आवाज लोकशाहीचा
विजय मोरे प्रतिनिधी
निवडणुका प्रचारात आरोप प्रत्यारोप होणारच याची शंका नसते.मात्र सध्या निवडणुकीत नव्या भाषेने जन्म घेतले जात आहे.त्यात सिजनेबल,पुढारी बैल, चेले,चपाती,टरबूजा उपरा,आयात कलिंगड अशा विविध स्वरूपाच्या फुले,फळे,जनावरे पशुपक्षी यांच्या नावाने,उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फुकटच्या पदव्या दिल्या जात आहेत.
या निवडणुकीच्या निमित्ताने काही नेते सुद्धा आम्ही सिजनीबल पुढारी राहिलो नाही.असा शब्द प्रयोग वापरून,जनतेपुढे ठणकावून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना राजरोसपणे दिसत आहे. असले तरी याचा मात्र ते उलगडा करून सांगत नाहीत.याचे जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वरवंड गावात अशा स्वरूपाच्या एका मान्यवराच्या पत्नीने प्रचारभेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना मी सिजनेबल पुढारी नाही.असा आव आणण्याचा प्रयत्न केला.यानंतर सिजनेबल याचा अर्थ पत्रकाराने नक्की काय काढावा,हा प्रश्न जरी ऐैरणीवरचा विषय असला तरी,या महिला नेतृत्वाला नक्की काय म्हणायचं होतं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं.
सध्या विधानसभेच्या निवडणुकीचं वारं सर्वत्र जोर धरत आहे.विचाराच्या वावटळींमध्ये टिकटिपनी आणि आरोप प्रत्यारोप करण्याची जणू उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये शर्यत लागलेली दिसत आहे.यांच्या शर्यतीचा लाभ घेताना टीकाटिपणी करीत आपलं मत प्रकट करीत आहे.
प्रसार माध्यमं यात मागे राहिलेली नाही.नेता निष्ठेपाई तुमचं मत कुणाला आशा स्वरूपाचा आक्रोश गावागावातील मतदारांपुढे समोर माईक घेऊन करत असताना,नेत्यासाठी बोलणाऱ्यांचे प्रकाशन आणि अन्य लोकांना डिलीट करीत पहा सर्वे काय म्हणतो,अशा स्वरूपाची माहिती प्रकाशित करताना दिसत आहे.
काही प्रसार माध्यमातून स्वतःचा तालुका सोडून या तालुक्यामध्ये,केवळ आणि केवळ आर्थिक लाभापोटी,जोरदारपणे कामाला लागलेली असून खरं काय खोटं काय,तुमचं मत काय असा टाहो फोडताना दिसत आहेत. वास्तविक पाहता मतदान हे गुप्तदान आहे.याचं जाहीर प्रकटन करण्याची आवश्यकता नसते.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही मार्गाने दिलेला,हा अधिकार गरीब आणि श्रीमंत दोघांनाही सारखाच असल्याने,आपलं बहुमूल्य मत देताना ते प्रकट करायचं नसतं.या मताच्या जोरावर बदल घडत असतात.अशी वस्तुनिष्ठ परिस्थिती असताना प्रथम माध्यमातील या मान्यवरांनी तुमचं मत काय कोणाला देणार काय हवा आहे.बर यांनाच कशासाठी ते का नको अशा स्वरूपाची गावागावात चौका चौकात आणि बाजारात आपल्या विद्वत्तेची उधळण करताना दिसू लागले.आहेत
हा सर्व प्रकार निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रसारमाध्यमांकडून चुकीचा असल्याने सर्वोच्च न्यायालयाने एक्झिट पोल प्रकाशित करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल. असा सज्जड दम दिल्याने इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने अद्याप पर्यंत याबाबत कुठलाही निर्णय प्रकाशित केलेला नाही.मात्र गावभर झालेल्या या मीडिया वाल्यांनी तुमचं मत काय पारडं जड झालेला आहे.अशा स्वरूपाच्या वायफळ प्रकाशनाणे प्रसार माध्यमांची आब्रू वेशीला टांगल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अशा विविध बाजूने अलीकडच्या काळामध्ये निवडणुकांचे रंग रूप बदलत असून,प्राणी फळे फुले चिरीमिरी भामटे चिमटे असे विविध शब्दांचा प्रयोग करत असताना शब्दांवली नव्याने जन्माला घालून निवडणुकीतील प्रचार आणि प्रचाराचा बेरंग करण्याचा प्रकार समोर येऊ लागलेला आहे.