आवाज-लोकशाहीचा
राहू-प्रतिनिधी
राहुल कूल यांच्या नावाने यंदाची दिवाळी कारखाना गेट समोर भाजी-भाकरी आणून काळ्याफिती लावून केली जाईल अश्या स्वरूपाची माहिती जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे व त्यांचे सहकारी हनुमंत वाबळे,अर्जून दिवेकर,तुकाराम शितोळे यांनी दिलेली आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर सेवानिवृत्त कामगारांनी चक्री उपोषण सुरू आहे त्याला २८ दिवस झाले असले तरी त्यांच्याकडे कारखाना प्रशासनाच्या वतीने तसेच शासनाच्या वतीने पोलीस विभाग सोडल्यास कोणीच लक्ष दिलेले नाही.दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे.सणासुदीला दोन रुपये आपल्याला मिळावेत आणि दिवाळी गोड व्हावी अशा स्वरूपाची अपेक्षा सेवा सेवानिवृत्त कामगारांना होती..
मात्र वेगळच घडले आहे.कष्टाचे आणि घामाचे पैसे सेवानिवृत्ती नंतर मिळाले नसल्याकारणाने सेवानिवृत्त वयोवृद्ध जवळपास ३०० अधिक कामगार साखर कारखाना चेअरमन विद्यमान आमदार राहुल कुल आणि संचालक मंडळाच्या विरोधामध्ये अगदी त्रस्त होऊन गेट समोर चक्री उपोषण करीत आहे या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी विद्यमान आमदार व भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांना वेळ नाही..
एका बाजूला विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे.कुल सध्या तालुक्याचे आमदार असून पुन्हा आगामी काळात आमदार व्हावी म्हणून वेद लागले आहेत.निवडणुकीमध्ये ते अर्ज भरनारआहे.निवडणूक जिंकण्यासाठी ते दिवसाची रात्र करायला सुरुवात केले आहे.कधी न भेटणाऱ्याला हात जोडू लागले आहेत.तिरस्कार करणाऱ्यांना जवळ घेऊ लागले आहेत.आम्हा जेष्ठाकडे दुर्लक्ष करणाऱ्यां जाहीर रीत्या सांगताना मी सर्वांचा सन्मान करतो,अशा स्वरूपाच्या बढाया मारू लागले आहेत.त्यांच्या बगलबच्चांनी आमच्या विरोधात उलट-सुलट बोलण्यासाठी अभ्यास सुरू केलेला आहे.हे सर्व एका बाजूची सद्यस्थिती वस्तू निस्ट परिस्थिती आहे..
आम्ही सेवानिवृत्त कामगार मात्र दिवाळीच्या तोंडावरती आज २८ दिवस त्यांना वयोवृद्धांच्या घामाचे आणि कष्टाचे राहिलेले पैसे मिळतील म्हणून अशावाद करीत आहोत.साखर कारखाना व आमचं नातं नोकरीला लागल्यापासून ते सेवानिवृत्त असेपर्यंत कुटुंबासारखे होते.या कुटुंबाचा प्रमुख गेले २०-२२ वर्ष असलेले चेअरमन आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत.आणि आमच्यावर मात्र भीक मागण्याचे दिवस आले आहेत..
निवडणुकीसाठी आता वारेमाप खर्च करण्याच्या तयारीत कुल असून आम्ही मात्र आमची देणी मिळावी म्हणून मागण्या पूर्ण होतील या आशेने बसलेलो आहोत,ही दिवाळी आमच्यासाठी गोड होण्याची शक्यता मावळलेली आहे.गेले आठ-दहा वर्ष आमच्या प्रश्नाना भूल थापा देत आहेत.पंधरा दिवसात देतो म्हणून त्यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमांमध्ये जाहीर भाषणातून केलेले वक्तव्य ते आता विसरून गेलेले आहेत. मला तुमची एवढी देणे आहे ते माहीतच नाही अशा स्वरूपाचा खोटारडे पणा त्यांनी स्वतःच्या तोंडून उघड केलेला आहे.
जेपण झालं ! सन्मान नाही.मान नाही आमच्यातील मृत झालेल्या ९० व्यक्तीच्या विधवा अभंगांना किंमत नाही. तालुक्याची आमदारकी मिळवण्यासाठी ते धडपड करताय,बारीक-मोठा खर्च करण्याच्या तयारीत आहेत. ते आमदार झाले तर या तालुक्याचे वैभव धुळीस मिळाल्या शिवाय राहणार नाही असे कामगार माहिती देत आहेत.
आम्हाला सुद्धा वाईट वाटून यातून वेदना होत आहेत मात्र ज्याची वृत्ती कशी आहे त्याची माहिती सर्वांना देणे आम्हा वृद्धांचं काम आहे.आयुष्यातील वृद्धत्व हे ऊन वारा पाऊस सहन करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि हा सर्व अनुभव आम्ही तुम्हाला कथन करतोय याला एकमेव जबाबदार तर राहून पुढे सत्तेची मस्ती त्यातून मिळालेला आर्थिक स्रोत प्राथमिक मध्ये निर्माण करीत अन्याय अत्याचाराच्या अनेकांना वर केलेले आहेत..ते लोकांशी दाखवताना एक रूप असून अंतर्गत त्याचे रुप प्रचंड वेगळा आहे.
सत्तेतून पैसा कमावणे आणि पैशातून गोर-गरिबांची मत विकत घेऊन परत एकदा सत्य त्यांनी याचे स्वप्न या स्वप्नाला भंग करण्यासाठी मतदारांनी सुद्धा विचार करावा अशी आम्ही आव्हान काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी करून नमूद करतो की यंदाच्या दिवाळीसाठी गेट वरती मिरची भाकर खाऊन काळ्या-फिती लावून आम्ही या घटनेचा कुल यांचा व त्यांच्या संचालक मंडळांचा जाहीर निषेध नोंदवणार आहेत अशी महिती त्यांनी दिली आहे.