आवाज:लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विठ्ठल होले
निमगाव (ता.इंदापूर ) येथील शेतकऱ्याचा नादच खुळा असच म्हणावं लागेल,पोटच्या मुलीसारखं जपलेल्या चंद्रा या देशी गाईचे ओटी भरून डोहाळ जेवण कार्यक्रम संपन्न झाला,मंगळवारी सायंकाळी चार वाजताची वेळ,दारात मंडप सजलेला, सनईच्या सुरात पै,पाहुणे नातेवाईक, ग्रामस्थ आणि महीलांचे मोठ्या प्रमाणात आगमण झाले.
सुवासीनींची ओटी भरण डोहाळे जेवणासाठी लगबग सूरू असतानाच तिच्याकडे कोणीही पाहीले तरी पाहणार्याची नजर तीला लागावी अशा ऐटीत सजलेल्या चंद्रा चे मंडपात आगमन होताच सर्वांच्याच नजरा चंद्रावर पडल्या आणि सर्वजण आश्चर्यचकीत होउन चंद्राकडे पाहु लागले.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रगतशील बागायतदार श्रीधर दत्तात्रय राऊत यांना चार वर्षापुर्वी त्यांचे बरड-लोणंद (ता.माळशिरस) येथील पाहुणे विलास भानुदास दुधाळ यांनी दोन महिने वयाचे सुंदर व देखने देशी गाईचे वासरू आंदन (भेट) म्हनुन दीले होते. राऊत परिवाराने लाडाने तीचे नाव चंद्रा असे ठेवले.चंद्रा दोन महीन्याची असताना अगदी लहाण वयातच श्रीधर राऊत यांचे घरी निमगाव केतकीला आली.पांढरी शुभ्र व देखणी चंद्रा राऊत कुटुंबाची सदस्य (लेक) बनली.
बघता बघता चंद्रा चार वर्षाची झाली.आणि नऊ महिन्याची गरोदरही राहीली.राऊत परीवाराने चंद्राला लेक मानली असल्याने पोटच्या मुलीप्रमाने चंद्राचेही ओटीभरण
व डोहाळे जेवण घालण्याचा निश्चय राऊत परीवाराने
केला.
आणि चंद्राचे
ओटीभरण व डोहाळे जेवण घालण्यासाठी घरात
लगबग
सुरू
झाली.तारीख
ठरली,वारही ठरला आणि पत्रीका तयार झाली.पाहुणे मंडळी
नातेवाईक
यांना निमंत्रण पत्रिका पोहचली
आशा प्रकारे चंद्राचे ओटीभरण व डोहाळे जेवण समारंभ संपन्न झाला.