यवत महिला.पोलिसांच्या संडास बांधकामात घोटाळा ? …

18

यवत आवाज लोकशाहीचा………दौंड.बांधकाम उपविभागाने यवत  पोलिसांच्या महिला संडासाच्या बांधकामात घोटाळा केला आहे ,
जवळपास १५ लाखांचा आरखडा करून दोन लाखांच्या खर्चात बनवलेल्या या संडासाचा काही आर्थिक भागच खाल्ला आहे अशा स्वरूपाचे चित्र या संडासाकडे पाहून स्पष्ट पने दिसत आहे,
याबाबतची सविस्तर माहिती अशी की यवत पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी संडास बांधण्याची योजना सार्वजनिक बांधकाम उपविभाग दौंड यांच्यामार्फत राबवण्यात आली. महिलांच्या संडास बांधणीसाठी या विभागाने जवळपास १५ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करून घेतला आणि संडासाचे बांधकाम करताना जास्तीत जास्त दोन लाख आणि कमीत कमी दीड लाखाच्या आतच या संडासाचा कार्यभार उरकून यातील उरलेल्या रकमा हडप केल्याचे चित्र काम.पाहिल्यावर स्पष्टपणे दिसत आहे.


बांधकाम करताना पोलीस स्टेशनच्या आणि लगतच्या संरक्षण भिंतीचा फायदा घेऊन या विभागाने या दोन भिंतींच्या मध्ये हे  युनिट उभारलेले आहे ऐकच असलेल्या युनिट साठी उत्तर दक्षिण असणाऱ्या या दोन्ही भिंतीचा वापर करून पूर्वेकडे वॉल कंपाऊंडच्या तिसऱ्या भिंतीचा आधार घेत पश्चिम बाजूला दरवाजा अडगळीच्या ठिकाणी साधारण तीन ते चार फूट रुंदीच्या संडासची उभारणी केलेली आहे.

  अतिशय खराब स्वरूपाचा दरवाजा आणि पश्चिमेची ती असलेली भिंत याचा दर्जा पाहता सार्वजनिक बांधकामाला कोणताही माणूस लाखोली व्हायला शिवाय राहणार नाही,

या ठिकाणी विट बांधकाम करण्याची तसदी घेतली नाही आयत्या भिंतींचा वापर करून तयार केलेल्या  संडासच्या आराखडा सुधा  तयार केलेला नाही ,

हे युनिट उभी करण्यासाठी कमीत कमी दीड लाख आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचा खर्च झाला आहे असला तरी या विभागाने  १५ लाख रुपयांचा  खर्च केलेला आहे,

याची जवळपास दहा ते बारा अधिक  लाख रुपयांची लूट या विभागाने या बांधकामाच्या अडून केलेली दिसत आहे ,
सदर विभागातील अधिकारी यांना याबाबतचा माहिती आणि तपशील विचारले असता माझ्या काळातील हे काम नसून हे काम पहिल्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे अशा स्वरूपाची उडवडीची उत्तर देत  आहेत.

संडासाचा प्लॅन या विभागाकडे सध्या तरी उपलब्ध नाही अशी परिस्थिती ते देत असलेल्या माहितीवरून दिसत आहे .


महिला भगिनीचा संडासच्या बांधामांबाबत इतकी लुटारू भूमिका या विभागात असणे ही बाब मोठी खेदजनक म्हणावी लागेल .

ऐका संडासच्या कामात येवढ्या लाखाचा डल्ला मारणाऱ्या या विभागाकडे गेली दहा वर्षात हाजोरो कोटी रुपयांचा निधी आलेला आहे .

ज्या अधिकाऱ्याच्या काळात ते बांधण्यात आले तोच अधिकारी अद्याप या विभागाचा कारभार पाहत असल्याने या आलेल्या हजोरो कोटींच्या विकास कामांच्या निधीत किती डल्ला या विभागाने ठेकदरांचे मदतीने मारला असेल याचे उत्तर शोधायचे असल्यास प्रमाणिक अधिकाऱ्यांनी या विभागाची प्रमाणिक पने चौकशी केल्यास या विभागाच्या कारभाराचे मोठे भ्रष्ट ब्रह्मांड उघड झाल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची चर्चा या शौचालयाच्या कारभाराचा विषय घेऊन नागरिक करू लागले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here