आवाज-लोकशाहीचा
राहू:प्रतिनिधी
राहू गावचे रहिवासी असणाऱ्या आमदार राहुल कुल यांनी ग्रामस्थांच्या आव्हानाला सामोरे जाण्याचे धाडस दाखवले नाही ते तालुक्यातील विकास कामांच्या बाबत समोर समोर कशी चर्चा करू शकतील अशा स्वरूपाची टिंगल-टवाळी राहू येथील काही कार्यकर्ते करू लागलेले आहेत.
राहू मध्ये गेले दोन वर्षांपूर्वी विकास कामांच्या संदर्भामध्ये चार व्यक्तींनी जाहीर रित्या आव्हान केले होते.शांताराम जयसिंगराव बांदल,सचिन गेनबा शिंदे,मदन रामदास नवले,मच्छिंद्र किसन चव्हाण, संदीप शिवदास सोनवणे,दीपक पवार देवकरवाडी आणि तात्यासाहेब टिळे या सर्वांनी राहू परिसरातील विकास या संदर्भामध्ये राहुल कुल आणि त्यांचे सहकारी यांना आव्हान केले होते.त्याचा स्विकार कुल यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला नाही हा प्रकार राहू करांना सर्वश्रुत असताना दोन दिवसापूर्वी आमदार कूल यांनी दौंड येथे खासदार निलेश लंके यांच्या सभेतील मुद्दा उचलून विकास कामां संदर्भात समोरा-समोर बसून मी चर्चा करायला आव्हान करतो अशा स्वरूपाची पत्रकार परिषद घेऊन एक संदेश नागरिकांमध्ये पाठवला आणि यातून मी कसा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हा संदेश वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया मधून राहू परिसरात पोहोचल्या नंतर ज्या पाच जणांनी २०२२ मध्ये कुल यांना विकास कामाच्या संदर्भात समोरासमोर बसण्याची आव्हान केले होते.त्यांना या प्रसंगाची आठवण आली आणि त्यांनी दिलेलं पत्र त्यांनी सोशल मीडिया वरती टाकून सर्वांसाठी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
राहू गावची विकास सेवा सोसायटी कैलास विद्यामंदिर तसेच गावातील विविध विकास कामांचा यामध्ये नामोल्लेख केलेला आहे.आमदार कुल यांचा परिवार तालुका मध्ये गेले ३५ वर्ष तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
त्यामध्ये त्यांचे स्वर्गीय वडील सुभाष कुल हे लोकनेते म्हणून परिचय झाले होते.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मातोश्री श्रीमंती रंजना कुल यांनीही काही काळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केल आणि त्यांच्या नंतर ते हयात असताना सुद्धा वारसा म्हणून त्यांचे चिरंजीव राहूल कुल आता लोक प्रतिनिधित्व करीत आहे.
राजकीय कारभार पाहता तीस वर्षे अधिक कालखंड त्यांनी राजकारण केले मात्र या दरम्यानच्या काळामध्ये राहू गावाचा कायापालट करण्याचे ते विसरून गेलेले आहे.जुन्या लोकांमध्ये एक म्हण प्रचलित आहे अंगणाकडे पाऊल घराची परिस्थितीच अवलोकन करता येते अशा स्वरूपाची परिस्थिती राहूच्या विकासाची गंगा आटली असेल तर तालुक्यामध्ये झालेल्या विकास गंगेमध्ये काहीतरी दूषित पणा झाला की काय? हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे.
यातून यांच्या वर्तनाचा या निमित्ताने खोटारडेपणा उघडा पडलेला आहे.आणि त्याच्या भक्तांना याबाबत कोणीही विरोध केल्यास मोठी अडचण निर्माण होते.त्यांच्या बुडाला आग लागते आणि त्यामुळे ते टनाटन उड्या मारून शब्दांचे वाकडे-तिकडे प्रयोग करीत समोरच्यांना टार्गेट करीत असतात अशी भावना सुद्धा हे राहू कर बोलून दाखवू लागले आहेत..