लोकसभेसाठी एकत्रित आलेल्या दोन मधील दोन कट्टर विरोधकांची निकालानंतर होणार तू तू मै मै.

17

दौंड ….आवाज.लोकशाहीचा …
बारामती लोकसभा मतदार संघाच्या होत असलेल्या निवडणुकीत  भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालेली आहे .

याचा विपरीत परिणाम दौंड तालुक्यात राजकारणावर झालेला आहे .सद्या तालुक्यातील.दोन कट्टर विरोधक असलेले विद्यमान आमदार राहुल कुल (भाजपा) आणि राष्ट्रवादी गटाचे रमेश थोरात या निमित्त एकत्रित आलेले दिसत असले तरी दोघांकडून निवडणुकीत प्रमाणिक पना कुणाचं हा प्रश्न गुंता करणारा बनला गेला आहे.
आणि याचे उत्तरं निवडणुकीचा निकाल लागल्यावर दौंडकरणाच्या मतांच्या आकडे पाहता मिळणार यात शंका नाही आणि परत यांची तू तू मैं मैं होऊ शकते ,
            याची प्रचिती पाहण्यासाठी निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की लोकसभेसाठी भाजपा युती असलेल्या अजित.पवार राष्ट्रवादी गटाच्या सुमित्रा पवार या निवडणूक लढवीत आहेत सुमित्रा या अजित पवार यांच्या शुभेच्छा पत्नी असून त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी जन्माला घालणाऱ्या संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या निवडणूक लढवीत असून त्या अजित पवार यांच्या सख्या चुलत भगिनी आहेत सुळे आणि पवार यांची लढत जाऊबाई विरुद्ध ननंद अशी होत असून ती बारामती लोकसभा मतदार संघा साठीच लक्षवेधी नसून देशांमधील लोकसभेच्या निवडणुकीत लक्षवेध झालेली आहे.
दौंड तालुक्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपाच्या चिन्हावरती ७०० आसपास मताने निवडून आलेले आहेत ,
त्यांनी अजित पवार गटाची कट्टर समर्थक रमेश थोरात यांचा पराभव केलेला आहे , निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांचे युतीच असल्याने कुल थोरात एक कट्टर राजकारणातील दुश्मन एकत्रित येऊन लोकसभेचे उमेदवार सुमित्रा पवार यांचा प्रचार करीत आहेत.
तालुक्यातील मतदार संख्याची आकडेवारी लक्षात घेता जवळपास तीन लाख चार हजार मतदार नोंदणीकृत आहेत आणि कूल थोरात हे दोन तालुक्यातील प्रबळ नेते असल्यामुळे त्या दोघांच्या दौंड विधानसभेतील लढतीची मतदानाची आकडेवारी पाहता कुल यांनी जेवढ्या मताने विजय केलेला आहे ती मते वजा करता दोघांनीही जवळपास एक लाख अधिक मते घेतलेली आहेत ,
याची बेरीज करता विधानसभेच्या निवडणुकीसाठी तालुक्यात जवळपास दोन लाख पाच हजार मताच्या आसपास आकडेवारी होती, यामध्ये काय मयत असू शकतात काहींनी मतदान केलेलं नव्हतं म्हणून झालेल्या आकडेवारी मध्ये रमेश थोरात यांचा पराभव जरी झाला असला तरी एक लाख दोन हजार मताधिक्य त्यांनी मिळवलेलं होतं आणि विजयासाठी त्यांच्यापेक्षा जास्त कुलांनी ७०० इतपत मते घेऊन विजय संपादन केलेला होता.
या दोघांच्या मतांच्या आकडेवारीचा विचार करता आणि सध्या लोकसभेला असलेल्या मतांची आकडेवारी पाहता लोकसभेसाठी तीन लाख ४ हजार इतपत असलेले मतदान या तालुक्यातील कुल थोरात यांच्या दोन्ही मतांची बेरीज  केली असता दोन लाखाचे पॉकेट मतदान या दोघांच्या बरोबरच निश्चित स्वरूपाचे आणि ठाम आहे याबद्दल कोणालाही शंका घेण्याचे कारण नाही.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातून हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्रित येऊन घड्याळाच्या चिन्हाचा प्रचार करीत आहेत या घड्याळाच्या चिन्हाला या दोघांचं फिक्स मतदान असणाऱ्या पैकी दोन लाख मते हे मिळालीच पाहिजेत अशा स्वरूपाची अपेक्षा आकडेवारी पाहता करण्यास हरकत नाही.
ही आकडेवारी उघड उघड दिसत असली तरी तालुक्यात या दोघांनीही आपली स्वतःची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे राहुल कुल यांनी चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत एक मिळावा घेऊन फक्त भाजपाच्या लोकांची उपस्थिती ठेवण्याचा प्रयत्न करीत आम्ही एवढे एकत्रित आहोत असेच चित्र दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याच स्वरूपाचा प्रयत्न रमेश थोरात यांनी अजित पवार यांना घेऊन वाखारी गावच्या हद्दीत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये प्रयत्न केलेला आहे या दोघांच्याही शक्ती प्रदर्शनाने हे तालुक्यामध्ये प्रबळ आहेत हेच त्यांना दाखवण्याचा विषय होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या दोन्ही शक्ती प्रदर्शनाचा बारकाईने विचार केल्यास लोकसभेचे उमेदवार सुमित्रा यांना दोघांच्याही मतांचा भरघोस पाठिंबा राहील असे म्हणणे उचित ठरणार आहे आणि प्रत्यक्षात ही मते त्यांच्या पारड्यात पडतील याबद्दल कोणालाही शंका वाटण्याचे कारण नाही सध्या तालुक्यामध्ये निवडणूक अंतिम टप्प्याच्या प्रवासात आलेली असून सात मे रोजी मतदान होणार आहे सात मे रोजी कुल थोरात यांनी मिळून तालुक्यामध्ये साधारण तीन लाख मतदारांमधील दोन लाख मते हे ठामपणाने घड्याळ या चिन्हाला देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला पाहिजे आणि करतीलच असे तरी चित्र नागरिकांना दिसून आलेले आहे तसेच ते चित्र राजकीय पटलावरील वरिष्ठ मान्यवरांनी पाहिलेला आहे पण या दोघांमधील प्रामाणिकपणा निवडणुकीच्या निकाला दिवशी पेट्या फुटल्यावर ती उघड होणार आहे आणि या काळात मतमोजणी दिवशी मतांची आकडेवारी दौंड तालुक्याची बाहेर आल्यावरती या दोघांच्या दोन लाखांच्या मताधिकांच्या तुलनात ती कमी झाली असल्यास यापैकी कोणीतरी त्याने गद्दारी केली असा शब्दप्रयोग केल्याशिवाय राहणार नाही.
याचे भाकीत कोणत्याही ज्योतिषाला सांगावे लागणार नाही म्हणूनच तालुक्यात राजकीय कट्टर दुश्मन कुल आणि थोरात या निमित्त एकत्र दिसत आले तरी अंतर्गत त्यांच्या कडून मतदानाच्या साठी मोठा गुंता होऊन प्रमाणिक.कोण या विषयावर आरोप प्रत्यरोप झाल्याशिवाय राहणार नाही .या साठी मात्र लोकसभा निवडणूक निकालाची वाट पहावी लागणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here