्ती आणि सत्तेतून मिळवलेल्या आर्थिक परिस्थिती मुळे ते हवेत असून वृद्धांचा अपमान करणे त्यांच्या प्रश्नाचे टिंगल-टवाळी करणे अशा प्रकारची जाणून बुजून खोडसाळ कामे त्यांनी केली आहेत..
आमच्या प्रश्नाची त्यांना चांड राहिलेली नाही आणि सत्तेच्या मस्ती मध्ये त्यांना भानही राहिलेले नाही ही सत्तेची मस्ती उतरवण्यासाठी होत असलेल्या विधानसभे मध्ये आम्ही सर्व वयोवृद्ध बांधव आमच्या विधवा भगिनी कूल यांच्या विरोधामध्ये गावागावात जाऊन नातेवाईक आणि गावकरी यांना हात जोडून आमच्यावर केलेले अन्यायाची माहिती देऊन विनंती केली जाईल ही निवडणूक आमच्या अभागं बहिणीच्या अश्रूंची आहे.
आम्हा वृद्धांच्या तळमळीची आहे.आमच्या कष्टाच्या पैशाच्या मागणीसाठी उभारलेल्या आंदोलनाची आहे.आणि या सर्वांना विचारात न घेणार सत्तेच्या जोरावरती दादागिरी करणाऱ्या राहुल कुलांचा पराभव करा अशा स्वरूपाची याचना करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या प्रकाराने दौंड तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकी प्रचारामध्ये आता वेगळ्या स्वरूपाचं वातावरण निर्माण होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला असून या सेवानिवृत्त कामगारांच्या आंदोलनाचा दणका निवडणुकीच्या वातावरणामध्ये मतरुपी कुलांसाठी धोकादायक होऊ शकतो का हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे