आवाज:-लोकशाहीचा
पाटस:प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सेवा निवृत्त कामगारांच्या श्रमाच्या पैशाची फसवणूक करणे ही बाब फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे,या कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध राहील अशा स्वरूपाचा आत्मविश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सेवानिवृत्त कामगारांच्या थकीत देणे प्रकरणे कामगाराने ठिय्या आंदोलन सुरू करून होते त्याला ६५ दिवस उलटून गेले आणि त्याला कामगारांनी स्थगिती दिली आहेत या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी कोळसे पाटील आले असताना त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला आहे.
कोळसे पाटील बोलताना म्हणाले की, श्रमाचे आणि कष्टाचे दाम दिले गेले नाही ही बाब प्रचंड खेदजनक बाब आहे.मला हाती आलेल्या माहितीनुसार शासनाची सुधा फसवणूक करून संचालक मंडळाने मोठा घोटाळा केला आहे.
सत्तेच्या मस्तीमध्ये कामगारांना आणि खुल्या व उत्पादक सभासदांना भेटीस धरून स्वतःचा हुशारी दाखवण्याचा कार्यक्रम झालेला दिसतोय राज्यकर्त्यांच्या जोरावरती असा प्रकार करणाऱ्या कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक बोर्डाला हा सर्व प्रकार किरकोळ वाटत असल्यायाचे पडसाद मात्र फार गंभीर उलटल्या शिवाय राहणार नाहीत.
वयोवृद्ध कामगारांनी न्याय हक्कासाठी आंदोलन करावे विधवा झालेल्या भगिनींनी आपल्यावर आलेली परिस्थितीचा जाहीर रित्या प्रकटन करावा ही बाब त्यांच्यासाठी शरमेची आहे.
या दंडलशाही मोडित काढण्यासाठी कारखाना आत्ताच बंद करून टाकला असता तुमच्या सरकार दरबारी पेशव्यांचा साम्राज्य सुरू झालेला आहे.आणि तुम्ही इतिहासाची माहिती घ्या ? पेशव्याच्या अन्याय अत्याचाराने प्रचंड सामाजिक हानी झालेले आहे.आज सत्तेत बसलेला मुख्यमंत्री त्यापैकी एक आहे.अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी देताना म्हणाले
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून झालेल्या गडबड घोटाळ्याचा प्रकार माळशिरस तालुक्यातील एका गावामध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेकापर्यंत गेलेला आहे.त्या गावकऱ्यांच्या भेटीसाठी मला यापुढे जायचं आहे.मात्र मी एवढा विश्वास देऊ शकतो या संचालक बोर्डाला कायद्याच्या कोणत्या चौकटीत आणून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून द्यायचा आहे.हे काम नक्की करू शकतो अशा स्वरूपा ची आश्वासन उपस्थित त्यांना त्यांनी देऊन म्हणाले सत्तेच्या मस्तीतून पोलिसांकवी आंदोलन मोडीत काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील.
पोलीस बांधव हे आपले गोरगरिबाच्या घरातून सेवेत गेलेले लोक आहेत.पण त्यांच्यावरती अधिकार गाजवणारी माणसं ही पेशवाई वृत्तीचे आहेत.म्हणून पोलीस बांधवांना दोष देणे योग्य नाही मात्र त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना कायद्याच्या राज्यामध्ये धडा शिकवण्याची गरज आहे.
कायदा कोणाच्या बापाचा नाही तो कसा वापरायचा हे मला पक्क माहिती आहे.तुम्हा सर्वांचा प्रश्न विनामूल्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये उभा करून न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न मी करेल अशा स्वरूपाचा ठाम विश्वास देऊन त्यांनी साखर कारखाना आणि त्यांच्या जीवन प्रवासातील काही महत्त्वाचे क्षण सांगताना म्हणाले साखर कारखान्याची आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.मला याबाबत आदर आहे मात्र या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून प्रगतीच्या वाटा निर्माण झाल्या पाहिजेत त्या कुणाच्या अन्याय अत्याचारासाठी होऊ नयेत आणि या ठिकाणी मात्र या वृद्धांच्या प्रश्नाकडे पाहून हे जाणवलं ही बाब खेदाची म्हणावी लागेल एक रहा निष्ठेने वागा मी तुमच्या बरोबर आहे घाबरू नका मागे हटू नका तुम्हाला न्याय फळे मिळेपर्यंत मी तुमच्या बरोबर असेल असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात माजी जिल्हा परिषद बाळासाहेब कापरे,कामगारांचे ज्येष्ठ सहकारी शिवाजीराव काळे,हनुमंतराव वाबळे,माजी कामगार युनियनचे अध्यक्ष अर्जुनराव दिवेकर,मराठा क्रांती संघटनेचे राजाभाऊ तांबे आदींनी मनोगत व्यक्त केली आहेत..
सध्या सुरू असलेल्या कामगार युनियनचा या सर्वांनी एका दिवसात बदललेल्या पावित्र्या बाबत संताप व्यक्त करीत चेअरमन आणि संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीचा निषेध केला आहे..