आवाज:लोकशाहीचा
वरवंड:प्रतिनिधी
________________________
कारखान्यावरील उपोषणकर्त्यांना कारखाना बंद असणाऱ्या काळातील पगार पाहिजे त्यासाठी त्यांनी हा सर्व प्रकार सुरू केला आहे.अशा स्वरूपाचा अपप्रचार पाटस आणि परिसरामध्ये सुरू झाला असून या पाठीमागे कोण? आहे हा संशोधनाचा विषय असला तरी कामगारांनी चेअरमन राहुल कुल यांच्या बगलबच्चन वरती शंका उपस्थित केली आहे
गेले २३ दिवस सेवानिवृत्ती नंतर आमची देणे मिळावीत या विषयाला अनुसरून या वृद्धांनी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.कारखान्याच्या मुख्य गेट समोर त्यांनी हे आंदोलनाला सुरुवात करताना ९ सप्टेंबर रोजी येथे उचित प्रशासनास पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे.साधारण त्यांच्या म्हणण्या नुसार ५० कोटी अधिक रुपयाची थकीत देणे दिली गेली नसल्याकारणाने आज सेवानिवृत्ती नंतरच्या कालखंडात त्यांच्या हक्काचे दाम मिळालेले नाही म्हणून त्यांचा हा उपक्रम सुरू केला गेला आहे.
एका बाजूला या उपोषणकर्त्यांचा रोष वाढत असताना दुसऱ्या बाजूला विधानसभेचे रणशिंग फुकलं गेलेलं आहे.यामध्ये विद्यमान आमदार तथा साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन राहुल कुल निवडणूक लढवीत आहेत.या निवडणुकीच्या काळामध्ये या आंदोलनकर्त्यांचा फटका बसू शकतो अशी भीती भक्तांना आणि त्यांच्या अनाजी पंतांना वाटू लागल्याने या कामगारांनी सुट्टीच्या काळातील पैसे मागितलेले आहेत आणि ते कसे द्यायचे अशा स्वरूपाची अफवा पसरविण्यास सुरुवात केलेली आहे.असा समज कामगारांचं झाला आहे.
जवळपास ५०० च्या आसपास असणाऱ्या यावर वृद्धांचा आंदोलनाचा कार्यक्रम कसातरी करून मोडीत काढला पाहिजे,अन्यथा याचा विपरीत परिणाम आपल्या नेतृत्वाच्या मतदानावर होऊ शकतो यासाठी काही विद्वान मंडळी कामाला लागलेले आहेत.या विध्वनातील काही बिरबलांनी अशा स्वरूपाची युक्ती शोधून काढले असून कामगारांना न्याय हक्काच्या पैसे द्यायचे नाहीत तर ते कारखाना बंद काळात कामावर जाऊन जेवण करायचे आणि परत यायचे अशा विषयाचा पगार मागत आहेत असे कळीचे काम त्यांनी हाती घेतलेले आहे.अशी समजूत कामगारांनी करून घेतली आहे..
कामगारांची देणे देण्याचा हा जो प्रश्न आहे.तो अलीकडच्या काळातला नसून कारखाना व्यवस्थापन आणि कामगार हे गेले आठ-दहा वर्ष आपल्या थकीत देणे संदर्भामध्ये लढा सुरू केलेला आहे.तू अद्यापही चालूच आहे.वारंवार लेखी आश्वासन शाब्दिक चर्चा या अनेक घडामोडी झाल्यानंतर अखेरचा टप्पा म्हणून या सेवानिवृत्त कामगारांनी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.त्यांच्या या आंदोलनाचा विषय हळूहळू तालुक्यातल्या गावागावातून घराघराच्या उंबरठ्यापर्यंत केलेला आहे.वृद्धांना न्याय मिळत नाही त्यांचे देणे दिले जात नाही त्यांच्याबरोबर खोटं बोललं जातं खोटं आश्वासन दिले जातं अशा स्वरूपाची गावभर चर्चा आता सुरू झालेले आहे.या चर्चेचा परिणाम आपल्या नेत्याच्या मतदानावर होऊ नये म्हणून बगलबच्चाने आणि त्यांच्या अनाजी पंथांनी हा सगळा कार्यक्रम वेगळ्या दिशेला फिरवण्यासाठी कामगारांचा आंदोलन हे थकीत देण्याचे नसून कारखाना बंद काळातील पगार मिळावेत म्हणून आहे. अशा स्वरूपाची नाराजी कळ लावण्याचे प्रयोजन त्यांना हाती घेतलेली आहे.
या सर्व प्रकाराने बगल-बच्चनच्या मनामध्ये खळबळ आणि गोंधळ निर्माण झाला असला तरी आमचे आंदोलन करते मात्र कमालीचे शांत आहे.यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे.आमची थकीत देणे मिळाली नाही तर आम्ही हंगाम सुरू करत येणार नाही अशा स्वरूपाची भीष्म प्रतिज्ञा सुद्धा कामगारांनी केल्याने कारखाना सुरू करण्याच्या विषयावर यांच्या विचाराची गडद संकट छाया पसरलेली दिसू लागलेली आहे.दिपवाळीच्या सणाचा आगमन अगदी दोन-तीन दिवसा येऊन ठेपला असून या वृद्धांना या आंदोलनामध्ये न्याय न मिळाल्याने कारखान्याच्या कार्यस्थळावरती आंदोलनाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयोजन सुद्धा केले जाईल अशा स्वरूपाची माहिती त्यांच्याकडून मिळत असल्याकारणाने परत एकदा गोड साखरेचे कडू कहानी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर ते सुरू झालेली आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही..