आवाज-लोकशाहीचा
यवत-प्रतिनिधी
तीनशे देतो ! अंन नाष्टा बी देतो ! फक्त दोन तास थांबायचं दौंड तालुक्यातील यवत येथीलव इंदिरानगर झोपडपट्टीतला हा सौदा केला तरी कुणी? हा प्रश्न झोपडपट्टीतील गोरगरिबांच्या चर्चेमधून निर्माण झाला आहे.
सोमवार दि २८ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या नंतर यवत येथील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये तीनशे रुपये देतो ! वरून नाष्टा बी देतो ! फक्त दोन तास थांबायचं आहे.अशा स्वरूपाच्या चर्चेने परिसरात मोठा गलका सुरू झाला होता. मला मिळाले ! तुला मिळाले का? तू येणार का? मी जाणारच आहे ! रोख मिळणार आहेत.अशा स्वरूपाचा हा कालवा या गरिबांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाला आहे..
दिवाळीचा सण सुरू झालेला आहे.अचानक तीनशे रुपयांचा लाभ वरून नाष्टा मिळणार आहे.फक्त दोन तास थांबायचं जायची येयची याची चिंता नाही.या सर्व प्रकाराने दुधात साखर पडल्याचा योग या बंधू भावांना मिळाल्यामुळे त्याची चर्चा होणे साहजिकच आहे.
सद्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे.त्यातील पहिला टप्पा उमेदवारी अर्ज भरण्याचा असून उद्याचा अखेरचा दिवस आहे. अर्ज भरणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे गर्दीची गरज आहे. गर्दीसाठी कार्यकर्त्यांच्या जीवाचा आटापिटा सुरू झाला असून गर्दीला लोक आणायची तरी कुठून म्हणून रोजनदारी वरती काम करणाऱ्या गरीब कामगारांना सध्या अशा माध्यमातून वापरण्याचा नवीन फंडा सुरू झालेला आहे..
यवत गावासाठी पुणे सोलापूर महामार्गावरती पूर्वेला इंदिरा नगर नावाने झोपडपट्टी वासियांची वसाहत आहे.या ठिकाणी काबाड-कष्ट करणारा मजूर वर्ग राहतो अत्यंत गरीब आणि रोज कष्ट करून खाणारा हा वर्ग असल्याने अचानक अशी सुवर्णसंधी या मित्रांना म काम न करता दोन तास हजेरी लावून नाष्टा ही मिळणार वरून तीनशे रुपये देत असलेल्या आल्याने तिच्या बाबत मोठी उत्सुकता वाढलेली आहे..
अरे तुला मिळालं का? मी जाणार आहे.तो आपला हा आला का? त्याला पण सांगा! आपण सर्व एकाच गाडी जाऊ आणि जातं येईल,सोय त्यांचीच आहे. ही एकमेकांचे चर्चा संध्याकाळच्या वातावरणामध्ये गावातील दुकानदारां पर्यंत पोहचली आहे.
राजकारणात गट असतात एकमेकांचे विरोधक त्यामुळे झालेले असतात साहजिकच आहे.हा प्रकार कोण करतय याकडे गावातील काही गाव पुढार्यांचे लक्ष सुद्धा असते. यातूनच हे प्रकरण बाहेर आले आहे.एका गाव पुढाऱ्याला ही सगळी माहिती मिळाली तालुक्याने आपल्या गुप्तहेर मात्र इंदिरानगर वसाहतीमध्ये जाऊन याची पूर्ण चौकशी केली तर तीनशे रुपये ! नाष्टा जाण्याची सोय ! अशा या एक दिवसीय लाभाचा नागरिकांनी मोका उचललेला आहे. सर्वांना निघताना गाडी बसताना त्यांची ठरलेली बिदागी दिली जाईल असं अभिवचन देण्यात आलेले असल्याने नाष्टासाठी तुमच्यातील एकावर जबाबदारी दिली जाईल अशा स्वरूपाचा विश्वास सुद्धा देण्यात आलेला आहे..
हा सर्व प्रकार कोणी केला का? केला हे मात्र या गरिबांच्या तोंडून सांगितलं जात नाही.साहेब कामाला गोरगरिबाला दिवाळीच्या सणाच्या तोंडावर तशा स्वरूपाचा लाभ होतोय तर नाव सांगितल्यामुळे तो बंद होऊ शकतो.
असा मोका परत येणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला याच्यामध्ये पाडू नका गोरगरिबाच्या अशा लाभावरती तुम्ही अडचण निर्माण करू नका अशा स्वरूपाची विनंती आणि विनवणी हे लोक माहिती घेणाऱ्यासमोर करीत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे अचानक मिळणाऱ्या लाभाचा विषय असला तरी हा लाभ देणारा होता तरी कोण? हा प्रश्न मात्र शोध मोहिमेचा विषय बनला आहे..