केडगाव प्रतिनिधी
नेत्याच्या सत्कारासाठी इनोव्हा गाडीतून भरधाव वेगाने निघालेल्या कार्यकर्त्यांच्या या गाडीने दुचाकी स्वरांना जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या गावाच्या हद्दीत झाला आहे.
मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव जशीम तजमून अन्सारी अंदाजे वय 33 वर्ष हल्ली राहणार पिशे वस्ती केडगाव मूळ रहिवासी झारखंड येथील नावाडी तालुक्यातील पेंक गावचा रहिवासी आहे .
गवंडी कामासाठी तो केडगाव मद्ये आलेला होता,
अपघात प्रकरणी केडगाव मधील प्रसिद्ध बागायतदार शहाजी नानासाहेब गायकवाड यांच्या विरोधात यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या साठी मनोज गेंदोसिंग याने फिर्याद दिली आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की केडगाव परिसरातील कार्यकर्ते नेत्याला लाला दिवा मिळणार आणि त्या कार्यक्रमाला आपण हजर असलो.पाहिजे या उदेशेने केडगाव येथील ऐक उद्योजक यांच्या मालकीची इनव्हा चारचाकी गाडी नंबर एम एच १२ एन एफ २२२३ मधून काही सहकाऱ्यांना घेऊंन निघाले होते .केडगाव पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर पारगाव गावच्या हद्दीत त्यांनी दुचाकी क्रमांक एम एच १२डी क्यू ०६३८ वरील असलेल्या ना जोरदार धडक दिली धडकेत जिशीम याचा जागीच मृत्यू झाला असून बलवंत बिसेत विश्वकर्मा आणि फिर्यादी दोघे जखमी झाले आहेत .
हा अपघात १४डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला आहे अधिक तपास सहायक पोलिस अधिकारी समील.शेख करीत आहे