राज्याच्या निवडणुकीचा निकाल शंका स्पद ?..प्रसिद्ध विधितज्ञ असिम सरोदे..कोर्टात जाणार

8

विधानसभा २०२४ निकाल विराेधात मे.न्यायालयात जाणार,

अँड. असीम सरोदे,
प्रसिद्ध वकील,

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला.

यात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे.

तर सर्वाधिक जागा मिळवत भा.ज.पा. सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

महायुतीला २३० जागा मिळाल्या आहेत.

तर भा.ज.पा.ला तब्बल १३२ जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे.

तर शिवसेना शिंदे गट ५७ जागांवर विजयी झाली आहे.

४१ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत.

तर महाविकास आघाडी केवळ ४६ जागांवर विजयी झाली आहे.

तर अपक्ष १२ उमेदवार निवडून आले आहेत.

अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला.

यावर अॅड. असीम सरोदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट
अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

मी अश्या अनेकांच्या फोन कॉल्स ला उत्तरे दिलीत.

निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप,
प्राथमिक पुरावे आवश्यक असतात.

केवळ भावनाशील होऊन मे.उच्चन्यायालया मध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाही.

मी शक्य झाल्यास याबाबत फेसबुक लाईव्ह करून निवडणूक याचिका करण्यासाठी आवश्यक माहिती देणार आहे.

निवडणुकीला आव्हान देण्याचा हक्क केवळ हरलेल्या उमेदवारांना नाही तर कुणी त्या मतदार संघातील उमेदवार सुद्धा अशी याचिका दाखल करू शकतात.

निवडणूक निकाल अनाकलनीय लागले हे तर अगदी महायुतीतील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहिती आहे.

आधी सुद्धा निवडणूका व्हायचे व लोक पराभूत व्हायचे पण निवडून आलेल्या व विजयी झालेल्या उमेदवारांच्या बाबत इतक्या शंका कधी नसायच्या.

फ्री अँड फेअर निवडणूक प्रक्रियेसमोर विश्वासहार्यतेचे मोठे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here