आवाज:लोकशाहीचा
राहू:प्रतिनिधी
आरोग्यदूता चा बहुमान आपल्याच समर्थका कडून मिळालेल्या आमदार राहुल कुल यांच्या आरोग्याच्या कामामध्ये मध्यस्थींना कमिशन द्यावे लागत होते आणि त्यामध्ये हलगर्जीपणा केल्यास येथे काय भाजीपाला चा सौदा आहे का? अशा स्वरूपाची भाषा मध्यस्थी वापरत रुग्णांच्या नातेवाइकांना अपमानित करीत होते.या प्रकाराला पाठबळ आमदार यांच्या कार्यालयातून होता की काय? अशी शंका निर्माण झाली आहे..
सविस्तर माहिती अशी की, दौंड तालुक्यामध्ये तीन ठिकाणी रुग्णांना मदतीसाठी पैसे घेण्यात आलेले आहेत एका रुग्णासाठी ४५ हजार रुपये घेतले असून दुसऱ्याला ३५ हजार रुपयाची मागणी करण्यात आलेली होती हे दोन्हीही रुग्ण चौफुला येथील आणि ऐक तालुक्यातील.असून पैकी दोनजण आमदारांच्या संपर्क कार्यालयाच्या वलयामध्ये राहणारे आहेत.चौफुला येथील संपर्क कार्याच्या हाकेच्या अंतरावरती एकाचा व्यवसाय असून दुसरा या चौफुलातील स्थानिक रहिवासी आहे..
रमजान शेख नावाच्या व्यक्तीच्या मुलाच्या खुब्यातील बॉल खराब झालेला होता.त्यासाठी त्याला मोठा खर्च असल्याने परिस्थितीच्या अनुषंगाने तो करणे त्याला अवघड होते. तालुक्यामध्ये आमदार राहुल कुल हे आरोग्यासाठी मदत करतात आणि त्यांचं नाव झालेला आहे.त्यांना आरोग्यदूत म्हणतात हे ह्याला माहिती असल्याकारणाने तो आपल्या पत्नीसह त्यांच्या राहू या राहत्या घरी गेला होता.त्याने जाताना उपचारासाठी लागणाऱ्या सर्व टेस्ट आणि पुण्यातील संचेती हॉस्पिटल ची फाईल बरोबर नेलेली होती.कुल यांच्या घरी गेल्यावरती त्यांचे स्वी सहाय्यक शिर्के त्यांना भेटले त्यांनी बसण्यासाठी सांगितले आता दादा येतील अशा स्वरूपाचा विश्वास दिला होता.
काही वेळातच आमदार त्यांना भेटले त्यांनी फाईल पाहिली मी डॉक्टर नाही काय काम आहे ते सांगा अशा स्वरूपाच्या त्यांनी विचारणा करीत सदर मदतीसाठी शिर्के यांना सूचना केल्या शिर्के यांनी मला यवत येथील योगेश घाटे नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी पाठवले होते.योगेश घाटे यांना भेटल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्राची फाईल पाहिली आणि ३५ हजार रुपये द्यावे लागतील अशा स्वरूपाची मागणी केली परिस्थिती हालाख्याची आणि गरीब असल्याकारणाने हे पैसे एवढे देऊ शकत नाही अशा स्वरूपाची त्यांना शेख यांनी माहिती देत मी २० हजार देतो तुमचा जाणे येण्यासाठी लागणारा खर्च करतो असे सांगितलें हे ऐकताच “हा काय भाजीपाला आहे का”? अशा स्वरूपाच्या भाषेचा वापर घाटे यांनी करून मदत करण्याचे नाकारले होते.
फाईल नाकारताच शेख हे म्हणाले मला दादांनी पाठवलेला आहे दादांना मला हे सांगावं लागेल तेच घाटे म्हणाले दादालाच काय तुला अजून कोणाला सांगायचे त्याला सांग या शब्दांचा वापर करणाऱ्या घाटे यांच्या बाबतची तक्रार शिर्के यांना केली होती घाटे ३५ हजार रुपये मागतात असे त्यांना सांगितले असताना त्यावेळी शिर्के स्वतः म्हणाले द्यावे लागतील, हा सर्व प्रकार आरोग्य दुत संबोधल्या जाणाऱ्या आमदार कुल यांच्या बरोबर काम करणारा शिर्के बोलल्याने शेख गडबडून गेले होते.
दुसरा रुग्ण असाच होता त्याच्या दोन्ही बॉल बदलायचे होते घाटे यांनी त्याच्या कडून सुधा ४५ हजार घेतले आहेत.पैसे घेऊन त्याचा ऐका पायाचा खुबा दुरुस्त करण्यासाठी मदत केली दुसऱ्यासाठी त्याला स्वतःच मदत मिळवावी लागलेली आहे.त्यानें नाव टाकू नका ती मोठी माणसं आहेत उगाच काहीतरी बला मागे लावतील अशी विनवणी केली आहे.
शेख यांनी त्यांच्यावर घडलेल्या आरोग्यदूत त्यांच्या बाबतचा प्रसंग लोकशाहीच्या माध्यमातून कथन केलेला असला तरी दुसरा व्यक्तिमत्व आमदार साहेबांची पंगा नको या विषयाने घाबरलेला आहे तिसऱ्याच पैसे देण्याचे कबूल झाले असून याचा पाठपुरावा पाटस. येथील सामाजिक कार्यकर्ते जातीने करीत आहेत त्यांच्या जवळच्या पाहुण्याचा प्रकार आहे हा सर्व प्रकार धक्कादायक असून याविषयी आमदार राहुल कुल यांच्याशी भ्रमण दूरध्वनीवरून चर्चा केली असता ते म्हणाले माझ्याकडे तक्रार कोणी केलेली नाही.सध्या राजकीय वातावरण निवडणुकीमुळे बदलेले आहे.त्यामुळे कोणी आरोप करत असेल मी हजारो रुग्णांवरती उपचार करण्यासाठी काम केलेला आहे.त्यातील कोणाची तक्रार नाही यांनी माझ्याकडे तक्रार केली असल्यास मी चौकशी केली असती अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आहे..
तालुक्यामध्ये हजारो रुग्णावर उपचार करणाऱ्या हे आमदार कोणाच्या कार्याला या तीन प्रकरणामुळे गालबोट लागलेले दिसून येते असून हा संशोधनाचा विषय बनला आहे मात्र हा घाटे कोण? शिर्केचा आणि त्याचे कनेक्शन काय? आणि यांनी आतापर्यंत किती रुग्णांना उपचार केलेले आहेत.यातील किती रुग्णांकडून कमिशन घेतलेला आहे.अशा अनेक प्रश्नांचा जन्म झालेला आहे.याची उत्तर मात्र ज्या ज्या रुग्णांना त्यांनी मदत केलेले आहे.त्यापैकी काही रुग्णांना त्यांनी पैशाची मागणी केली असेल काहींना केलीही नसेल अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहे.
या सर्व घडामोडींचा बारकाईने विचार केला असता आरोग्याच्या मदतीच्या कामातच कमिशन मिळवणारे रुग्ण काम करतात का? आणि त्याला पाठबळ आमदार राहुल कुल यांच्या कार्यालयातूनच आहे का? यावरती शंका निर्माण होणे सहाजिकच आहे.