निरानी ग्रुप कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांच्या माहितीने राहुल कुल यांची केली लबाडी उघडी ?

27

आवाज-लोकशाहीचा
पाटस:प्रतिनिधी

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्याशी आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही.आम्ही हा कारखाना राज्य सहकारी बँके मार्फत करार करून घेतलेला आहे.अशी धक्कादायक माहिती निरांनी ग्रुपचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिल्याने चेअरमन तथा आमदार राहुल कुल आणि त्यांच्या संचालक मंडळाचा खोटारडे पना उघड झाला की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे

माहिती देताना कामगार उपायुक्त टी अत्तार मॅडम त्यांच्या सवेत कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार युनियनचे  माजी अध्यक्ष अर्जुन दिवेकर व विद्यमान कामगार युनियन चे अध्यक्ष प्रवीण शितोळे त्यांचे सहकारी केशवराव दिवेकर ऊस उत्पादक सभासद मनोज फडतरे काही सेवानिवृत्त वृद्ध कामगार आणि पत्रकार उपस्थित होते.

तालुक्यामध्ये साखर कारखाना विकला नाही तो सभासदांच्या मालकीचाच ठेवला असून अडचणीच्या काळातून उभा करण्यासाठी हा यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे.अशी बढाई मारत कारखान्याचे चेअरमन विद्यमान आमदार राहुल कुल आणि त्यांच्या संचालक मंडळासह पाठीराख्यांकडून माहिती पसरवण्यात आलेली होती  पाटील यांच्या माहितीने कुल यांनी सभासदांची दिशाभूल केलेली आहे ?हा आरोप होणे सहाजिकच आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की कारखाना स्थळावरती चक्री उपोषणास बसलेल्या सेवानिवृत्त वृद्ध कामगारांच्या भेटीसाठी कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथून प्रतिनिधी स्वरूपाने आत्तार् मॅडम यांनी कामगारांची भेट घेतली त्यांचे प्रबोधन केलं त्यानंतर निराणी ग्रुपचे कार्यकारी संचालक पाटील यांची वेळ घेऊन भेट घेतली या त्यांच्या भेटीच्या वेळी कारखाना स्थळावरती काही वृद्ध कामगार उपस्थित पत्रकार फडतरे आणि आजी-माजी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

आत्तार यांनी यावेळी पाटील यांना कामगारांबाबत आपण काही करू शकतो का? कारखान्याचा आणि तुमचा करार करण्यात आला यावेळी यांच्या थकीत देनिन बाबतचा  विषय नमूद करण्यात आलेला आहे का? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारताच पाटील यांनी अतिशय गंभीर स्वरूपाची माहिती देऊन एक धमाकाच करून टाकला ते म्हणाले आम्ही कारखाना राज्य सहकारी बँकेकडून कराराने घेतलेला आहे.या संचालक मंडळाचा आणि आमचा कुठल्याही स्वरूपाचा या विषयात संबंध नाही.आम्ही बँकेशी केलेल्या करार पत्रकात २० सप्टेंबर २०२२ नंतरच्या कालखंडामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांची सर्व देणे देण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे.मात्र या पूर्वीच्या सेवानिवृत्त कामगारांच्या देणीबाबत आमचा कुठलाही संबंध येत नाही.

आम्हाला राज्य सहकारी बँके मार्फत काही सूचना या संदर्भात आल्यास त्याविषयी आम्ही विचार करू शकतो.अन्यथा आमचा त्या उपोषणकर्त्या कामगारांच्या देण्या-संदर्भातला सूतभरही संबंध नाही असे ठणकावून सांगितले आहे या वेळी उपस्थित असलेले मनोज फडतरे  म्हणाले संचालक मंडळ आणि चेअरमन राहुल कूल यांचा संबंध जर नसेल असं तुमचं मत असल्यास कारखान्यावरती सर्वसाधारण वार्षिक सभा कशी घेण्यात आली या प्रश्नाकडे बघून पाटील क्षणभर गडबडले आणि न पटणारे उत्तर देऊन  प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.

राज्य सहकारी बँक आणि तुमच्या मध्ये झालेला करार ऊस उत्पादक सभासद यांच्यासाठी का दाखवला जात नाही तो जाहीररीत्या उपलब्ध झाला पाहिजे,असाही प्रश्न फडतरे यांनी विचारतात तुम्ही तशा स्वरूपाचा लेखी मागणी आमच्याकडे करा आम्ही राज्य बँकेशी बोलून याबाबतचा विचार करू असे सुद्धा पाटील यांनी सांगितले आहे.

विद्यमान आमदार तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक यांचा आमच्याशी संबंधच नाही असे ठणकावून पाटील ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस कारखान्याचा नक्की प्रकार काय? आहे हा दुसरा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही एका बाजूला तालुकाभर कारखाना विकला नसून तो करारावर आम्ही चालवायला दिलेला आहे.तो सहकारीच राहणार आहे.अशा स्वरूपाची माहिती पसरवली गेली होती या माहितीला त्यांचा संबंधच नाही या पाटील यांच्या माहितीने मोठा दणका बसला आहे.परिणामी कारखान्याचे नक्की काय झालं ? राज्य बँकेने चालवायला दिला असेल तर संचालक मंडळाची लुडबुड कशासाठी त्यांचा या घटनेची संबंध काय ? करार बँकेचा आणि निराणी ग्रुपचा आहे.असे विविध प्रश्न निर्माण झालेले आहे.

या सर्व भानगडी आणि प्रश्नांची उत्तरे चेअरमन राहुल कुल आणि संचालक मंडळाने कागदपत्रांच्या पुराव्यासह सभासदांना माहिती दिली पाहिजे,अशी अपेक्षा निर्माण होणेही साहजिकच आहे.कारखान्याच्या कराराचा यानिमित्ताने खरा गोंधळ निर्माण झाला असून याचे गौडबंगाल काय? हा प्रश्न तालुक्याच्या दृष्टीने टीका-टिपणीचा झाला असला तरी कारखाना आम्ही चालू करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहे असा तालुकाभर प्रचार प्रसार करणाऱ्या कुल आणि त्यांच्या चेल्या चपट्या नी तालुक्यातील लोकांना गंडवल का त्यांच्याशी खोटे  बोलले का?.हा खरा प्रश्न उपस्थित झालेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here