पाटस आवाज लोकशाहीचा…..
गार फाटा ते गार या रस्त्याचे काम निकृष्ट चालू .असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की पाटस दौंड रोड वरून गार गावाकडे जाणारा एक रस्ता आहे चार किलोमीटरच्या या रस्त्याचे काम सध्या सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार हा मूळचा रस्ता सद्य. स्थिती त
साडेतीन मीटरचा आहे. त्याची रुंदी वाढवून तो सव्वापाच
मीटरचा केला जाणार आहे .
ज्या भागातून रस्ता जातो त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने खासगी जमीन असून ती शेती आहे .शेती असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागाच शिल्लक राहत नाही .मात्र रस्त्याला साईड पट्टी करायची आहे अशा स्वरूपाचं काम या विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सद्या काम सुरू असून मूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला साडेतीन फूट रस्ता वाढवण्याचे काम सुरू असून त्याच्या खाली निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरण्यात येत आहे .
माती मिश्रीत वापरण्यात येणाऱ्या काम.कडे लक्ष देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग दौंड यांच्याकडून कोणताही व्यक्ती अथवा कारभारी उपलध नसतो हे ठेकेदाराच्या पथ्यावर पडत असल्याने त्याने काम झपाट्याने करून घेण्याची घाई केलेली आहे
. रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी या या घाईकडे पाहून रस्त्यात गाडला जाणारा माती मिश्रित मुरूम पाहून ओरड करू लागलेले आहेत.
या विभागाचे शाखा अभियंता मधुकर खबीले.यांना विचारले असता सद्या विभागाकडे कर्मचारी.कमी.आहेत .असे.त्यांनी सांगताना म्हणाले ठेकेदाराकडून काही चूक झाल्यास आपण दुरुस्त करू असे आश्वासन सुधा दिलेले.आहे .
चार किलोमीर काम साठी साडेचार कोटी रुपयांचे काम असलेल्या या रस्त्याचा भक्कम पना या विभागाने फक्त ठेकेदाराच्या भरोशावर सोडलेला आहे अशा स्वरूपाचे चित्र सध्यातरी दिसत असले तरी नागरिकांनी मात्र या कामातील दर्जाबाबत मोठ्या शंका उपस्थित करून आरडाओरडा करू.लागले.आहेत