पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी नामदेव भोसलेचे मोठे योगदान…..पोलीस महासंचालक सुनील फुलारी

6

पारधी आणि समाजाला प्रवाहात आणण्याचे काम नामदेव भोसले करीत आहेत-पोलिस महासंचालक सुनील फुलारी

आवाज:लोकशाहीचा
पुणे:विशेष प्रतिनिधी – एम जी शेलार

पिढ्यान् पिढ्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणा पासुन दूर राहीलेल्या पारधी व आदीवासी समाज सुधारण्यासाठी लेखक नामदेव भोसले हे भगिरथ प्रयत्न करीत आहेत.ही बाब परीवर्तन शील आणि दिशादर्शक आहे.असे गौरवोद्गार कोल्हापुर परिक्षेत्र पोलिस महासंचालक सुनिल फुलारी यांनी उरुळी कांचन येथे कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार होते.

फुलारी साहेब बोलताना पुढे म्हणाले की,नामदेव भोसले हे खडतर परिस्थितीशी झुंज देत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आदीवासी आणि पारधी समाजाला गुन्हेगारी पासुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करीत आहे.ही स्वागत शील आणि अनुकरणीय बाब आहे.

सामाजिक सुधांरणा करणारया कार्यकर्त्यांना अनेक अडचणी येतात. तरीही ते आपले कार्य पुढेच नेत आहेत भोसले यांनी असेच न थांबता सामाजिक काम करीत पुढे जात यावे हिच अपेक्षा आहे.

हा कार्यक्रम लेखक नामदेव भोसले यांच्या विधायक संकल्पनेतुन “. परिवर्तनाची पाठशाळा ” अंतर्गत एक कॅमेरा स्वसंरक्षणासाठी,आणि एक कॅमेरा पोलिस मदतीसाठी घेण्यात आला आहे.

या प्रसंगी १६५१ व्या कॅमेऱ्याचे उद्घाटन आदर्श माता शेवंताबाई नामदेव भोसले यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी पोलिस महासंचालक सुनील फुलारी यांचे हस्ते आदर्श माता शेवराबाई भोसले,भामाबाई बाबुराव पवार, लिलाबाई बिरकिट भोसले, शारदाबाई हरण शिकारी भोसले, अनिल वानवा पवार,बिभीषण लिंबाजी पवार,भिमराव संपत खलसे, सुरेंद्र राजेंद्र भोसले,मलबार पवार या आदर्श माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, उरुळी कांचन पोलिस निरीक्षक शंकर पाटील,हवेली पोलीस पाटील संघटना अध्यक्ष विजय टिळेकर,संजय टिळेकर,सरपंच राजेंद्र चौधरी,सुनिल गोते,गणेश चौधरी,राजेंद्र टिळेकर, दैना कादंबरीचे लेखक भास्कर भोसले या मान्यवरांसह आदिवासी आणि पारधी समाज बांधव, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थीत होते.

प्रास्तविक बोलताना नामदेव भोसले म्हणाले,समाजात काम करताना अनेक वेळा निराशा येते यावेळी प्रामुख्याने पोलिस खाते आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी सर्वच प्रकारे बहूमोल सहकार्य करतात हिच माझी प्रेरणा आहे.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुनिल जगताप तर आभार विजय टिळेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here