अभ्यासासाठी आलेल्या युवतींनी पशूधनासाठी घेतले खोपोडी (दौंड) मद्ये शिबिर …

3

आवाज:लोकशाहीचा
पारगाव:-प्रतिनिधी

खोपोडी (ता.दौंड) येथील गावात कृषी कन्यांकडून परिसरातील पशुधन जपण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली.हा कार्यक्रम पारगाव येथील पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सुधाकर झाडे यांच्या मदतीने घेण्यात आला आहे..

यावेळी गावच्या सरपंच वैशाली गरदडे,उपसरपंच अंबादास शितोळे, ग्रामसेवक निळकंठ गायकवाड सह गावातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बाबत सविस्तर माहिती अशी की,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विद्यालय पुणे अंतर्गत ग्रामीण कृषी जागृती आणि औद्योगिक कार्यानुभव या कार्यक्रमाच्या अंतर्गत खोपडी गावांमध्ये पुणे येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या युवती या अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या असताना त्यांनी परिसरातील पशुपालक यांच्याशी समक्ष जाऊन संवाद साधला आणि आपणाकडून यासाठी काही मदत करता येईल का हा विचार करून पारगाव येथील पशुवैद्यकीय डॉक्टर सुधाकर झाडे यांच्या माध्यमातून पाळीव जनावरानसाठी मार्गदर्शन शिबिर आणि लसीकरण कार्यक्रम घेतला आहे.

यावेळी जनावरांची निगा आणि त्यांना होणारे साथीचे आजार या बाबत जनजागृती केली व पशुधनाची काळजी कशी घेतली जावी या विषया वरती संवाद साधला कार्यक्रमा साठी मोठ्या संख्येने गावातील पशुपालक व नागरिक उपस्थित होते..

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम साक्षी पाटील,सायली संकपाळ,मानसी शिंदे,सिद्धी काळे,हर्षदा नामदास,स्नेह प्रभा राऊत रेणमगम पंच तपास सरकार साक्षी गुप्ता यांनी परिश्रम केले..

या सर्वांना या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर एम एस माने,सहयोगी अधिष्ठाता पुणे असून केंद्र कृषी विस्तार विभागीय समन्वय डॉक्टर विजय तरडे केंद्र प्रमुख डॉक्टर स्वाती खांडवे आणि कार्यक्रमाधिकारी डॉक्टर दीप्ती वाघमारे यांचे विशेष मोलाचे मार्गदर्शन मिळालेले आहे.

खोपडी सारख्या छोट्या गावामध्ये पशुधन वाचवण्यासाठी अभ्यासक्रमासाठी आलेल्या या अभ्यासिकांनी गावकऱ्यांना यानिमित्त पशुधनानिमित्त जनजागृती करून त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने पशुधन हे शेतकरी कुटुंबासाठी किती मोलाचे असते हा विषय लक्षात आणून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here