रमेश थोरात यांच्या प्रचाराने राहुल कुल घायाळ विकास कामांचां प्रचार सोडून मदती घेण्याचा प्रयत्न

21

आवाज लोकशाहीचा
राहू प्रतिनिधी

राहुल कुल यांचा विकासनामा रमेश थोरात यांच्या प्रचारापुढे बारंगळला असून त्यांना आपल्या विकासावरती भरोसा राहिलेला नाही.विकासाच्या जोरावर मते मागण्या नागरिकांसमोर जाताना आपली पीछेहाट होती हे लक्षात आल्यावर त्यांनी तालुक्यातील अनेक मान्यवरांना गळ घालून आपल्यासाठी प्रचार करावा अशा स्वरूपाची विनवणी सुरू केलेली आहे.

तालुक्यात कुल यांच्या तीस वर्षाच्या राजकारण आणि सहकारातील कामांबाबत टिंगल-टवाळी होत असल्याने कुल यांच्यावर पराभवाची छाया पसरू लागलेली आहे त्यांना प्रचारात कोणाचा सहारा घेऊ आणि कोणाची मदत घेता येईल ही धडपड सद्या दिसत आहे

अजित पवार याला विरोध करून तालुक्यात स्वतःचे आस्तित्व निर्माण करण्याच्या भानगडीत असणारे कुल आता अजित पवार यांना गळ घालून तुम्ही आघाडीचा धर्म पाळावा मला मदत करावी कार्यकर्त्यांना सूचना कराव्यात अशी विनवणी करताना दिसले आहेत.

तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या सुविधा आणल्या माझ्या माध्यमातून आणल्या गेल्या आणि मी विकासाचा फार मोठे काम केले अशा स्वरूपाचा ढोल नागरिकांच्या समोर फुटल्यामुळे त्यांनी आता तालुक्यातील मान्यवर आनंद थोरात,महेश भागवत,विकास आबा ताकवणे,सागर फडके,वैशाली नागवडे,मधुकर दोरगे अश्या महत्त्वाच्या लोकांपुढे जाऊन विनंती आणि याचना केली गेली आहे.

विरधवल जगदाळे यांना सुद्धा मला मदत करा अशा स्वरूपाची विनंती केलेली नागरिकांनी पाहिलेली आहे.काही त्यांचे समर्थ असू शकतील मात्र गेली अनेक वर्ष त्यांना दूर ठेवलेले होते असे नागरिक बोलून दाखवत आहेत
गेली अनेक वर्ष सत्तेत असताना अनेकांची मने दुखाववेलेल्याना आकर्षित करण्यासाठी आपल्या कारभाऱ्यांनी त्यांचे घरी हजेरी लावण्यास सूरावात केल्याने अश्या नागरिकांच्या घरच्यांना त्याची अडचण होऊनही यांच्यावर काहीही परिणाम होत नाही अशी परिस्थिती आहे.

पाटस येथील सहकारी साखर कारखान्यात पुढे बसलेल्या वृद्धांना प्रचंड मनस्ताप देणाऱ्या कुलांच्या राजकारणाचा खऱ्या अर्थाने आता पडदा-उघड झाला असल्या कारणाने हे वयोवृद्ध आता गावोगावी जाऊन त्यांची कैफियत मांडताना नागरिकांना आव्हान करू लागलेले आहेत. कुल हे फसवे आहेत.कुल हे दादागिरी करतात कुल वृद्धांचा अपमान करतात अशा स्वरूपाच्या प्रचाराने मात्र कुल आता घायाळ झालेले आहेत.एवढ्या पुरताच आता त्यांचा प्रचार मर्यादित राहिलेला नसून माझ काय चुकल असल्यास सुधारूना करून घेऊ आता तेवढं काम करा अशी विनवणी सुधा करताना दिसू लागले आहेत.

पाच वर्ष दुर्लक्षित असलेल्यांना जवळ घेऊन समजुतीच्या स्वरात झाल गेलं विसरून जा अशी विनवणी करताना दिसत असून हे सगळं विसर आपण नंतर पाहू चूक असल्यास आपण दुरुस्त करू अशा स्वरूपाच्या विनंती आणि याचं मतदारांपुढे होताना दिसू लागले आहेत.

तीस वर्ष कुल कुटुंबामध्ये दौंड तालुक्याच्या लो कप्रतिनिधींची सत्ता असूनही त्यांच्याच राहत्या गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी नसल्या कारणाने गावांमध्ये मोठा असंतोष खतखदू लागलेला आहे सर्व मंडळी कमालीची शांतता बाळगून असली तरी ती वादळापूर्वीची शांतता आहे.अशा स्वरूपाचा दबक्या आवाजात त्यांचा सूर ऐकण्यास मिळत आहे.

रमेश थोरात यांच्या या तालुक्यातील थेट मतदारांशी होत असलेला थेट संवाद आणि त्यातून मिळत असलेला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढू लागल्याने कुल प्रचारक आणि कुल परिवार घराघरात जाऊन विनंती करीत आहेत या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केल्यास कुल आता विकास केला विकासाच्या जोरावर मला मते द्या ही भाषा बोलताना दिसत नसून मला कोणाची मदत मिळेल का?म्हणून तालुक्यातील महत्वाच्या स्थानिक नेत्यांची हात मिळवणी करण्यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here