आवाज लोकशाहीचा
दौंड:-प्रतिनिधी
दौंड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने याबाबत बोलणे अवघड झाले आहे..
गटविकास अधिकारी कार्यालयात नसले की हे सर्व मनाचे मालक झाले आहेत.नागरिकांच्या अस्मिते बाबत त्यांना काडीचीही दयामाया राहीली नसून प्रत्येक टेबल वरच्या व्यक्तीचा ताल वेगळा बनला आहे..
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्याच्या दौंड शहरात हे मध्यवर्ती कार्यालय आहे या कार्यालयामध्ये तालुक्याच्या जवळपास ८४ गावांच्या विविध योजनांच्या कामाचे कामकाज चालते यामध्ये शिक्षण व्यवस्था आरोग्य बाबत ची अत्यंत महत्त्वाची कामे येथून सुरू असून पाणी घरकुल आणि शेतीसाठी पूरक लागणाऱ्या योजना यांच्याच माध्यमातून राबवल्या जातात..
सध्या या कार्यालयामध्ये गेली दोन वर्ष अधिक लोकप्रतिनिधींच्या जागा रिक्त आहेत निवडणुका झाल्या नसल्याने सभापती आणि अन्य सदस्य मंडळी कार्यालयाच्या आसपास सुद्धा फिरकत नाहीत या सर्वांच्या येण्या-जाण्याने कार्यालयातील कर्मचारी पहिले काम करताना दिसून येत गेले दोन वर्षापासून ही राजकीय पदाधिकारी नसल्याने कर्मचारी वर्ग पंचायत समितीचा मालक असल्यासारखा वागत आहे..
या सर्वांना कंट्रोल करणारे गटविकास अधिकारी जो पर्यंत कार्यालयात आहेत तो पर्यंत काही विभागात अत्यंत प्रामाणिकपणाने काम करण्याचे नाटक हे कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी करीत असतात..
एकाच इमारतीमध्ये शिक्षण महिला बालकल्याण विभाग पाणी आणि आरोग्य तसेच पंचायत विभाग शेती विभाग आणि समाज कल्याण विभागाचे कामकाज चालते.
गेली दोन वर्षांपासून या प्रत्येक विभागात कर्मचारी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना पिळून काढणारा उद्योग सुरू केलेला आहे.कोणत्याच व्यक्तीचे एका काम होत नसून त्यांना अनेक चक्रा वारंवार माराव्या लागतात या प्रकाराने त्रस्त झालेले नागरिक टेबलावर वजन ठेवण्याचा प्रयत्न करून आपले काम मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना नागरिकांना पिळून त्यांच्याकडून हरामाचा पैसा कसा वसूल करायचा हे पक्के माहित झालेल आहे.या कार्यप्रणालीच्या माध्यमातून सध्याच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे
विशेष म्हणून या इमारतीतील नळ पाणीपुरवठा ग्राम विकास खाते आणि बांधकाम विभागामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे.पाणी विभागातील प्रशासकीय मान्यता असणारे दोन कर्मचारी असून अन्य कर्मचारी प्रायोगिक तत्त्वावरती खाजगी म्हणून घेण्यात आलेले आहेत.
यामध्ये शाखा अभियंता नावांनी असणारे सर्वच कर्मचारी हे खाजगी असून त्यांच्याकडून शासनाची कामे करून घेण्याचा प्रयत्न होत आहे.हे सर्व कर्मचारी ठेकेदार यांच्या मर्जीतल्या असून कामाच्या अगोदर बिले काढणे (उदाहरणार्थ १०० रुपयाचे काम असल्यास २०० रुपयांचे अंदाजपत्रक तयार करणे) तेही काम अपूर्ण करणे नंतर परत त्याला वाढीव अंदाजपत्रक देऊन रकमा वाढवणे हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे.
२०२२ पासून या विभागात कोट्यावधी रुपयांचा निधी नळ पाणीपुरवठ्याच्या जलशुद्धीकरण कामासाठी आलेला आहे.यामध्ये अनेक कामे बोगस झाले असून गेले तीन वर्ष होऊ नये योजना कोणतीच पूर्ण झालेली नाही.अधिकारी वर्गाने ठेकेदार यांनी या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून ते दोघेही मिली भगत झाल्याने तक्रार कोणाकडे करावी हा प्रश्न मोठा ऐरणीवरचा विषय झाला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी तालुकाभर नागरिक पाणी विकत घेत असून त्या नागरिकांचा प्रश्न सोडवा म्हणून कोट्यावधी रुपयांच्या योजनेच्या रक्कमा खर्च होऊन सुद्धा सुरू झाल्या नसल्याने या विभागाचा खऱ्या अर्थाने सत्कार ज्या गावात बिलकुल पाणीच प्यायला नाही त्या ठिकाणी नेऊन करावा अशा स्वरूपाची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देऊ लागले आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घरकुलसाठी येणाऱ्या अभागन स्त्रियांना विहिरीचे अनुदान असेल शेतीसाठी लागणारी अवजारे असतील या सर्वच योजनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहेत सोडवण्यासाठी नागरिकांना राजरोसपणे पैसे द्यावे लागतात अशी ओरड सुरू आहे ही बाब मोठी गंभीर असून हा प्रकार प्रथमच घडतोय असे सुद्धा नाही.
मात्र शासनाचा पगार घेऊन साईड व्हिजिट च्या नावाखाली अनेक मंडळी गायब असतात जे ऑफिसमध्ये असतात ते कोणत्या ना कोणत्या कामासाठी खालीवर करून गायब असतात सर्व वेळेची यांची बारकाईने टिपणी केल्यास दिवसातून दोन ते तीन तास फार फार तर हे टेबलाला काम.करीत असतात त्यातील काही वेळ येणाऱ्या नागरिकांकडून दहा पाच उकळण्यासाठी प्रामाणिकपणांनी घालवतात अन्यथा बाकी सगळा वेळ सरकारचा पगार घेऊन उचापत्या करण्याचा प्रयोजन ते प्रामाणिक करतात अशा स्वरूपाचे चित्र आहे..
दौंड मध्ये सध्या प्रशांत काळे नावाचे गट विकास अधिकारी आहे.अत्यंत उत्तम काम करणारी ही व्यक्ती प्रशासनामध्ये अतिशय अचूकपने काम करत असताना त्यांना सुद्धा चकवा देणारी मंडळी या कार्यालयात असून त्यांना लागलेली.सवयी.मोडायची कशी हा प्रश्न मोठा गहन आहे या सर्व पंचायत समिती कर्मचाऱ्यांची दुसऱ्या पंचायत समितीमध्ये बदली करून सर्वच नवीन कर्मचारी नेमले पाहिजेत अशा स्वरूपाचे धारणा या सर्वांच्या कार्यप्रणालीकडे पाहून होणे साहजिकच आहे..