आवाज लोकशाहीचा ……. यवत महिला पोलिसांच्या १५ अधिक लाख रुपये खर्चाच्या शौचालयाचे डिझाईन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मिळून येत नसल्याचे या विभागाचे उपकार्यकारी अभियंता एम आर सोनवणे यांनी सांगितलेले आहे.
डिझाईन नसताना बांधकाम.केले.गेले.आहे त्यावर लाखात खर्च केला गेला आहे ही बाब.शंकेचे कारण ठरत आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की यवत पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शौचालय बांधण्यासाठी दौंडच्या उपविभागीय बांधकाम खात्याने १५ लाख रुपये अधिक खर्चाचा आराखडा तयार केलेला होता ,
पोलीस स्टेशन मद्ये त्यांनी शौचालयाचे युनिट बांधलेले आहे मात्र या विभागाने शौचालयाचे डिझाईनच बनवले नसल्याचे समोर येत आहे .
एक दीड लाखाच्या आत या शौचालय नोटाचे बांधकाम करून पूर्णत्वात नेलेल्या या बांधकामाचे डिझाईनच बनवलेले नसल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले असून त्याची माहिती या विभागाकडून देताना सुद्धा त्यांना थोडीफार वाटलेली नाही ही सर्वात खेदजनक बाब म्हणावी लागेल
या विभागातील.हे पहिलेच प्रकरण आहे अशी.बाब नसून अनेक बांधकामे रस्ते इमारती.पुल. गटार योजना मद्ये
या विभागाने मोठा.घोटाळा.केल्याची नागरिकांची ओरड आहे. , यवत महिला पोलिसांच्या शौचालयाची इमारत आणि त्यावर झालेला खर्च या गोष्टीची नागरिकांच्या ओरड असणाऱ्या विषयाला साक्ष मिळत आहे,
या विभागाने नुकतेच यवत येथील विश्रामगृहाच्या जुन्या बिल्डिंगला, रंगरंगोटी करून नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे याची माहिती श्री सोनवणे यांना मागितले असता तुम्ही अर्ज द्या तुम्हाला माहिती दिली जाईल अशा स्वरूपाचे उत्तर दिले असले तरी त्यांना येवत महिला सौचालयाचे पत्र देऊन माहिती मागितलेली असता त्यामध्ये डिझाईन दिलेले नाही .अशी अपुरी माहीत हा विभाग देत असल्याने यांच्या कारभारावर टीका टिप्पणी होऊ लागली आहे .
या विभागाचे मुख्य ऑफिस दौंड तहसील कचेरीच्या इमारतीमध्ये असले तरी या इमारतीमध्ये कधीही अधिकारी वर्ग भेटत नाही मात्र यवत या ठिकाणी या अधिकारी वर्गांचा निवांत पना असतो आणि.कडेने ठेकेदारांचा वळसा असतो अशा स्वरूपाची तक्रार सुद्धा यवत परिसरातील नागरिकांकडून होत असल्याने ठेकेदार आणि अधिकारी मिळून या दौंड तालुक्यातील लोककल्याणकारी योजनेचा आर्थिक.घोटाळा करीत तर नाहीना असा प्रश्न निर्माण.होतो.आहे ,.
या विभागातील.गेली.दहा वर्षात दोन हजार.कोटी.रुपयांच्या विकास कामाचा आकडा पार केलेल्या जाहिराती झालेल्या आहेत .मात्र झालेल्या कामांच्या गुणवत्तेकडे पाहिले असता या विभागाने याच्यात कोट्यावादी रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल अशा स्वरूपाचं ठाम मत नागरिक व्यक्त करतात म्हणून या विभागाची प्रामाणिक असलेल्या वरिष्ठ विभागाने चौकशी केल्यास यातील काही अधिकारी भ्रष्ट कारभाराच्या नावाखाली तुरुंगाची हवा भोगतील अशा स्वरूपाचा ठाम विश्वास सुद्धा नागरिक जन व्यक्त करीत आहेत