बारामती लोकसभेत सुळे आणि पवार यांचा निकाल काही झालं तरी भाजपला आनंद देणाराच ?

15

दौंड:-आवाज लोकशहीचा

बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपा.पार्टीने मोठा डावपेच साधला असून सद्या पवार कुटुंबातील नणंद भावजय यांच्या लढतीत कोणीही निवडून आले तरी भाजपा गटात अंतर्गत आनंदाचे वातावरण असणार आहे.


आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी पहिली गुगली शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना कट कारस्थान करून आपल्या गोटात घेतले आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे हिच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा यांना निवडणुकीत उभे करून आव्हान उभे करण्यास भाग पाडले आहे.


ऐका विचाराने राज्यावर आपल्या परिवाराचा प्रभाव टाकणाऱ्या पवार कुटुंबाची यामुळे दुफळी निर्माण झाली आणि आज बारामती लोकसभा मतदार संघां मध्ये काका पुतणे एकमेकाचे कट्टर दुश्मन म्हणून निवडणूकीला सामोरे जातं आहेत.


राज्यात आणि देशात शरद पवार यांच्या राजकीय अनुभवाचा मोठा प्रभाव असल्याकारणाने भाजपा पार्टीला राज्यात आणि देशात काम करताना पवार हा एक मोठा अडथळा होता या अडथळ्याला बाजूला करण्यासाठी पवार कुटुंबियातील हे पडद्याआड चे राजकारण केलं गेले आणि त्यासाठी त्यांना   राजकारण कटकारस्तानाने करावी लागलेली आहे त
सध्या ही निवडणूक  सुळे यांच्या विरोधात सुमित्रा पवार यांच्या विरोधात जरी असली तरी या  पैकी कुणाचाही पराभव झाला अन्यथा विजय झाला तर दोन्ही बाजूने भाजपाच्या गटात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

याची सविस्तर माहिती अशी की अजित पवार हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली भारतीय जनता पार्टीने डावपेच टाकून शरद पवार यांच्या विरोधात उतरवून शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोडी काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि या काका पुतण्याच्या वादात संस्थापक अध्यक्ष असलेल्या पवारांच्या पक्षाचा ताबाच अजित पवार यांच्या गटाला देऊन टाकण्यात आला यासाठी भाजपाला जे जे काम समोरून आणि पडद्यावर करावे लागले ते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणांनी केली सध्या अजित पवार हेच राष्ट्रवादीचे मूळ आहे असा अभाव करीत शरद पवार या संस्थापक अध्यक्षांच्या हातात पक्षाचे चिन्ह सुद्धा ठेवलेले नाही आणि म्हणून काका पुतण्याचा वाद शिगेला गेला आणि परिणाम आता दोन्ही मान्यवरांनी एकमेकांच्या विरोधामध्ये राज्यातच शड्डू ठोकला आहे पवार यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केलेत आणि अजित पवार यांनी सुद्धा आपले काही उभे केलेले आहेत..


बारामती लोकसभा मतदारसंघ या काका पुतण्यांच्या दिलेल्या उमेदवारांमुळे प्रचंड लक्षवेधी झाला आहे एका बाजूला शरद पवार यांची कन्या दुसऱ्याला अजित पवार यांची पत्नी ही लढत ही पवार कुटुंबीयांच्या वादाची नसून भाजपाच्या राजकीय खेळीचे चालू आहे पवार यांच्या विरोधात अजित पवार यांची पत्नी का द्यावी लागली याचा सखोल अभ्यास राजकीय मान्यवरांनी केल्यास या सर्व घडामोडी च्या पाठीमागे भाजपाचे लोकं आहे असा निकष निघाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची पत्नी विजयी झाली आणि पवार यांची मुलगी हारली तर भाजपाच्या गटांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन शरद पवारांना नामोहरन केल्याचे समाधान होणार आहे.


दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची पत्नी यामध्ये पराभूत झाली तर अजित पवार राजकारणांमधून पायउतार होण्याची संकेत अप्रत्यक्षरीत्या राज्यभर पोचणार आहे आणि हा आनंद भाजपा पार्टी एवढा दुसरा कोणत्याच पक्षाला होणार नाही अशा स्वरूपाची दुहेरी चाल भारतीय जनता पार्टी कडून खेळली गेली आहे.या खेळीत पवार कुटुंबियांचं मोठं नुस्कान होणार असून आनंद मात्र भाजपा पार्टीला आत्या नंदासारखा होणार याचं राशिभविष्य फडणवीस यांना सुद्धा सांगण्याची गरज उरलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here