आवाज-लोकशाहीचा
वाळकी:प्रतिनिधी
राहुल कुल गटामध्ये कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू झाल आणि प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली अशा स्वरूपाच्या बातम्या तयार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा नवीन फंडा आता सुरू झालेला आहे.एका बाजूला राहुल कुल विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करण्याचा आव्हान करता करता त्यांनी थेट अजित पवारला जाऊन भेटून सांगता कार्यकर्त्यांना काम करायला सांगा अशी गळ घालून युतीचा धर्म पाळावा आघाडी साठी सर्वांनी काम कराव माझ्यासाठी मदत करावी अशा स्वरूपाची याचना ते करू लागलेले आहेत..या दोन्ही प्रकारांमुळे नक्की राहुल कुल यांच्याकडे इनकमिंग वाढलेला आहे.की राहुल कुल चं आउटगोइंग जाऊन मार्ग कधी लागेल आहेत का ? हा प्रश्न खऱ्या अर्थाने दौंड तालुक्यात निर्माण झाला आहे.
तालुक्यामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे.पारंपारिक लढत म्हणून रमेश थोरात विरोधात राहुल कुल हे प्रबळ दोन उमेदवार उभे असून अन्य उमेदवारांच्या तुलनेमध्ये यांची लढत लक्ष वेधून घेणारी असल्याने आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी बरोबर फसवा प्रताप करण्याची शर्यत कार्यकर्त्यांमध्ये लागली असणार याबद्दल शंकेचे कारण नाही.
मागील पंचवार्षिक मध्ये रमेश थोरात यांचा ७४६ मताने अवघ्या पराभव झाला होता.मात्र हा पराभव झालेला नसून या पराभवासाठी काय अतृप्त आत्म्याने काम केलं होत अशा स्वरूपाची लोक चर्चा होती.त्यानंतर बरेच राजकीय उलथा पालथं झाली आहे.अनेक समस्या निर्माण झाल्या सत्ताधाऱ्यांकडून चुका झाल्या आणि पराभव झालेल्या रमेश थोरातकडून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी कामे झाली आहेत.
सध्या रमेश थोरात यांनी शरद पवार यांच्या गटाचे तुतारी चिन्ह घेऊन राहुल कूल यांना तगडे आव्हान दिलेले आहे.तालुका राम-कृष्ण-हरी आणि वाजवा तुतारी या ब्रीद वाक्याने कुल प्रचारकांचा श्वास गुदमरू लागला आहे आणि त्यांना या निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे यातून मार्ग काढण्यासाठी नव्या नव्या युक्त्या आणि वेगवेगळे नाटकी प्रयोग करण्यासाठी त्यांच्या काही अनाजी पंतांनी कार्य हाती घेतले आहे.आमच्या गटात प्रवेश झाला अशा स्वरूपाच्या बातम्या प्रकाशित करून लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
निवडणूक प्रचार दरम्यान कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा गमच्या टाकून आपला गट मजबूत होत आहे.अशा स्वरूपाचे चित्र करण्याचा अनेक वर्षांपूर्वी पासूनचा रिवाज आहे आणि हे काम प्रत्येक उमेदवार करीत असतो यात अवघड असे काम नाही हा सर्व प्रयोग नागरिकांना माहीत झालेला आहे.कुल यांच्या कारभाऱ्यांनी शिंदेवाडी येथे राजाभाऊ तांबे यांच्या बाबत करण्याचा प्रयत्न केला होता.तो डाव त्यांच्या अंगावर उलटला गेला आहे.कुल यांच्या गटात इंकमिग सुरू असून प्रचारात आघडी घेतल्याचे चित्र रंगविण्याचा यशस्वी भागीरथी प्रयत्न करण्याचा प्रताप करू लागले असताना स्वतः राहुल कुल प्रकाराने खुश नाहीत त्यांना तालुक्यात कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मदत केली पाहिजे म्हणून अजित पवार यांना गळ घालावी लागलेली आहे.कार्यकर्त्यांना काम करायला लावा आघडीचा धर्म पाळला जावा अशी विनंती करावी लागलेली आहे..
इनकमिंग वाढले आणि आघाडी घेतली असा आभास निर्माण करणाऱ्या या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांना कुल हे अजित पवार कडे जाऊन तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांसाठी विनंती करून आलेले आहेत याची आठवण राहिलेली नाही का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.या सर्व प्रकाराने कुठे इन्कमिंग आहे आणि कुठे आउटगोइंग झालेला आहे.हे मतदारांना सांगण्याची गरज भासत नाही.