बोगस ओळखपत्र करून मतदान करण्याचा घाट कोण घालत आहे ?

13

बोगस ओळख पत्र आढळ्यास चौकशी करून गुन्हे दाखल करा.शंकेचे कार्ड असल्यास डबल पुरावा मागा या -निवडणूक अधिकारी गणेश मरकड यांचे आदेश.!

आवाज-लोकशाहीचा
पाटस/आव्हाडनगर :- प्रतिनिधी

निवडणूक आयोगा चे बोगस ओळखपत्र  निरानी ग्रुपच्या कामगारांमध्ये आढळून आले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना स्थळावरील बूथ क्रमांक २२८ मध्ये हा प्रकार उघड झाला आहे..

या बूथ ठिकाणी १०० हून अधिक नावे बोगस स्वरूपाची तयार करून त्यांना ओळखपत्र बोगस दिले गेली आहेत अशा स्वरूपाची गोपीनीय माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

यामध्ये विजय किसन वाघ हा व्यक्ती राहणार मधुकर नगर पाटस या सदर व्यक्तीला मतदान स्थळावरती कार्यकर्त्यांनी हटकले असता त्याने आपलं ओळखपत्र टाकून पळ काढला या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे अजून किती बोगस ओळखपत्र येणार या बाबतची चर्चा बूथ आणि बूथ परिसरात होऊ लागलेली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की दौंड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा कार्यक्रम सुरू आहे.पाटस कारखान्यावरती या मतदाना करता बूथ असल्या कारणाने या परिसरातील मोठेवाडा कारखाना स्थळ आणि वाडी वस्तीवरील लोकांना मतदानाची सोय झालेली आहे.

या मध्ये बोगस मत करण्याचे प्रयोजन निराणी ग्रुपच्या माध्यमातून होतंय का? असा प्रश्न त्यांच्याकडे ठेकेदारीत असलेल्या एका कामगाराच्या भानगडी वरून शंकेचे कारण बनला आहे.

मतदार यादी मध्ये सदर व व्यक्तीच नाव गावी गेलेल्या मतदार यादीत नमूद केले असून अशा स्वरूपाची ९८ अधिक नावे मतदार यादी मध्ये दिसून येत आहे.ही सर्व नावे कारखान्यांमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची आहेत अशा स्वरूपाची शंका बुथवर नेमलेल्या उमेदवार प्रतिनिधींना समजल्याने त्यांनी मतदारांची कसून चौकशी करण्याचा प्रयोग केला आहे.
मतदान स्थळी असलेले सर्व प्रतिनिधी स्थानिक पातळीवरचे असल्या कारणाने येणाऱ्या मतदाराची आणि त्यांची ओळख असते अनोळखीच आलेल्या व्यक्तीला त्यांनी याबाबत चौकशी करता हा एक आढळून आला आहे.त्याची चौकशी करते वेळेस त्यांना आपलं ओळखपत्र जागेवर टाकून पळ काढला असल्या या प्रकाराने कारखान्यावर निराणी ग्रुपने आणलेले ठेकेदारी पद्धतीचे कामगार मतदार म्हणून वापरण्याचा डाव केला जातोय की काय? अशी शंका उपस्थित होणे सहाजिकच आहे.आणि यातून हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या बाहेर गावी राहणारे मतदार म्हणून या यादीमध्ये अशा लोकांचा समावेश असला तरी हे बाहेर गावचे मतदार ज्या ओळखपत्रावर मतदान करण्यास आलेले आहेत ते ओळख मतदान पत्र बोगस स्वरूपाचे आहे.अशा स्वरूपाचा ठाम विश्वास या ठिकाणी निवडणूक उमेदवाराचे प्रतिनिधी करीत आहेत.निवडणूक आयोगाचे खोटे मतदान पत्र तयार करून मतदान करण्याचा प्रताप करणाऱ्या व्यक्तींवरती खऱ्या अर्थाने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा स्वरूपाचे आशा आणि अपेक्षा ही लोक व्यक्त करीत आहेत..

शासनाचा सिम्बॉल असणारे बोगस ओळखपत्र कुठून काढण्यात आले कोणी काढून दिले आणि याचा हा लाभार्थी कोण याची खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने चौकशी करणे बंधनकारक असून प्रशासन याबाबत कारवाई करेल की काय ? याची नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे..

अशा बोगस ओळखपत्राद्वारे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मतदान करण्याचा नियोजन करण्यात आलेले आहे की काय ? हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने ऐरणीवरचा विषय झाला असून या बोगस मतदारांना आशीर्वाद कुणाचा हा शोध मोहिमेचा विषय बनलेला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here